बेलाच्या फळाचा ज्यूस

प्रस्तावना:::
बेलाचा फळाचा ज्यूस हा शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असा आहे…. ज्यांना साखर आहे त्यांच्यासाठी हा ज्यूस पिल्याने साखर कमी होते… तसेच बीपी साठी सुद्धा हा उपयुक्त आहे बीपी कंट्रोल ठेवतो…. अजून खूप सारे फायदे बेलाच्या ज्यूसचे आहेत….
साहित्य:::

- अर्ध्या बेलाचा फळाचा गर
- एक चमचा गूळ
- पाव चमचा सेंधव मीठ
- आणि पाणी
कृती:::
सर्वप्रथम बिलाचे फळ धुवून घ्या.. त्या बिलाच्या फळाचे दोन तुकडे करा.…दोन तुकडे केल्यानंतर आपल्याला अर्ध्या फळाचा ज्यूस करायचा आहे…
अर्ध्या फळामधील गर काढून घ्या… घर काढल्यानंतर त्यामधील बिया वेगळ्या करून घ्या…. त्यामध्ये बी आर राहू देऊ नका…
कारण त्यामुळे ज्यूस मध्ये कडवटपणा निर्माण होईल…. सर्व बिया काढल्यानंतर गर चांगला चेपून घ्या… आणि त्यातील धागे सुद्धा काढून घ्या….
त्यानंतर हा गर मिक्सरमध्ये घाला त्यामध्ये एक चमचा गुळ पाव चमचा सेंधव मीठ घाला… मिक्सरमध्ये गर फिरवून घ्या.

या घराची आपल्याला एकदम बारीक पेस्ट करायची आहे… बर फिरवल्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी घाला म्हणजे गर पटकन बारीक होईल….
आणि बारीक पेस्ट होण्यात लगेच मदत होईल…. आता एका ग्लासामध्ये दोन ते तीन चमचे गर घाला…. त्यामध्ये थंडगार पाणी घाला….

तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही बर्फाचे तुकडे सुद्धा त्यामध्ये घालू शकतात….. वरतून अजून काळे मीठ सुद्धा घेऊ शकतात…. आपला बेलाचा फळांचा ज्यूस तयार झालेला आहे……
टिप्स:::

बेलाचे फळ हे अत्यंत परिपक्व झालेले हवे…. परिपक्व झालेले फळाचा रंग हा ज्याप्रमाणे आंब्याचा रंग एकदम पिवळसर असतो त्याप्रमाणे असतो… त्या फळाचा ज्यूस करावा नाहीतर ज्यूस कडवट लागेल…..
वेळ व परिमाण:::
तयारीची वेळ :५मिनिटे
एकूण वेळ ::१०मिनिटे
परिमाण::२ व्यक्तींसाठी
