शेवग्याच्या शेंगांची झणझणीत मसालेदार रस्सा भाजी

by Vaishali Chaudhari

शेवग्याच्या शेंगांची झणझणीत मसालेदार रस्सा भाजी


प्रस्तावना::


मसाले रस्सा भाजी ही शेवग्याच्या शेंगा… झणझणीत अशा लागणाऱ्या आणि मसालेदार भाजीत थोडा खडे मसाले घालून केलेल्या शेवग्याच्या शेंगांची भाजी…. तसेच शेवगाच्या शेंगांमध्ये जीवनसत्वे आणि लोह भरपूर असतात… त्यामुळे हाडे मजबूत होतात तसेच कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह नियंत्रित राहते…..


साहित्य::

  • पाव किलो शेवग्याच्या शेंगा
  • दोन कांदे
  • पंधरा ते वीस खोबऱ्याचे काप
  • चार मद्रासचा चपाटा मिरच्या
  • दोन रसगुल्ला मिरच्या,
  • कोथिंबीर
  • आठ ते दहा लसूण पाकळ्या
  • अर्धा इंच अद्रकाचा तुकडा,
  • चारमिरे
  • चार लवंग
  • चार हिरवी वेलची,
  • छोटा दालचिनीचा तुकडा
  • एक तेजपान,
  • पाव चमचा हळद
  • एक चमचा तिखट
  • अर्धा चमचा धने पूड
  • जिरे मोहरी
  • फोडणीसाठी तेल


कृती::

सर्वप्रथम शेवग्याच्या शेंगाची साल काढून त्याचे काम करून घ्या. मी केलेले काम घेऊन घ्या. एका पातेल्यामध्ये शेवग्याच्या शेंगांचे काम पाणी आणि मीठ घालून दहा मिनिटे उकडून घ्या.

चटणीकृती::

कांदा चिरून घ्या. कांदा खरपूस तांबूस रंगावर भाजून घ्या. तसेच खोबऱ्याचे काप तांबूस रंगावर भाजून घ्या. मिरच्याही भाजून घ्या.

मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला कांदा खोबऱ्याचे काप भाजलेल्या लाल मिरच्या लसूण पाकळ्या अद्रकाचा तुकडा त्यानंतर मिरे लवंग दालचिनीचा तुकडा हिरवी वेलची या सर्व मिश्रण पाणी घालून बारीक चटणी वाटून घ्या…..

चटणी बारीक वाटल्यानंतर एका कढईमध्ये कडकडीत तेल गरम करा. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी फोडणीला घाला.

त्यानंतर एक तेजपान घाला. त्यामध्ये लाल चटणी घाला. आता हा मसाला चांगला परतून घ्या. यामध्ये पाव चमचा हळद, एक चमचा तिखट, पाव चमचा गरम मसाला घालून व्यवस्थित परतून घ्या. मसाला तेल सुटेपर्यंत परतवा..

चांगले दोन ते तीन मिनिटं परतवल्यानंतर आपल्या मसाल्याला तेल सुटले आहे… त्यामध्ये उकळलेल्या शेवग्याच्या शेंगा घाला.

त्यासोबत शेवग्याच्या शेंगांचे पाणी सुद्धा घाला. आणि साधारण दोन ते तीन वाट्या गरम पाणी करा आणि ते मसाल्यामध्ये घाला.

आता या भाजीला साधारण दोन ते तीन उकळ्या येऊ द्या. त्यावर झाकण ठेवा. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला.

चिरलेली कोथिंबीर घाला. त्यानंतर त्याला पुन्हा दोन ते तीन उकड्या येऊ द्या आणि मग गॅस बंद करा. आपली शेवग्याच्या शेंगांची मसाले भाजी तयार झाली आहे…

शेवगाच्या शेंगांची मसाले भाजी छान तर्री दार झाली आहे…. ही भाजी तुम्ही चपाती ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी तसेच भातासोबत खाऊ शकतात…

चला मग आपली शेवग्याच्या शेंगांची मसालेभाजी तयार झालेली आहे…..

(या भाजीमध्ये तुम्ही शेंगांचे काप केल्यानंतर धुवून त्यामध्येही तुम्ही शिजवू शकतात शेंगा वेगळ्या शिजवण्याची गरज नाही. पण मी इथे शेंगा शिजवून घेतलेल्या आहे कारण यामुळे भाजी लवकर बनते.. शेंगांचे पाणी सुद्धा भाजीमध्ये वापरलेले आहे.)


टिप्स::

आपण इथे भाजीवर झाकण अर्धवट ठेवायचे आहे कारण भाजीला तेल सुटण्यासाठी हे गरजेचे आहे आपण झाकण पूर्ण ठेवले तर भाजीचे तेल निघून जाते….. तसेच शेंगांचे उकडलेले पाणी भाजीमध्ये वापरायचे आहे कारण त्यामध्ये सगळी पौष्टिकता उतरलेली असते…


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ :१०मिनिटे
एकूण वेळ ३०मिनिटे
परिमाण: तीन व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4787

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.