उपवासाची खोबरे घालून चटणी !! Fast Chatani
प्रस्तावना/Introduction:::

आपण उपवासाच्या दिवशी वेगवेगळे चटणी तयार करत असतो नेहमी आपण शेंगदाण्याची चटणी तयार करतो. इथे मी शेंगदाण्याचा तर वापर केलेलाच आहे सोबत खोबऱ्याचा सुद्धा वापर केलेला आहे….
साहित्य/Ingredients:::

- अर्धी वाटी शेंगदाणे
- चार चमचे किसलेले खोबरे
- चार जाड मिरच्या
- पाच ते सहा कडीपत्तिचे पाने
- एक चमचा जिरे
- फोडणीसाठी तेल
- चवीप्रमाणे मीठ
कृती/Procedures:::
सर्वप्रथम तव्यावर शेंगदाणे भाजून घ्या…. शेंगदाणे भाजल्यानंतर त्याची साल काढून घ्या… साल काढल्यानंतर आता आपली शेंगदाणे तयार झालेले आहे…त्यानंतर त्यावर मिरच्याही चांगल्या खरपूस अशा भाजून घ्या ….

आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे खोबरे चार ते पाच कढीपत्त्याची पाने मिरच्या चवीप्रमाणे मीठ याचे चांगले बारीक वाटण करून घ्या…. थोडे थोडे पाणी घालून चटणी चांगली बारीक करून घ्या…

मला आवडत असल्यास यामध्ये थोडासा अद्रकाचा तुकडा सुद्धा तुम्ही घालू शकतात…. मी इथे अद्रकाचा तुकड्याचा वापर केलेला नाही…. अद्रक उपवासाला चालते …..

त्यामुळे तुम्ही अद्रकाचा वापर करू शकतात मात्र चटणी वाटत असतानाच त्यासोबतच आपल्याला अद्रकाचा तुकडा वाटायचा आहे…. ही चटणी उपवासासाठी अगदी अप्रतिम लागते….


बरेच जण कोथंबीर उपवासासाठी खातात पण आमच्याकडे आम्ही खात नाही त्यामुळे मी इथे कोथिंबीरचा वापर केलेला नाही…. तुम्ही जर कोथिंबीर खात असल्यास यामध्ये तुम्ही थोडी कोथिंबीर सुद्धा वाटू शकता…..
एका लहान कढईमध्ये कडकडीत तेल गरम करा…. आपले तेल चांगले तापलेले आहे यामध्ये आपण आता जिरे घालू जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पाने घाल……

आणि जिरे चांगली तडतडली की मग हे कडकडीत तेल आपण चटणीवर घालू आपली चटणी तयार झालेली आहे….

ही उपवासाची चटणी तुम्ही साबुदाणा खिचडी सोबत भगर खिचडी सोबत तसेच छानसे गरमागरम भाजणीच्या एळणी सोबत किंवा आपण उपवासाचा डोसा करतो त्यासोबत तुम्ही खाऊ शकतात….
झणझणीत उपवासाची चटणी !!!!
टिप्स/Tips:::
चटणी तयार करत असताना शेंगदाणे आणि मिरच्या भाजूनच घ्याव्या बरेच जण कच्च्या वस्तूंचा वापर करतात अशा वेळेस चटणी उगीर लागते म्हणजे ती कचवट लागते चवीमध्ये खूप फरक होतो…. भाजलेल्या शेंगदाणे आणि मिरचीची चटणी एकदम चवीला अप्रतिम लागते…

वेळ आणि परिमाण Time and Quantity:::
तयारी वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ:::३० मिनिटे
परिमाण::: ३व्यक्ती साठी
टॅग्स आणि कीवर्ड/ Tags and Keywords
अजून काही उपवास रेसिपी






