बेलाच्या फळ्याचा जाम

प्रस्तावना::
बेलाचा फळांचा जाम हा शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी तसेच उपयुक्त आहे. बेलाचा जामचा वापर पोट दुखी किंवा गॅसेस मध्ये केला जातो… किंवा आपण एक चमचा जाम घेऊन बेलाचा ज्यूस तयार करू शकतो…
साहित्य:::

- बेलाची दोन फळ
- एक वाटी गुळ
- पाव चमचा सेंधव मीठ
कृती::
बेलाचा जाम करताना बेलाचे फळ अत्यंत परिपक्व हवे… बेलाचे पकलेले फळ हे आंब्याच्या गराप्रमाणे दिसते…
आतून अत्यंत पिवळसर रंगाचे असते… आता हे बेलाचे फळ फोडून घ्या… बेलाचा पिवळसर गर चमच्याच्या साह्याने काढून घ्या…

बेलाचा गर काढल्यानंतर त्यातील बिया वेगळ्या करून घ्या… तसेच त्यातील धागे सुद्धा वेगळी करून घ्या… आता हा गर पूर्ण घोटून घ्या…
मिक्सरमध्ये हा कर एकदम टेस्ट करून घ्या… तुम्ही इथे अगदी थोड्या पाण्याचा वापर करू शकता… घर मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर त्यामध्ये धागे वाटत असल्यास ते काढून घ्या….

किंवा हे मिश्रण तुम्ही चाळणीच्या साह्याने सुद्धा चाळून घेऊ शकतात…. त्यामध्ये धागे राहणार नाही…. आता पॅन गरम करण्यास ठेवा…
पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये केलेले बारीक असे बिलाच्या फळाचे मिश्रण घाला… हे मिश्रण चांगले पाच ते दहा मिनिटे सतत परतवत राहा…
त्यामध्ये एक वाटी गूळ घाला…. गुळ घातल्यानंतर गुळाचे पाणी होते मिश्रण थोडे पातळ होईल… साधारण ते घट्ट होईपर्यंत सतत परतवत राहा…

जाम तयार होताना मिश्रण काचेसारखे दिसू लागते…. मिश्रण घट्ट झाले की त्यामध्ये सेंधव मीठ घाला आणि व्यवस्थित मिश्रण एकत्र करून घ्या…..

मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचे आहे… हे मिश्रण चटकन लागते… त्यासाठी आपल्याला सतत ढवळत राहायचे आहे…
त्यामुळे आपल्या जम्प कडेला खाली लागणार नाही… आणि जळणार नाही… यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडत असल्यास वेलची पूड सुद्धा घालू शकतात…
मी ते वेलची पुडचा वापर केलेला नाही… साधारण जाम तयार होण्यास दहा मिनिटे तरी लागतात…. आता हा जाम चांगले अर्धा तास थंड करून घ्या…
हा जाम तुम्ही काचेच्या कंटेनर मध्ये भरून ठेवू शकतात… काचेच्या कंटेनर मध्येच स्टोअर करा म्हणजे त्याला वेगळा वास लागणार नाही…

हा जाम वापरताना तुम्ही चपातीला किंवा ज्या वेळेस आपला पोट दुखत असेल त्यावेळेस दोन चमचे खाऊन घ्यावा त्यामुळे पोट दुखीवर आराम पडेल…..
तसेच दोन चमचे ग्लासामध्ये घालून त्यामध्ये थंडगार पाणी घालून आईस क्यूब घाला…. आपला बेलाचा ज्यूस तयार होईल…. बेलाच्या दिवसाचे अनेक फायदे आहेत….
यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रंग वापरण्याची गरज नाही… तुम्हाला जर वाटत असल्यास तुम्ही थोडा पिवळ्या रंगाचा वापर करू शकतो…
तसेच लहान मुलांना देताना ज्यावेळेस आपण बेलाचा ज्यूस तयार करतो त्यांना अजून थोडी पिठीसाखर घालून तुम्ही देऊ शकतात….

कारण हा ज्यूस आपण गुळाने तयार केलेला आहे.. त्यामुळे तो थोडा जास्त गोड लागत नाही…. या ज्यूस चा वापर तुम्ही रोज केला तरी चालेल…
टिप्स:::
जाम तयार करताना तुम्ही गर व्यवस्थित काढून त्यातील सर्व बिया काढून घ्या.. बिया जर वाटल्या गेल्या तर जाम मध्ये कडसाळपणा निर्माण होतो…
वेळ व परिमाण:
तयारीची वेळ:२०मिनिटे
एकूण वेळ:६० मिनिटे
परिमाण:: अर्धा किलो
