🥘 १. रेसिपीचं नाव
लाल – भोपळा भाजी
📸 २. फोटो / फीचर्ड इमेज :

✨ ३. प्रस्तावना
हा खाद्य पदार्थ सर्व ऋतूत बनवतात,
📝 ४. साहित्य (Ingredients)

पाव किलो लाल भोपळा (गंगाफळ), पाच हिरवी मिरची छ लसूण पाकळी अर्धा इंच आले तुकडा, कढीपत्ता कोथींबीर, हळद, गरम मसाला मीठ चवीप्रमाणे धना पूड, जीरे मोहरी, टेबलस्पून तेल,
🔥 ५. कृती (Steps)
स्वच्छ धुवून तेल घालून धुवून घेणे बारीक कापून घेणे,बारीक कापल्यामुळे काम आपण लवकर शिजायला मदत होते.
गंगा फळाचा बाहेरचा हिरवा भाग हा कडक असतो म्हणून बारीक कापावे
कढाई मध्ये तेल कडकडी गरम करावे त्यामध्ये जिरे मोहरी फोडणी घालावी
कढाईत तेल फोडणीत कढीपत्ता मिरचीचे काप घालणे,मिरची चांगली तांबूस रंगावर परतून घ्यावी.
आले लसणाची पेस्ट घालून परतवा.अद्रक लसणाची पेस्ट जास्त लाल होऊ देऊ नका कारण ती कडवट लागेल.
नंतरत्यामध्ये पाव चमचा हळद घाला आणि चांगले परतून घ्या नंतर त्यामध्ये पाव चमचा गरम मसाला घाला चांगला परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये कापलेल्या गंगा फळाच्या फोडी घालून चांगले परतून घ्या.
नंतर भाजीवर झाकण ठेवून अधून मधून परतवत रहा.भाजी चांगली शिजत आली किंवा नरम झाली की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला.
(भाजीत मीठ लगेच टाकल्याने कधी कधी भाजी शिजत नाही म्हणून भाजी ज्यावेळेस शिजत येते त्यानंतरच त्यामध्ये मीठ घालावे.)
भोपळा, शिजला की त्यात चिस्लेली कोथींबीर घाला.
लाल भोपळा भाजी तयार.भाजी शिजण्यासाठी तुम्ही कुकरमध्येही लावू शकतात परंतु ती लागणार नाही याची काळजी घ्यावी. कुकरमध्ये दोन शिट्ट्यांमध्ये भाजी शिजते.या भाजीमध्ये तुम्ही हिरव्या मिरची ऐवजी लाल तिखटाचाही वापर करू शकतात. आपण लाल तिखट एक चमचा याप्रमाणे घालू शकतो.

(सर्व साहित्य मेझरींग कप व बाकी स्पून ने मेझर केलेले आहे)
💡 ६. टिप्स (Cooking Tips)
ही भोपळ्याची भाजी तुम्ही चपाती सोबत किंवा फुलक्यांसोबत खाऊ शकतात. वरण पोळी गंगा फळाची भाजी असे रुचकर जेवण होते. यामध्ये घडलेली गंगा फळाची भाजी केली जाते वरण बट्टी सोबत सुद्धा गंगा फळाची भाजी खाल्ली जाते. चतुर्मासामध्ये बरीच व्यक्ती वांगे खात नाही त्यामुळे वांगे गंगाफळाची भाजी केली जाते.
