पिठले

by Vaishali Chaudhari
330 views

🥘 १. रेसिपीचं नाव

 पिठले

📸 २. फोटो / फीचर्ड इमेज : रेसिपीचा एक सुंदर, नैसर्गिक फोटो —

३. प्रस्तावना

थोडक्यात त्या पदार्थाबद्दल माहिती — हा खाद्य पदार्थ सर्व ऋतूत बनवतात,

📝 ४. साहित्य (Ingredients

  • १ वाटी बेसन,
  • १ कांदा,
  • १ टमाटर,
  • ६ लसूण पाकळ्या,
  • अर्धा इंच आले तुकडा,
  • हळद,
  • जीरे-मोहरी
  • कढीपत्ता
  • 4 बारीक मिरच्या
  • १ जाड लाल मिस्ची,
  • कोथींबीर,
  • ४ टेबलस्पून तेल,
  • मीठ,
  • पाणी

कृती:

  • एक टमाटर एक कांदा चांगला बारीक चिरून घ्या. मिरचीचे बारीक असे तुकडे करून घ्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आल्याची पेस्ट करून घ्या.
  • एका साईडला छोट्या पातेल्यामध्ये गरम पाणी करून घ्या. एक कढईमध्ये चार पळी तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घाला.
  • त्यामध्ये कढीपत्ता मिरच्या परतून घ्या. ती परतल्यानंतर त्यात कांदा आणि टमाटर परतून घ्या. त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घाला तीही परतवून घ्या.
  • त्यात हळद घालून परतून घ्या. त्यामध्ये आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये गरम केलेले पाणी घाला हे पाणी आपण गरजेप्रमाणे घालू शकतो .
  • जसे घरात दोन मेंबर असतील तर आपण एक ग्लास पाणी वापरू शकतो आणि पाच मेंबर असतील तर दोन ग्लास पाणी वापरू शकतो.
  • पाण्याला चांगली खडखडीत उकळी येऊ द्या. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ घाला. त्यामध्ये एक वाटी बेसन घालून गुठळ्या न होऊ देता घोटून घ्या.
  • हे बेसन घालताना एक वाटीतले थोडे थोडे बेसन घालून घोटत राहावे म्हणजे गुठळ्या होत नाही एकदम एक वाटी बेसन टाकू नका थोडे थोडे घालून घोटून घ्या.
  • आता याला चार ते पाच उकळ्या येऊ द्या. आपल्याला पिठले घट्ट वाटत असल्यास तुम्ही पाव ग्लास गरम पाणी घालून पुन्हा ते पातळ करू शकतात.
  • आता मंद आचेवर तीन मिनिटे ते शिजू द्या आणि त्यामध्ये कोथिंबीर घाला.

(वरील पध्दतीने पिठले केल्यास गुठळ्या होत नाहीत(सर्व साहित्य मेझरींग कप व बाकी स्पून ने मेझर केलेले आहे)

💡 ६. टिप्स (Cooking Tips)

पिठले करताना कधी कधी आपल्या गुठळ्या जास्तच होतात त्यासाठी एक सोपी पद्धत मी तुम्हाला आज सांगते ती म्हणजे अर्ध्या ग्लास पाण्यामध्ये एक वाटी पीठ चांगले गुठळ्या न होऊ देता मोडून घ्या आणि कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये अर्धा ग्लास उकडलेले पाणी घाला .त्यानंतर त्यामध्ये बेसनाचा हा आपण बनवलेला गोल घाला हे पिठले अत्यंत चिकन येते. यामध्ये कुठल्याही प्रकारची गुठळी होत नाही.

🍽️ ७. सर्व्हिंग सुचना (Serving Suggestion)

भाकरी, चपाती किंवा भातासोबत उत्तम लागते.

🕒 ८. वेळ व परिमाण

• तयारीची वेळ: १० मिनिटे
• शिजवण्याची वेळ: १५ मिनिटे
• एकूण वेळ: २५ मिनिटे
• परिमाण: २ जणांसाठी

❤️ ९. निष्कर्ष / लेखकाची टिप्पणी

हा पदार्थ आरोग्यदायी, झटपट आणि पारंपरिक चवीचा आहे.

📚 १०. टॅग्स / कीवर्ड्स

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

11632

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.