छान स्पंजी खमण ढोकळा
प्रस्तावना::

आपण ढोकळे नेहमीच बनवत असतो पण त्या ढोकळ्याना स्पंज येण्यासाठी आपण त्याची रेसिपी कशी बनवायची ते आपण आता खालच्या खमण ढोकळ्याची रेसिपी बघणार आहे….
साहित्य::

- एक मोठी वाटी बेसन
- एक चमचा सायट्रिक ऍसिड किंवा लिंबू सत्व
- एक चमचा मीठ
- चार चमचे साखर
- कढीपत्त्याची पाने चार ते पाच
- जाड हिरव्या मिरच्या
- कोथिंबीर
- फोडणीसाठी तेल
- जिरे मोहरी,
- दोन चिमटी हळद
कृती::
आधी आपण एका मोठ्या कडे मध्ये पाणी गरम करून घेऊ.. पाण्याला चांगल्या दोन-तीन उकड्या येऊ देऊ. ज्या ताटामध्ये ढोकळ्याचे बॅटर टाकायचे आहे.
त्या ताटाला आपण ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घेऊ ही पूर्वतयारी आधीच करून घ्यायची आहे.. आता एका पातेल्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घ्या.
त्यामध्ये एक चमचा सायट्रिक ऍसिड चार चमचे साखर एक चमचा मीठ सर्व मिश्रण चांगले विरघळून घ्या.
साखर विरघळल्यानंतर त्यामध्ये बसेल एवढेच बेसन पीठ विसकरच्या साह्याने मिक्स करा. जरी मी इथे एक वाटी बेसन घेतलेले असेल तरी त्या पाण्यामध्ये जेवढे बेसन मावेल तेवढेच बेसन तुम्ही घाला..
साधारण भज्यांच्या करवणाप्रमाणे कन्सिस्टन्सी असावी.. दोन चिमटी हळद घाला ..या मिश्रणामध्ये कुठल्याही गाठी होऊ देऊ नका.
मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या… मिश्रण व्यवस्थित भेटल्यानंतर आपल्या पाण्याला उकड्या आलेल्याच आहेत आता या मिश्रणामध्ये एक चमचा सोडा घाला.
ढोकळ्याचे मिश्रण आता हळुवार फेटा.. जोरजोरात भेटू नका नाहीतर जो मिश्रणाला फेस येणार आहे तो कमी होऊन जाईल..
आता मिश्रण हळुवार फेटल्यानंतर त्याच्यामध्ये मिश्रण असे स्पंजी बबल तयार होईल… आता हे मिश्रण तेल लावलेल्या ताटामध्ये ओतून घ्या .
आणि लगेच कढईमध्ये पाणी गरम केलेले आहेत त्यावर ठेवा.. साधारण वीस मिनिटे मिश्रण वाफवून घ्या.
गॅसची आच मध्यम असावी.. वीस मिनिटानंतर गॅस बंद करा आणि झाकण काढून डोक्यांचे ताट बाहेर काढा.
ढोकळ्याचे ताट थंड होऊ द्या लगेचच त्याला चिरा देऊ नका.. आता ढोकळ्यांचे ताट दहा मिनिटानंतर थंड झाल्यानंतर त्यावर चमच्याच्या साह्याने पाणी घाला.
हे पाणी तुम्ही एका वाटीमध्ये साखर विरघळून गोड पाणी सुद्धा घालू शकतात.आणि ढोकळ्याना चिरा देऊन घ्या.
मिरच्यांचे काम करून घ्या कोथिंबीर बारीक चिरून घ्या. एका कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जिरे मोहरी घाला ..

मिरच्या चे काप घाला कढीपत्ता घाला थोडी मीठ घाला… (या फोडणीच्या तेलामध्ये तुम्ही साधारण अर्धी वाटी इतके पाणी घालू शकतात. अशा वेळेस ढोकळ्यांवर पाणी घालू नये कारण आपण फोडणीमध्ये पाणी घातलेले आहे त्यामुळे ढोकळ्यांवर पाणी घालण्याची गरज नाही.)
आता हे फोडणीचे तेल ढोकळ्याच्या ताटावर घाला आणि चिरलेली कोथिंबीर घाला… आपल्या ढोकळ्यांना चांगला स्पंज आलेला…
हा ढोकळा एकदम स्पंजी होतो. त्यावर तुम्ही बारीक शेव घेऊन सुद्धा खाऊ शकतात किंवा पुदिनाच्या चटणी सोबत शेंगदाण्याच्या चटणी सोबत ढोकळा खाऊ शकतात….
आपल्या खमण ढोकळा तयार झालेला आहे…..
टिप्स::

ढोकळा तयार करताना आपण जे मिश्रण भेटतो ज्यावेळेस आपण सोडा टाकतो त्यावेळेस हळुवार फेटावे नाहीतर जे बबल्स त्यामध्ये तयार झालेले आहेत ते निघून जातील आणि आपल्या ढोकळा स्पंजी होणार नाही…..
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ:२० मिनिटे
एकूण वेळ:४० मिनिटे
परिमाण: दोन व्यक्तींसाठी
