एगलेस चॉकलेट केक

by Vaishali Chaudhari
282 views

एगलेस चॉकलेट केक

प्रस्तावना::

केक म्हटला म्हणजे तोंडाला पाणी सुटलेच पाहिजे. मोठ्यांपासून लहानांपर्यंत लहानांपासून मोठ्यांपर्यंत.. कुणाकुणाला आवडतो हो केक…. सर्वांच्या तोंडावर हो असेल.. चला तर मग आपण एगलेस चॉकलेट केक ची रेसिपी बघूया…

🧺 साहित्य::

मैदा – 1½ कप

कोको सिरप– ¼ कप

चीनी पाउडर – 1 कप

दूध – 1 कप

तेल – ½ कप

दही – ½ कप

बेकिंग पाउडर – 1 छोटी चम्मच

वैनिला एसेंस – 1 छोटी चम्मच


कृती:::


सर्व साहित्य मापशील काढून ठेवा. केक ठेवण्यासाठी मी इथे केकच्या भांड्याचा वापर केलेला आहे.

त्याला एखादी डिश आहे त्यामध्ये आपण जाड मीठ किंवा वाळूचा ही वापर करू शकतो. त्या डिशमध्ये जाड मीठ घालून गॅसवर मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवून द्या.

एका पातेल्यामध्ये दही आणि बारीक केलेली साखर सतत फेटून घ्या. दही साखर पेटल्यानंतर त्यामध्ये तेल घालून फेटून घ्या.

त्यामध्ये चॉकलेट सिरप घालून चांगले फेटून घ्या. त्यामध्ये मैदा घालून मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या. केकचे मिश्रण कधीही फेटांना एका दिशेनेस भेटले गेले पाहिजे. हे मिश्रण चांगले फेटले त्यामध्ये लागेल त्याप्रमाणे दूध घाला.

आणि दूध घालून पातळसर मिश्रण ठेवा जास्त पातळही नको आणि घट्टही नको. आता त्यामध्ये एक चमचा व्हॅनिला इसेन्स घालून घ्या.

आणि केकचे मिश्रण पुन्हा एकदा फेटून घ्या. तिच्या मिश्रणामध्ये दीड चमचा बेकिंग पावडर घाला आणि आणि ते मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या.

हे मिश्रण चार ते पाच फेर घेऊन इतकेच फेटा. आता केकच्या भांड्याला तेलाचा हात लावून घ्या. त्यावर मैदा भुरभुरवून घ्या.

त्यामध्ये हे फेटलेले केकचे मिश्रण घाला. काजू आणि बदाम चे तुकडे करून घ्या त्यावर थोडा मैदा भुरभुरवा.

काजू बदाम चे तुकडे यामध्ये मैदा यासाठी घालतो की केक वाफवताना काजू-बदामाचे तुकडे केकच्या तळाशी जाऊ नये.

आता हे काजू-बदामाचे तुकडे केचा मिश्रणावर पसरवा. आता केकचे भांडे दोन ते तीन वेळा टॅप करून घ्या.

त्याच्यामध्ये एअर बबल्स राहणार नाहीत. आपण पूर्वी केलेल्या तयारी मध्ये केकच्या डिशमध्ये मीठ गरम करायला ठेवलेले आहे, त्यावर हे केकचे भांडे अलगद ठेवा.

आता केक वर झाकण ठेवा. तीस ते पस्तीस मिनिटे मंद आचेवर हा केक वाफवून घ्या.

तसेच आपल्याला गॅसवर केक ठेवायचा नसल्यास ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सियस सेट करून त्यामध्ये तीस मिनिटे केक ठेवावा.

30 ते 35 मिनिटे झाल्यानंतर केक मध्ये एक टूथपिक घालून बघावी. ती टूथपिक अगदी स्वच्छ निघाली तर समजावे की केक झालेला आहे.

आपला केक चिकटला ना म्हणजे तो पूर्ण पणे तयार झालेला आहे. हा केक पूर्णपणे थंड होऊ द्या.

त्यानंतर एका डिशमध्ये केकचे भांडे पालथे घालून मागील बाजूस ठोकून केक काढून घ्या. आता आपला चॉकलेट केक खाण्यास तयार आहे.

यामध्ये कोको पावडर च्या ऐवजी मी कोको सिरपचा वापर केलेला आहे. तुम्ही येथे कोको पावडर चा सुद्धा वापर करू शकतात.

किंवा आवडत असल्यास साखर बारीक करताना त्यामध्ये बॉर्नविटाची पावडर सुद्धा तुम्ही घालू शकतात. येथे बारीक पिठीसाखरचाच वापर आपण केलेला आहे.


टिप्स::

केक तयार करताना कधीही आपण एकाच दिशेने भेटूया. कारण केक फुलण्यासाठी एकाच दिशेने फेटले तरी योग्य रीतीने केक फुलून येतो. बेकिंग पावडर टाकल्यानंतर कधीही केक जास्त फेटू नये कारण फुलून आलेले मिश्रण बसण्याची शक्यता असते.


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ: ३०मिनिटे
एकूण वेळ:१ तास २० मिनिटे
परिमाण:५जणांसाठी

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

7698

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.