झटपट तयार होणारी चटपटीत आलू मटर भाजी

by Vaishali Chaudhari
1 views

झटपट तयार होणारी चटपटीत आलू मटर भाजी


प्रस्तावना:::

सकाळच्या घाई मध्ये आपल्याला पटकन तयार होणारे अशी भाजी हवी असते…. त्यातल्या त्यात सर्वात सोपी भाजी म्हणजे बटाट्याची भाजी आणि झटपट होणारी….


साहित्य:::

  • चार बटाटे
  • एक लहान वाटी वाटाणे
  • एक कांदा
  • पाच ते सहा लसूण पाकळ्या
  • अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
  • आठ ते दहा कडीपत्त्याची पाने
  • कोथिंबीर
  • पाव चमचा हळद
  • एक चमचा तिखट
  • पाव चमचा गरम मसाला
  • जिरे मोहरी
  • फोडणीसाठी तेल


कृती:::

सर्वप्रथम बटाटे दोन ते तीन शिट्ट्या घेऊन उकडून घ्या…. बटाटे उकडल्यानंतर त्याची साल काढून घ्या त्याचे बारीक काप करून घ्या…

एक कांदा बारीक चिरून घ्या… अद्रक लसणाची पेस्ट करून घ्या…. कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घ्या…कढईमध्ये कडकडीत तेल गरम करून घ्या….

तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरे पाव चमचा मोहरी घाला… त्यामध्ये कढीपत्त्याची पाने घाला…..

एक वाटी वाटणी घाला… वाटाणे चांगले परतून घ्या… वाटाणे फ्राय झाले की त्यामध्ये चिरलेला कांदा घाला.. कांदा चांगला तांबूस अंगावर परतून घ्या…

मग त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट परतवून घ्या…. आता या मसाल्याच्या मिश्रणामध्ये पाव चमचा हळद एक चमचा तिखट पाव चमचा गरम मसाला व्यवस्थित परतून घ्या….

यामध्ये अगदी थोडे पाणी घाला…. त्यानंतर उकडून चिरलेले बटाटे त्यामध्ये घाला…. आणि त्याला एक ते दोन वाफ येऊ द्या….

दोन ते तीन मिनिटे झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला…. वरून चिरलेली कोथिंबीर घाला…. पुन्हा एक ते दोन मिनिटे भाजीला चांगले वाफ येऊ द्या….

आता आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे… ही भाजी तुम्ही पुरी सोबत पोळी सोबत चपाती सोबत फुलक्या सोबत खाऊ शकतात….

आपली गरमागरम अशी चटपटीत अशी आलू मटरची कोरडी भाजी तयार झालेली आहे… .. चला तर मग एन्जॉय करूया आलू मटर…….


टिप्स:::

आलू आपण इथे उकडून वापरलेले आहे म्हणजे माझी झटपट तयार होईल…. लहान मुलांना अशी भाजी खूप आवडते….


वेळ आणि परिमाण:::


तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ:२० मिनिटे
परिमाण १ व्यक्तीसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

7448

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.