गरमागरम पोळ्या पासून झटपट केलेला गोड असा गुळाचा चुरमा….
प्रस्तावना:
कधीकधी लहान मुलांना खूप भूक लागलेली असते अशा वेळेस झटपट तयार होणारी रेसिपी हवी असते .आणि गोड तर मुलांना आवडतेस. त्यामुळे हाच चुरमा मुलांना खूप आवडतो. तसेच मोठ्यांनाही आवडतो तर बघूया मग आपण चुरम्याची रेसिपी……
इथे मी गुळाचा वापर केलेला आहे कारण गुळ हा आरोग्यास चांगला असतो त्यामुळे तुम्ही हा चुरमात थंडीत नेहमी खाऊ शकतात…
साहित्य:

- एक वाटी कणीक
- चार ते पाच चमचे सेंद्रिय गुळ पावडर/पिठीसाखर
- अर्धी वाटी साजूक तूप
- दोन ते तीन
- बदाम दोन ते तीन काजू.
कृती::
एका परातीमध्ये पाणी घालून कणीक मळून घ्या.. कणिक मळून साधारण दोन पोळ्या करून घ्या..
इथे पोळ्या करताना सुद्धा तुम्ही साजूकच तूप लावा .आपण पोळ्या करताना तेल लावतो त्याऐवजी तूपच लावा.पोळ्या तयार झाल्यानंतर आपण पोळीचे तुकडे करून घेणार आहे.
पोळीचे बारीक बारीक असे तुकडे करून घ्या. पोळीचे बारीक तुकडे केल्यानंतर थोडे थोडे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर भरडा करा..
त्यानंतर याप्रमाणे थोड्या थोड्या पोळ्यांचे तुकडे घालून मिक्सरमध्ये जाडसर भरडा करून घ्या. आता एका भांड्यामध्ये हा भरडा काढून घ्या.

आणि त्यामध्ये चार ते पाच चमचे गूळ पावडर घाला… गुळ पावडर घातल्यानंतर त्यामध्ये चार ते पाच चम्मच तूप घाला.
हे तूप गरम वितळलेले हवे. गरम करून घ्या आणि मगच चुरम्यामध्ये घाला. त्यानंतर काजू आणि बदाम जाडसर कुटून घेतले आहे हेच बदाम आणि काजूचे कूट चूरम्यामध्ये घाला.
आणि सर्व चुरम्याचे मिश्रण व्यवस्थित चमच्याने एकत्र करून घ्या. यामध्ये आपल्याला जास्त तूप आवडत असल्यास चार ते पाच चमचे ऐवजी अजून दोन ते तीन चमचे जास्त तूप घालावे.
आणि आपल्याला गोड आवडत असल्यास मी इथे गुळ कमी वापरलेला आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही गुळाचे प्रमाण अजून दोन चमचे वाढवू शकतात…

काहींना गुळ आवडत नाही तर तुम्ही या जागी पिठीसाखरेचा सुद्धा वापर करू शकतात. पिठीसाखरेचा चुरमा सुद्धा अत्यंत चवदार लागतो…
पण मात्र जाडसाखरेचा येथे तुम्ही वापर करू नका… पिठीसाखरेचाच वापर करा… तसेच इथे मी सेंद्रिय गुळाचा वापर केलेला आहे .
तुमच्याकडे जो गूळ आहे तो सुद्धा तुम्ही वापरून घेऊ शकतात फक्त वापरताना तो गूळ बारीक असा किसून घ्यावा.
त्याचे तुकडे ठेवू नये म्हणजे चूरम्यामध्ये मिक्स करताना सोपे जाते….. आपला साजूक तुपाचा गुळाचा चुरमा तयार झालेला आहे………
टिप्स::

.पोळीचे तुकडे करण्याचे कारण असे की आपण पोळीचे जाडसर तुकडे केले तर मिक्सरचे भांडे लगेच बिघडते.. त्यामुळे पोरीचे लहान लहान तुकडे करूनच मग त्याचा जाडसर भरडा करावा.
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ :५मिनिटे
एकूण वेळ :१०मिनिटे
परिमाण: एक व्यक्तीसाठी
