लोणचे: लिंबूचे सोपे आंबट गोड लोणचे Easy sour sweet pickles of lemon

लिंबूचे सोपे असे आंबट गोड लोणचे
प्रस्तावना:: लिंबूचे लोणचे हे आंबट गोड असल्यामुळे सर्वांनाच आवडते तसेच त्यामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म खूप आहेत… त्यामुळे लिंबूचे लोणचे नक्की घाला…
साहित्य::

- अर्धा किलो लिंबू
- एक वाटी साखर
- अर्धी वाटी तेल
- दोन चमचे तिखट
- तीन चमचे मीठ
- दोन चमचे हळद
- पाव चमचा हिंग
- पाणी
कृती::
लिंबू स्वच्छ धुऊन घ्या. एका पातेल्यामध्ये साधारण दोन ते तीन ग्लास पाणी चांगले कडकडीत गरम करून घ्या..
त्यामध्ये लिंबू भिजत घाला. एक दिवस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते गरम पाण्यातले लिंबू काढून घ्या आणि पाणी फेकून द्या.
पुन्हा गरम पाणी करा आणि त्यामध्ये दुसऱ्या दिवशीही लिंबू ठेवा. आता तिसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला पाणी बदलवून घ्यायचे आहे.
पुन्हा गरम पाणी करून त्यामध्ये लिंब एक दिवस आणखी भिजत घालायची आहे. अशी सलग तीन दिवस आपल्याला लिंबू पाण्यामध्ये ठेवायचे आहेत.
आपण गरम पाण्यामध्ये लिंबू यासाठी तीन ते चार दिवस ठेवतो त्यामुळे लिंबाच्या सालमधील कडवटपणा निघून जातो..
आणि लिंबाचे फूतर खाण्यास कडू लागत नाही. आता चौथ्या दिवशी आपण पुन्हा लिंबू स्वच्छ धुऊन घ्या. एका रुमाल घ्या.आणि ती व्यवस्थित कोरडे करून घ्या..
लिंबू एकदम कोरडे केल्यानंतर लिंबू मध्यभागातून कापून त्याच्या चार चार फोडी करा. त्यामधील बिया वेगळ्या करा.
लिंबाचा रस सोबतच राहू द्या.. आपण लिंबाच्या रसाचा सुद्धा वापर करणार आहे. लिंबाच्या फोडी केल्यानंतर एका डिशमध्ये त्या ठेवा.

या डिश मधल्या फोडींवर एक वाटी साखर पसरवून द्या. आता या फोडी एका छोट्या तगारीमध्ये किंवा मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्या.
एका कढईमध्ये कडकडीत तेल गरम करा. त्यामध्ये तेल थोडे कोमट झाले की त्यामध्ये दोन चमचे हळद दोन चमचे तिखट पाव चमचा हिंग तीन चमचे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या..

तेल थंड झाले की हे तेल तगारीतल्या लिंबूच्या फोडींवर घाला आणि लिंबू व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता हे मिश्रण दोन ते तीन दिवस पातेल्यामध्ये किंवा तगारीत मध्ये राहू द्या.

अधून मधून मिश्रण ढवळत रहा.. तीन दिवसानंतर एका काचेच्या बरणीमध्ये लिंबाचे लोणचे भरून घ्या.. आता आपले लिंबाचे लोणचे तयार झालेले आहे.
यामध्ये मी साखरेचा वापर केलेला आहे तुम्हाला जर गूळ आवडत असल्यास तुम्ही याच प्रमाणामध्ये एक वाटी किंवा दीड वाटी गूळ वापरू शकतात…
गूळ वापरताना थोडा जास्त वापरावा लागतो त्यामुळे तुम्ही दीड वाटी सुद्धा घातला तरी लोणचे छान लागेल..
आणि लिंबाचे लोणचे अधून मधून ढवळत रहात जा.. हे लिंबाचे लोणचे साधारण वर्षभर टिकते…

टिप्स::
लिंबू साधारण चार दिवस गरम पाण्यामध्ये सतत भिजत ठेवावे त्यामुळे लिंबाच्या साल मधील कडवटपणा निघून जातो….
वेळ व परिमाण:;
तयारीची वेळ::३ दिवस
एकूण वेळ: चार दिवस
परिमाण:१ बरणी
लोणचे: लिंबूचे आंबट गोड लोणचे Part ii
लोणचे: लिंबूचे आंबट गोड लोणचे Part iii
लोणचे: लिंबूचे सोपे आंबट गोड लोणचे Easy sour sweet pickles of lemon
