झणझणीत अशी फोडणीची खिचडी -एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल! | Spicy Tadka Khichdi Recipe Spicy Khichadi

0 views

झणझणीत अशी फोडणीची खिचडी. !!! Spicy Khichadi


प्रस्तावना/ Introduction:::

छोट्याशा बुक साठी आपल्याला नेहमी काहीतरी बनवायचे असते अशा वेळेस आपण काहीतरी भाताचा वेगळा प्रकार आपण शोधत असतो किंवा झटपट तयार होणारा किंवा बाहेरगावाहून आल्यानंतर आपल्याला पटकन होईल अशी खिचडी पाहिजे असते….. अगदी झटपट होईल आणि चवीलाही चांगली लागेल अशी खिचडी आपण आज बघणार आहे….. तुमच्याकडे जेवढ्या भाज्या असतील त्या तुम्ही त्यामध्ये घालू शकतात…. आणि कमीत कमी भाज्यांमध्ये सुद्धा आपणही फोडणीची खिचडी तयार करू शकतो…

साहित्य/Ingredients::

  • १ वाटी तांदूळ
  • अर्धी वाटी मूग डाळ
  • १ वाटी तूर डाळ
  • एक मोठा बटाटा
  • दोन कांदे
  • दोन टमाटे
  • तीन जाड मिरच्या
  • एक वाटी वाटाणे
  • बारा तेरा लसूण पाकळ्या
  • अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
  • कोथिंबीर
  • अर्धा चमचा हळद
  • दोन चमचे तिखट
  • अर्धा चमचा गरम मसाला
  • जिरे मोहरी
  • फोडणीसाठी तेल
  • कढीपत्त्याची पाने
  • बारा ते पंधरा शेंगदाणे

कृती/Procedure:::

सर्वप्रथम कांदा सोडून द्या तो उभा चिरून घ्या तसेच जाड मिरच्या लंबा कापून घ्या….

बटाटा सोलून बारीक काप करून घ्या त्यानंतर टमाटे चिरून घ्या…..

लसूण पाकळ्या अर्धा इंच अद्रकाचा तुकडा मिक्सरमध्ये फिरवून घ्या पेस्ट करून घ्या…..

तांदूळ तुरीची डाळ मुगाची डाळ एकत्र करून घ्या त्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या….

त्यानंतर कुकरमध्ये तेल घाला गरम करा तेल चांगले कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे मोहरी घालूया….

मोरी तडतडल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे वाटाणे कढीपत्त्याची पाने परवा….

त्यानंतर त्यामध्ये कांदा टोमॅटो आणि चिरलेला बटाटा आणि मिरच्या घालून परतवून घ्या…..

हे सर्व परतवल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घाला….

अर्धा चमचा हळद दोन चमचे तिखट अर्धा चमचा गरम मसाला घालून परतून घ्या…..

त्यामध्ये धुतलेले तांदूळ डाळीचे मिश्रण घाला….

हे मिश्रण घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्या आता हे मिश्रण दोन वाटी झालेले आहेत….

त्यानंतर एक वाटी साठी दोन वाट्या पाणी घालावे….

दोन वाट्या होत्या त्यासाठी चार वाटायचे पाणी घालावे हे पाणी गरम झाले तर लवकर उकळी येईल…..

त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालावे…..

एकत्र व्यवस्थित करावे….

त्यानंतर कुकरचे झाकण लावून साधारण मंद आचेवर दोन ते तीन शिट्ट्या होऊ द्या……

त्यानंतर कुकर खाली उतरून घ्या आणि त्याची वाफ निघेपर्यंत कुकर थंड होऊ द्या…..

कुकर थंड झाला की मग डिशमध्ये खिचडी खाण्यासाठी घ्यावी…..

गरमागरम खिचडी कडी सोबत खावी ला अप्रतिम लागते…..

गरमागरम खिचडी तयार आहे….

तयार आहे गरमागरम खिचडी!!!!

टिप्स Tips:::

खिचडी तयार करत असताना पाणी योग्य प्रमाणात घालावे नाहीतर ती खिचडी पातळ होईल एका वाटीत दोन वाटी इतके पाणी घालावे म्हणजे योग्य अशी खिचडी तयार होईल….. प्रमाणात पाणी घातल्यामुळे खिचडी पातळही होणार नाही आणि घट्ट होणार नाही…..

टॅग्स आणि कीवर्ड Tags and Keywords

झणझणीत अशी फोडणीची खिचडी -एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल! | Spicy Tadka Khichdi Recipe Spicy Khichadi

#फोडणीचीखिचडी #झणझणीतखिचडी #खिचडी #मराठीरेसिपी #खमंगखिचडी #घरगुतीपाककृती #MaharashtrianFood #SpicyKhichdi #TadkaKhichdi #IndianFood #HomemadeFood #FoodBlog

Anarase Pith Anarsa Flour Anarsa Pith Anarsa Preparation Anarsa Recipe DalBatiRecipe DesiKhandeshi DesiKhandeshiZaiqa Diwali Faral Diwali Sweets easy homemade recipe GavrooranFood Homemade Flour homemade recipe Homemade Sweets Indian Sweets Indian Traditional Sweets JalgaonFood KalnyachiBhakri khandesh-special KhandeshiFlavors KhandeshiFood KhandeshiRecipes KhandeshiShevBhaji KhandeshiVangyacheBharit KhandeshiVaranBatti KhandeshiZanazanit KhandeshiZatpat KhandeshSpecial Maharashtrian food Maharashtrian Recipe Maharashtrian Recipes MaharashtrianRecipes MaharashtrianThali Marathi recipe Marathi Recipes MarathiSwayampak ShevBhaji Traditional Diwali Recipes Traditional Indian Sweets TraditionalMarathiFood VaranBatti {mar} recipe घरगुती रेसिपी मराठी रेसिपी

  • झणझणीत अशी फोडणीची खिचडी -एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल! | Spicy Tadka Khichdi Recipe Spicy Khichadi

    झणझणीत अशी फोडणीची खिचडी -एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल! | Spicy Tadka Khichdi Recipe Spicy Khichadi

    📅 28 Nov 2026👁 4 वेळा पाहिले 💬 WhatsApp वर शेअर करा 🔗 लिंक कॉपी ♡ सेव्ह झणझणीत अशी फोडणीची खिचडी. !!! Spicy Khichadi प्रस्तावना/ Introduction::: छोट्याशा बुक साठी आपल्याला नेहमी काहीतरी बनवायचे असते अशा वेळेस आपण काहीतरी भाताचा वेगळा प्रकार आपण शोधत असतो किंवा झटपट तयार होणारा किंवा बाहेरगावाहून आल्यानंतर आपल्याला पटकन होईल अशी…

You may also like

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
आईसक्रीमइतरउडीपीउपवासउपवास पापडउपवास विशेषऋतु नुसारकिलबिलकेककैरी लोणचेकोजागिरीखान्देश विशेषगणेश चतुर्थीगुजरातीगोडगोडवाचटणी-कोशिबीरचटर पटरचायनीजझटपट (फास्ट फूड)झणझणीत-मसालेदारतांबडा रस्सादिवाळी फराळनानकटाईन्याहरीपंजाबीपराठा / भाकरीपापडपेयप्रादेशिकबर्फीबेकरीमकरसंक्रातीमसालेदारमहाराष्ट्रीयनमुंबई स्पेशलरस्सा भाजीलस्सीलाडूलिंबू लोणचेलोणचेवर्षभर साठवणूक चटपटीतशिराशेकसण विशेषसरबतसुकी भाजीसूपहळद मिरची लोणचेहिरवा रस्साहोळी
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.