कच्च्या केळ्याचे मऊमऊ झणझणीत तोंडाला चव आणणारे असे थालीपीठ

by Vaishali Chaudhari

कच्च्या केळ्याचे मऊमऊ झणझणीत तोंडाला चव आणणारे असे थालीपीठ


प्रस्तावना:

आपण केळीची भाजी मागच्या रेसिपी मध्ये बघितलीच आहे केळी पासून अनेक पदार्थ बनवले जातात त्यातला हा एक पदार्थ आहे कच्च्या केळीचे थालीपीठ…..


साहित्य::

  • चार कच्ची केळी,
  • अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट,
  • एक चमचा जिरे
  • एक चमचा ओवा
  • चवी प्रमाणे मीठ
  • तेल


कृती::

सर्वप्रथम केळी धुवून घ्या केळीचे वरचे साल सुरीच्या साह्याने काढून घ्या केळे व्यवस्थित सोलून घ्या. त्यानंतर केळ्याचे काप करून घ्या.

तव्यावर शेंगदाणे खरपूस भाजून घ्या. आणि मिक्सरमध्ये त्याचे कूट करून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कच्च्या केळाचे केलेले काप थोडे घाला.

आणि पाणी न वापरताच मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट करून घ्या. आता ती पातेल्यात काढून घ्या याप्रमाणे उरलेल्या केळ्यांच्या काप केलेले आहे.

त्याचे सुद्धा बारीक असेल मिक्सरमध्ये मिश्रण करून घ्या. आणि शेवटच्या मिश्रणामध्ये आठ हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची केळ्यासोबत बारीक पेस्ट करून घ्या.

या मिक्सर या मिरच्या केळ्यासोबत आपण बारीक यासाठी केल्या की ते मिश्रण एकदम बारीक होईल आणि मिरच्या एकदम बारीक वाटल्या जातील.

आता हे मिश्रण एका पातेल्यात काढून घ्या. केळ्याच्या मिश्रणामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट घाला. मिश्रणामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला.

मिश्रण चांगले एकजीव करून घ्या या. मिश्रण पातळ करण्यासाठी तुम्ही त्यामध्ये पाणी घाला मिश्रण जास्त पातळ होऊ नये म्हणून अर्धी वाटी पाणी घाला.

आणि मिश्रण चांगले फेटून घ्या. मिश्रणाची कन्सिस्टन्सी ही घट्टच असली पाहिजे. आता थालीपीठ करण्यासाठी मी इथे कहाली चा वापर करत आहे.

तुमच्याकडे निरलेप पॅन असेल त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकतात. आता मी कहाली गॅसवर तापायला ठेवलेली आहे.

त्यावर तेल पसरवून घेऊ आता ज्याप्रमाणे आपण डोसा घालतो त्याप्रमाणे एक चमचा मिश्रण घाला आणि सराट्याच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने हे मिश्रण डोशाप्रमाणे पसरवून घ्या.

आणि पसरवल्यानंतर त्यावर दहा ते पंधरा सेकंद झाकण ठेवा. आता झाकण काढून आपल्याला थालीपीठ पलटवायचे आहे.

त्यावर वरून थोडे तेल सोडा. दोन्ही बाजूने थालीपीठ चांगले भाजून घ्या. आता आपले थालीपीठ तयार झालेले आहे…..

ते डिश मध्ये काढून घ्या…. याप्रमाणे बाकीच्या मिश्रणाचे सुद्धा थालीपीठ करून घ्या …. आपण यामध्ये शेंगदाणे कुट्याचा यासाठी वापर केलेला आहे की मिश्रण चांगले एकसंध होते…..

आणि थालीपीठालाही चव उत्तम येते….. आता आपले केळीचे थालीपीठ तयार झाले आहे…. हे थालीपीठ तुम्ही शेंगदाण्याच्या चटणी सोबत किंवा दही सोबत खाऊ शकतात……


टिप्स::

इथे तुम्ही कच्च्या केळीच्या मिश्रणामध्ये भिजवलेला साबुदाणा अर्धी वाटी घालून मिक्सरमध्ये वाटून त्या मिश्रणात मिक्स करू शकतात .यामुळे मिश्रणाला एक चिकटपणा निर्माण होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4787

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.