ढेमशाची (गोल भेंडी) भाजी

by Vaishali Chaudhari

ढेमशाची (गोल भेंडी) भाजी


प्रस्तावना:

ढेमसची कोरडी भाजी ही अत्यंत चवदार अशी भाजी आहे. ही भाजी सहसा उन्हाळ्यात मिळते. परंतु आता भाज्या सर्वच ऋतूत मिळायला लागलेल्या आहेत.


साहित्य::

पाव किलो ढेमसे (गोल भेंडी) अर्धी वाटी शेंगदाणे, चार हिरव्या मिरच्या, दहा लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रकाचा तुकडा, जिरे मोहरी, फोडणीसाठी तेल, पाव चमचा हळद, दोन चिमटी गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ


कृती::

ढेमसे स्वच्छ धुऊन घ्या. आता ढेमसा मधून चिरून त्याचे लांबोडके तुकडे करून घ्या. ज्याप्रमाणे आपण कोंबडा कांदा कापतो त्याप्रमाणे ढेमसे चिरून घ्या.

कोंबडा कांदा हा गावठी शब्द आहे. कोंबडा कांदा हा शब्द माहीतच नसेल. लांबुळके काप याला कोंबडा म्हणतात.( येथे तुम्हाला जर लंबोळक्या आकारात ढेमसे नको असल्यास तुम्ही चौकोनी आकारातही ते कापू शकतात. त्याचेही फक्त करताना बारीक तुकडे करावेत. म्हणजे भाजी पटकन वाफवली जाईल.)

मिरचीचे तुकडे करून घ्या. आता हे काप धुऊन घ्या. अद्रक लसणाची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या.एका कढईमध्ये कडकडीत तेल गरम करा.

त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घाला. त्यामध्ये मिरचीचे काप परतवून घ्या. त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घाला आणि चांगले परतवून घ्या.

त्यामध्ये पाव चमचा हळद, दोन चिमटी गरम मसाला घाला. आता मिश्रण चांगले परतून घ्या. त्यामध्ये आपण कापलेले ढेमशाचे काप घाला.

भाजी चांगली आलटून पलटून परतवून घ्या. आता या भाजीवर झाकण ठेवा. भाजी अधून मधून सारखी ढवळत रहा. भाजी कढईला लागू देऊ नये.

माझी चांगली दहा ते पंधरा मिनिटे वाफवावी लागते. भाजी हाताने चेक करून बघावा झाल्यास त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालावे.

त्यावर चिरलेली कोथिंबीर घालावी. पुन्हा भाजीला मीठ घातल्यानंतर दोन मिनिटे वाफ येऊ द्यावी. भाजीत आपण शिजल्यानंतरच मीठ घालतो.

कारण कधी कधी सुरुवातीलाच मीठ घातल्याने भाजी शिजत नाही. आता आपली ढेमशाची भाजी खाण्यास तयार आहे.

(इथे कांदा किंवा टमाटर चा वापर केलेला नाही. कारण प्रत्येक भाजीची एक वेगळी चव असते. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकतात. पण शेंगदाण्याचे कूट तसेच अद्रक लसणाची पेस्ट ही घातलेली भाजी अत्यंत रुचकर लागते.)

तुम्ही चपाती सोबत भाकरी सोबत पराठे सोबत सुद्धा खाऊ शकतात. किंवा ही जीरा भातासोबतही रुचकर लागते.

(फोडणीसाठी तेल हे आपल्या प्रमाणानुसार आपण वापर करावा. कारण काही घरांमध्ये जास्त तेलातल्या भाज्या आवडतात तर काही घरांमध्ये कमी तेलातल्या भाज्या आवडतात. म्हणून मी इथे फोडणीसाठी तेल म्हटलेले आहे फक्त आपल्या नेहमीच्या वापराप्रमाणे आपण तेलाचा वापर करावा.)


टिप्स::

येथे भाजी बनवताना मी लांबोळके काप केलेले आहे. ही काप शिकण्यास अत्यंत सोपे जातात. व भाजी ही दिसायला एकदम झक्कास दिसते. वेगळ्या शेप मध्ये असल्यामुळे ती मुलांना खावी खावीशी वाटते. मुले सहसा भाजी खायला तयार होत नाही. भाज्यांमध्ये व्हिटॅमिन्स मुलांना मिळतच नाही. त्यामुळे तिचं आकर्षक दिसणं तितकंच महत्त्वाचं आहे.


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ:३० मिनिटे
एकूण वेळ::४५ मिनिटे
परिमाण: २जणांसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4319

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.