रेसिपी नाव ( Racipe Name)::
हिरव्या मुगाची हिरवी रस्सा भाजी!!Green Mug Greavy Sabji
फोटो (Photo)::

प्रस्तावना/(Introduction)::
हिरवी रस्सा भजी ही खानदेशातील स्पेशल शेंगदाणे लावून तयार केलेली भाजी आहे… आपण हिरव्या ओल्या मुगापासून तयार केली आहे ही भाजी नेहमी खाणाऱ्या उसळींपेक्षा एकदम छान झणझणीत आणि चवदार लागते….
हिरव्या मुगापासून फक्त आपण उसळच करतो असे नाही आपण त्यापासून रस्सा भाजी सुद्धा बनवू शकतो लाल रस्सा भाजी हिरवी रस्सा भाजी असे दोन प्रकार आपण या भाजीचे बनवू शकतो यातला आज आपण हिरवी रस्सा भाजीचा प्रकार आपण बघणार आहे….
साहित्य (Ingridident)::

- एक वाटी हिरवे मोड आलेले मूग
- सात बारीक हिरव्या मिरच्या
- पाव वाटी शेंगदाणे
- सात ते आठ लसूण पाकळ्या
- अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
- कोथिंबीर
- फोडणीसाठी तेल
- जिरे, मोहरी
- पाव चमचा हळद
- पाव चमचा गरम मसाला
- अर्धा चमचा धनापूर
- आणि चवीप्रमाणे मीठ
कृती (Procedures)::
सर्वप्रथम मूग स्वच्छ धुऊन घ्या त्यानंतर एका पातेल्यामध्ये मूग घालून त्यात एक ग्लास इतके पाणी घाला…..

आणि मूक मऊ होईपर्यंत शिजवून घ्या हे मूग आपण कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकतो मात्र अगदी एकच शिट्टी होऊ द्यावी लागते आणि लगेचच गॅस बंद करावा लागतो ……
नाहीतर मूग जास्त शिजवून जातील त्यामुळे शक्यतोवर आपण हे मूक पातेल्यात शिजवावे मूग हे अगदी हलके असतात शिजवण्यासाठी ते लगेच शिकतात साधारण पाचच मिनिटात मुंग शिजतात….
चटणी बनवण्याची कृती(Chatni Making Procedure)::
सर्वप्रथम गरम तव्यावर पाव वाटी शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्या… त्यानंतर त्या शेंगदाण्याची तुम्ही साल काढून घ्या…
त्यानंतर तव्यावर मिरच्या सर्व बाजूंनी चांगल्या खरपूस भाजून घ्या… आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण पाकळ्या अद्रक पाव चमचा जिरे शेंगदाणे, मिरच्या आणि कोथिंबीर घालून फिरवून घ्या…..

आता त्यामध्ये थोडे पाणी घाला आणि त्याची बारीक अशी पेस्ट म्हणजेच चटणी तयार करून घ्या… आपली हिरव्या भाजीची चटणी तयार झालेली आहे त्याला आपल्याला आता फोडणी द्यायची आहे…

भाजी तयार करण्याची पद्धत:(Method of Preparation)::
एका कढईमध्ये कडकडीत तेल गरम करा… ते छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरीलसणाचे बारीक काप घाला…

मोहरी छान तडतडली की मग लासानाला तांबूस राग आलाकी त्यामध्ये चटणी घाला चटणी घातल्यानंतर व्यवस्थित एकत्र करून घ्या …..

त्यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धणापूड घाला… चटणी व्यवस्थित एकत्र करून घ्या….

आता ही चटणी छान अशी तेल सुटेपर्यंत परतवून घ्या चटणीला आजूबाजूने छान असे तेल सुटले की मग चटणी परतली असे समजावे…
चटणीला तेल सुटल्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला उकडलेल्या मूळ पाण्यासह घालायचे आहे… तसेच अर्धा ते एक ग्लास गरम उकळते पाणी अजून भाजीमध्ये घालायचे आहे……
भाजीला छान दोन ते तीन उकड्या येऊ द्या… आल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला…. भाजीला पुन्हा दोन ते तीन उकड्या येऊ द्या….

त्यानंतर आपली मुगाची हिरवी रस्सा भाजी छान अशी तयार झालेली आहे… मुगाची हिरवी रस्सा भाजी आपण भाकरी सोबत चपाती सोबत किंवा पोळी सोबत खाऊ शकतो…..

गरमागरम ही भाजी छान अशी भाकरी सोबत खा!!!! म्हणजे एकदम छान अशी चवदार लागेल… एन्जॉय करूया मुगाची हिरवी रस्सा भाजी!!!
टिप्स (Tips)::
भजी तयार करत असताना मसाला हा खरपूसच तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे कारण कच्च्या मसाल्यामध्ये आपण जर लगेचच पाणी घातले तर भाजीची चव कचवट लागेल… आणि हवी तशी भाजीची चव एकदम झकास लागणार नाही….
वेळ आणि परिमाण (Time & Quantity)::
तयारीची वेळ::१०मिनिटे
एकूण वेळ:: ३९मिनिटे
परिमाण:: ३व्यक्तींसाठी
Tags/Keyword::
, #SwaadGharCha, #IndianMeals, #GharKaKhana, #MaharashtrianThali, #MarathiFood, #HomemadeRecipe
अजून अशाच काही racipe
