गरमागरम मऊसूद आणि झणझणीत साबुदाणा खिचडी

प्रस्तावना::
साबुदाणा खिचडी ही सर्वांनाच आवडते उपवास असो किंवा नसो तरीही आपल्याला ती खायला आवडते त्यामध्ये भरपूर सारे प्रकार आहेत त्याबद्दल लाल तिखट वापरले जाते. तसेच हिरव्या मिरच्या वापरल्या जातात तर आपण आज एक नवीन प्रकार बघणार आहे .
साहित्य::

- दोन वाट्या साबुदाणा
- दोन बटाटे
- एक वाटी बारीक असे शेंगदाणा कूट
- चार ते पाच हिरव्या मिरच्या
- जिरे
- मीठ
- तेल
कृती::
साबुदाणा रात्री दोन वाट्या घेऊन त्यामध्ये साधारण तीन वाट्या पाणी इतके घालून भिजत ठेवा. साबुदाणा रात्री भिजल्यानंतर तो सकाळी करावा.
आता आपला साबुदाणा भिजलेला आहे. दोन बटाटे सोलून बारीक असे काप करून घ्या. आपण मिरचीचा जाडसर पेस्ट मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत.
त्यानंतर एका पातेल्यामध्ये साबुदाणा घ्या त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला शेंगदाणा कूट घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या.
साबुदाणा एकत्र व्यवस्थित करावा. मीठ हे थोडे कमीच घालावे कारण आपण बटाट्या परतवताना सुद्धा मीठ घालणार आहे.
आता एका कढईमध्ये कडकडीत तेल गरम करा. कडकडीत तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे घाला. जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये बटाट्याचे काप घाला.

बटाट्याच्या काप वर थोडे मीठ घाला. त्यानंतर बटाट्यावर झाकण ठेवा चांगली 20 ते 30 सेकंद बटाटा वाफवून घ्या.
आता आपले बटाटे शिजले का ते बघून घ्या. त्यानंतर त्यामध्ये मिरचीची जाड अशी पेस्ट घाला आणि व्यवस्थित परतून घ्या.
मिरचीची पेस्ट चांगली परतल्यानंतर त्यामध्ये आपण साबुदाणा घालू. साबुदाणा घातल्यानंतर चांगला खालून वरून परतून व्यवस्थित मिक्स करा.
त्यामध्ये तुम्हाला शेंगदाणा कूट कमी वाटत असल्यास थोडे घालू शकतात. आता यावर दोन मिनिटे झाकण ठेवा.
अधून मधून झाकण काढून साबुदाणा खालचा वर करा. साबुदाणा परतत राहावा नाहीतर तो कडेला चिकटेल.
साबुदाणा दोन ते तीन मिनिट वाफल्यानंतर झाकण काढून टाका आता आपल्या साबुदाणा व्यवस्थित वाफलेला आहे.

(आपण लाल मिरचीचा किंवा हिरव्या मिरचीचा काप करून साबुदाणा नेहमीच बनवतो या मिरचीच्या जाडसर खर्ड्याचा साबुदाणा एकदम चविष्ट लागतो…..)
आता हा साबुदाणा तुम्ही खाण्यास तयार झालेला आहे…… हा साबुदाणा एकदम मऊ सूद तयार होतो….
चला मैत्रिणींनो आपल्या मऊसूद साबुदाणा खिचडी खाण्यास तयार झालेला आहे….. तर तुम्हाला आजचा साबुदाणा खिचडी कशी वाटली…..
टिप्स::
यामध्ये बटाटे मी फ्राय करून घातलेले आहे. त्याऐवजी तुम्ही बटाटे उकडून ते सोलून त्याचे काप करून सुद्धा घालू शकतात. यामुळे साबुदाण्यामध्ये एक ओलसरपणा निर्माण होतो. त्यामुळे साबुदाणा मऊसूद होतो.
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ :२०मिनिटे
परिमाण: दोन व्यक्तीसाठी
