हॉटेल स्टाईल टोमॅटो सूप

प्रस्तावना::
टोमॅटोचे सूत्र सर्वांनाच आवडते पण ज्यावेळेस आपण हॉटेलमध्ये जाऊन ही सुख पितो त्यावेळेस म्हणतो अशी सूप घरी का नाही बनत… तर त्या हॉटेलच्या पद्धतीने तयार होणारे सूप आपण आज बघणार आहे..
साहित्य::

- दीड किलो टोमॅटो (१५०० ग्रॅम)
- अर्धा किलो गाजर (५०० ग्रॅम)
- एक वाटी गूळ
- दोन तेजपान
- 20 मिरे
- दहा ते बारा लसूण पाकळ्या
- अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
- पाच ते सहा स्लाईस ब्रेड
- एक ते दोन चमचे साजूक तूप
- पाव चमचा जिरे
- दोन चमचे कॉर्नफ्लॉवर
- चवीप्रमाणे मीठ
- पाव चमचा हिंग
- पाणी
कृती::
टोमॅटो स्वच्छ धुऊन घ्या. गाजर ही स्वच्छ धुऊन घ्या आणि ते सोलून घ्या. गजराच्या गोल चकत्या करून घ्या.
आता गाजर आणि टोमॅटो कुकरमध्ये दोन शिट्या घेऊन उकडून घ्या. कुकरची वाफ निघाल्यानंतर गाजर आणि टोमॅटो वेगळे करा.

इथे गाजर आणि टोमॅटो आपण धुवून घेतलेले आहे त्यामुळे आपण शिजवलेल्या गाजराच्या आणि टोमॅटोचे पाणी सुपा मध्ये वापरणार आहे.
आता टोमॅटो व्यवस्थित सोलून घ्या त्यातील बिया काढून घ्या. गाजराचे चकत्या थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट करून घ्या.
तसेच टोमॅटोचे काप करून घ्या आणि त्यामधील बियर काढल्यानंतर तेही मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या. नंतर लसूण अद्रक आणि थोडी टोमॅटोची प्युरी घालून त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्या…

मिरची खलबत्त्यामध्ये बारीक अशी पूड करून घ्या…कढईमध्ये किंवा पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घाला.
त्यामध्ये जिरे घाला. जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये तेजपान घाला. त्यानंतर हिंग घाला. मिरे पूड घाला… मिरेपूड वापरल्यामुळे टोमॅटो सूपला एक छानशी चव येते आणि टोमॅटो सूप मध्ये तिखटपणा येतो …
तुम्हाला जर थोडे तिखट सूप हवे असल्यास तुम्ही साधारण अर्धा चमचा इतके लाल तिखट घालू शकतात….
मिरे पुड घातल्यानंतर जे मिश्रण आपण अद्रक लसूण याचे सर्वात शेवटी केलेले आहे ते मिश्रण परतवून घ्या.
त्यानंतर टोमॅटो आणि गाजराची प्युरी एकत्र घाला आणि व्यवस्थित ढवळून घ्या. यामध्ये एक वाटी गूळ घाला.

सर्व मिश्रण ढवळल्यानंतर त्यामध्ये पाणी घाला. हे पाणी ज्यावेळेस आपण गाजर आणि टोमॅटो उकडलेले होते त्या पाण्याचा वापर तुम्ही करून घ्या.
अजून तुम्हाला पाण्याची आवश्यकता वाटत असल्यास तुम्ही गरम पाणी यामध्ये वापरू शकतात.. त्यानंतर एका वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालून त्यामध्ये थोडे पाणी घाला..
आणि त्याची पेस्ट करून घ्या. ही पेस्ट ज्यावेळेस टोमॅटो सूपला दोन ते तीन उकड्या येतील तेव्हा त्यामध्ये घाला.
आता आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घातल्यानंतर व्यवस्थित एकत्र करून घ्या. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला.
टोमॅटो सूपला दोन ते तीन उकळ्या पुन्हा येऊ द्या. आपले टोमॅटो सूप तयार झालेले आहे… तुम्हाला कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालायची नसल्यास तुम्ही त्या ऐवजी पाणी कमी घालून सूप घट्ट ठेवू शकतात.
आपण यामध्ये गाजराचा वापर केल्यामुळे त्याला एक घट्टसरपणा आणि छान अशी चव येते… आपली गरमागरम टोमॅटोची सूप आता तयार झालेले आहे…
आता आपण ज्या ब्रेडच्या स्लाईस घेतलेले आहे त्या चौकोनी शेप मध्ये छोटे छोटे पिसेस मध्ये कट करून घ्या..
एका पॅनमध्ये साजूक तूप घाला त्यात तुपामध्ये ब्रेडचे काप दोघ बाजूने चांगले व्यवस्थित भाजून घ्या… आपले टोमॅटो सूप तयार झालेले आहेत हे टोमॅटो सूप सर्व्ह करताना त्यावर हे ब्रेडचे तुकडे घाला…
आपले हॉटेल स्टाईल टोमॅटोची सूप आता तयार झालेले आहे…..

टिप्स::
इथे कॉर्नफ्लॉवरचा वापर आपण टोमॅटो सूप घट्टसर होण्यासाठी केलेला आहे. इथे मी गुळाचा वापर केलेला आहे तुम्हाला गूळ वापरायचा नसल्यास तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकतात..
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ २० मिनिटे
एकूण वेळ :३०मिनिटे
परिमाण: ६ व्यक्तींसाठी
