फ्लावर बटाटा मिक्स भाजी
प्रस्तावना:
डब्यामध्ये कोरडी भाजी नेण्यास सोयीस्कर होते. लहान मुलांना फ्लावर बटाटा मिक्स भाजी आवडते.
साहित्य:

- पाव किलो फ्लावर,
- दोन बटाटे,
- आठ ते दहा हिरव्या मिरच्या,
- एक टोमॅटो,
- एक कांदा,
- सात ते आठ लसूण पाकळ्या,
- अर्धा इंच अद्रक,
- जिरे मोहरी,
- फोडणीसाठी तेल,
- पाव टी स्पून हळद,
- पाव टीस्पून तिखट,
- मीठ,
कृती:
फ्लावर बटाटा चिरून घेणे. फ्लावर बटाटा गरम पाण्यामध्ये धुऊन घेणे.
कांदा व टोमॅटो बारीक चिरून घेणे. अद्रक लसूण ची पेस्ट करून घेणे.
हिरव्या मिरच्यांचे काप करून घेणे.
एका कढईमध्ये तेल गरम करावे त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घालावी.
त्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे काप,चिरलेला कांदा, टोमॅटो परतून घ्यावे. तांबूस रंगावर झाल्यानंतर त्यामध्ये हळद तिखट घालावे.
फ्लावर बटाटा घालून परतून घ्यावे.
त्यावर झाकण ठेवावे. पाच मिनिटे वाफले गेल्यानंतर भाजी शिजली की नाही हे बघा.
भाजी शिजल्यानंतर त्यावर चवीप्रमाणे मीठ घालावे.
पुन्हा एक मिनिटे वाफ येऊ द्यावी. नंतर भाजी चिरलेली कोथिंबीर घालावी. आपली फ्लावर बटाट्याची मिक्स भाजी आता तयार आहे.

टिप्स:
भाजी ही अर्धवट शिजल्यावरच मीठ घालावे. कारण लवकर मीठ घातल्यास भाजी शिजत नाही.
वेळ व परिमाण:
तयारीची वेळ:२० मिनिटे
एकूण वेळ : ४०मिनिटे
परिमाण: ३ जणांसाठी
