कारल्याची भाजी

by Vaishali Chaudhari
2 views

कारल्याची भाजी पण कडसाळपणा कमी असणारी

प्रस्तावना::

कारल्याची भाजी म्हटलं की सर्वांना नको असते…. पण तीच जर भाजी मधील कडवटपणा जर कमी लागला तर भाजी कोणीही खाईल अशी….
साहित्य:: पाव किलो कारले चार मिरच्या कोथिंबीर दहा ते बारा लसूण पाकळ्या अर्धा इंच अद्रकाचा तुकडा अर्धी वाटी शेंगदाणे पाव चमचा हळद एक चमचा तिखट दोन ते तीन चिंचेचे बटुक चार ते पाच लहानगुळाचे खडे मीठ फोडणीसाठी तेल

कृती:::

कारले स्वच्छ धुऊन गोल चकत्या कापून घ्या… चिरलेल्या कारल्यांना मीठ लावून घ्या… आणि अर्धा तास तसेच ठेवून द्या… आता कांदा बारीक चिरून घ्या अद्रक लसणाची पेस्ट करून घ्या… मिरचीचे काप करून घ्या… कढईमध्ये तेल गरम करून घ्या… त्यामध्ये जिरे मोहरी घाला.. मिरचीचे काप घाला परतवून घ्या…. त्यानंतर त्यामध्ये कांदा परतून घ्या… अद्रक लसणाची पेस्ट घालून परतून घ्या… पाव चमचा हळद एक चमचा तिखट घालून परतून घ्या…. आता या मिश्रणामध्ये चिरलेले कारले घाला… आणि दहा मिनिटे वाफवून घ्या… त्यामध्ये चिंच आणि गूळ घाला…. अधून मधून मिक्स करून म्हणजेच ढवळून घेत जा… म्हणजे भाजी लागणार नाही…. आता आपले चवीप्रमाणे मीठ घाला…. कोथिंबीर घाला….. पुन्हा पाच मिनिटे भाजी वाफवून घ्या… आपली कारल्याची आंबट गोड चटपटीत अशी भाजी तयार झालेली आहे…. तुम्ही पोळी सोबत चपाती सोबत फुलक्या सोबत खाऊ शकता… गरमागरम कारल्याची भाजी….

टिप्स:::

चिंच आणि गूळ करण्याच्या भाजीमध्ये आवश्य घालावे त्यामुळे कडवटपणा कमी होतो… तसेच कारल्यांना मीठ लावून ठेवावे मी त्यामध्ये मुरले की त्यामधील कडवटपणा कमी होण्यास मदत होते….
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ :४०मिनिटे
परिमाण:दोन व्यक्तीसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

7507

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.