भोपळ्याची कोरडी भाजी

प्रस्तावना::
भोपळा खाणे हा आरोग्यासाठी एकदम चांगला आहे त्यामध्ये भरपूर जीवनसत्वे आणि प्रथिने आहेत डोळ्यांसाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी भोपळा प्रत्येकाने खाणे आवश्यक आहे.
साहित्य:

- एक भोपळा
- एक कांदा
- एक टोमॅटो
- एक हिरवी मिरची
- चार ते पाच लसूण पाकळ्या,
- कोथिंबीर
- पाव चमचा हळद
- पाव चमचा धने पूड,
- पाव चमचा तिखट
- पाव चमचा गरम मसाला
- आणि चवीप्रमाणे मीठ
- फोडणीसाठी तेल
- जिरे मोहरी
कृती:
सर्वप्रथम भोपळा धुऊन घ्या. धुतल्यानंतर त्याला बारीक असा चिरून घ्या त्यानंतर कुकरमध्ये भोपळा आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ शिजवून घ्या.
या कुकरला चांगल्या चार ते पाच शिट्ट्या होऊ द्या भोपळा शिजायला वेळ लागतो त्यामुळे तो मऊसूत झालेला चांगला आहे.
कांदा चिरून घ्या. टोमॅटो चिरून घ्या मिरचीचे काप करून घ्या तसेच लसणाचे काप करून घ्या कोथिंबीर बारीक चिरून ठेवा.
एका कढईमध्ये कडकडीत तेल गरम करा तेल गरम होताच त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घाला. त्यामधील लसूण पाकळ्या चे काप मिरच्यांचे काप घालून चांगले परतवून घ्या.
आता त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो चांगला तांबूस रंगावर परतून घ्या. त्यानंतर या मिश्रणामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा तिखट पाव चमचा धने पूड पाव चमचा गरम मसाला घालून चांगले परतून घ्या.

या परतलेला मिश्रणामध्ये आपण जो भोपळा आणि हरभऱ्याच्या डाळ उकडलेले आहे हे मिश्रण घाला. आणि झाकण ठेवा चांगली चार ते पाच मिनिटं वाफ येऊ द्या.
वाफ आल्यानंतर मिश्रण हलवून घ्या. त्यामध्ये आपल्या चवीप्रमाणे मीठ घाला. मीठ घातल्यानंतर मिश्रण परतवून घ्या .
आणि त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला. एक वाफ आली की भाजी बंद करा आता आपली भोपळ्याची कोरडी भाजी तयार झालेली आहे……
ही भोपळ्याची कोरडी भाजी आपण चपाती किंवा ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यासोबत आपण खाऊ शकतो.

ही भाजी अत्यंत चवदार लागते त्यामुळे लहान मुलंही खातात. तुम्ही टिफिनमध्ये मुलांना ही चपाती भाजी देऊ शकतात.
टिप्स::
भोपळ्याची भाजी वाफवताना चांगल्या चार ते पाच शिट्या होऊ द्या कारण भोपळा शिजायला वेळ लागतो त्यामुळे कमीत कमी चार शिट्ट्या तरी होऊच द्या.
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ :१५मिनिटे
एकूण वेळ:३० मिनिटे
परिमाण:२ व्यक्तींसाठी
