मसाला ड्राय मोमोज

by Vaishali Chaudhari
6 views

मसाला ड्राय मोमोज

प्रस्तावना:::

मोमो हा पदार्थ नेपाळ साईड कडील असून तो खूपलोक आवडीने खातो…शिवाय अत्यंत हेल्दी आहे कारण आज आपण गव्हाच्या पिठाचे मोमो बघणार आहे….


साहित्य::

  • अर्धा किलो पत्ताकोबि
  • पाव किलो शिमला मिरची
  • पाव किलो गाजर
  • २० ते २५ लसूण पाकळ्या
  • १इंच अद्रक तुकडा
  • १ चमचा मिक्स हर्ब
  • १ चमचा ओरिगानो
  • १ चमचा सोया सॉस
  • चवीप्रमाणे मीठ
  • पाव किलो गव्हाची कणीक
  • तेल
  • पाणी


कृती::

पत्ताकोबी चोपर मध्ये एकदम बारीक चिरून घ्या.. तसेच सिमला मिरची धून एकदम बारीक चिरून घ्या….

गाजर धुऊन शिलून घ्या….ते बारीक किसून घ्या…. अद्रक लसूण पाकळ्या मिरची याची मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्या….

सर्व मिश्रण पत्ताकोबि गाजर शिमला अद्रक मिरची पेस्ट याचे मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यावे…. कढई मध्ये थोडे तेल गरम करून सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्यावे….

त्यानंतर गॅस बंद करा…या मिश्रणात १ चमचा ओरिगॅनो १ चमचा मिक्स हर्ब १ चमचा सोया सॉस घालून मिश्रण एकत्र करा…. चवीप्रमाणे मीठ घाला…

.आपले मोमो चे सारण तयार आहे..आता एका परातीत कणीक घेऊन त्यात मीठ घाला…. कणीक कडक सर मळा…

त्याची बारीक पोळी लाटून ग्लास किंवा वाटीने गोल लहान लहान पाऱ्या करून घ्या….आणि त्यामध्ये मोमो चे सारण भरा…

असे सर्व मोमो तयार करून घ्या… नंतर पातेल्यात पाणी उकळायला ठेवा…. चाळणी तेल लावून घ्या…त्यावर मोमो ठेवा…

पाणी उकळले की मग चाळणी पातेल्यावर ठेवा…..त्यावर पक्के झाकण ठेवा….१५ मिनिटे वाफवून घ्या…. गॅस बंद करा….

आपले मोमोज स्टीम झाले आहे… मोमोज तयार आहे….आपण सर्व मोमोज स्टीम करून घेतलेले आहे .. त्यानंतर आपल्याला सर्व मोमोज स्टीम केल्यानंतर ते तळून घ्यायचे आहेत…

तळलेल्या मोमोज ला आपल्याला डिशमध्ये काढून घ्यावे… त्यानंतर कढईमध्ये तेल घालावे… त्यामध्ये लसणाचे काप घालावे….

त्यामध्ये आपण तयार केलेली मोमो सोबत ची चटणी तीन ते चार चमचे घालावी एक चमचा टोमॅटो सॉस घालावा आणि व्यवस्थित परतवून घ्यावे…

त्यानंतर त्यामध्ये फ्राईड मोमोज घालावे….. आणि मसाला ड्राय होईपर्यंत परतून घ्यावे….. आपला टोमॅटोचा मसाला ड्राय झाला….

आणि आपल्या मोमोजला व्यवस्थित सर्व बाजूने लागलेला असेल आपले मोमोज छान मसाला मोमोज तयार झालेले आहे…

तर एन्जॉय करूया मसाला मोमोज किंवा ग्रेव्ही मोमोज… तुम्हाला जर ग्रेव्ही आवडत असल्यास मसाला ड्राय करायची गरज नाही….

मसाला घातल्यानंतरच थोडे परतले की लगेचच मोमोज सर्व्ह करावे ग्रेव्ही सोबत….. तर आपण एन्जॉय करूया मसाला मोमोज!!!!

(मोमोज ची चटणी


साहित्य:::

५ टोमॅटो ५लसूण पाकळ्या ३ लाल मिरच्या १ चमचा साखर 1 चमचा ओरिगॅनो 1 चमचा सोया सॉस 5 लसूण पाकळ्या आणि पाव इंच अद्रकाचा तुकडा पेस्ट चिमूटभर मिरी पूड तेल चवीप्रमाणे मीठ


कृती::::

टोमॅटो स्वच्छ धुऊन घ्या… पातेल्यात टोमॅटो लसूण पाकळ्या मिरची घालून ५ मिनिटे उकळून घ्यावे….

नंतर टोमॅटो ची साल काढून टोमॅटो काप करून घ्या…. टोमॅटो काप थंड करून घ्या….नंतर मिक्सर च्या भाड्यात टोमॅटो मिरच्या लसूण घालून मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घ्या….

पातेल्यात १ चमचा तेल घालून त्यात अद्रक लसूण ची मिरची पेस्ट परतवून घ्या…आणि केलेली टोमॅटोची पेस्ट घाला …

त्यात साखर घाला… 1 चमचा सोया सॉस चिमूटभर मिरी पूड आणि ओरिगानो चवीप्रमाणे मीठ घाला…३ मिनिटे चटणी शिजवून घ्या…. गॅस बंद करा…आपली मोमोज ची चटणी तयार आहे…)

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

11060

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.