कुरडईची कोडी भाजी

प्रस्तावना:::
कोड्याचे कोरडी भाजी ही आमच्या आजीच्या काळापासून बनवत आलेली भाजी आहे. काही भाजी नसल्यास झटपट तयार होणारी अशी ही भाजी आहे तसेच लहान मुलांना ही भाजी फारच आवडते. आंब्याच्या रसांच्या दिवसावर तर ही भाजी खास करून केली जाते.
साहित्य:

- पाच ते सहा कुरडया
- एक कांदा
- चार हिरव्या मिरच्या
- कोथिंबीर
- पाव चमचा हळद
- पाव चमचा तिखट
- चवीप्रमाणे मीठ
- फोडणीसाठी तेल
- आणि पाणी
- जिरे मोहरी
- कृती::
- कुरडई म्हणजे उन्हाळ्यातील वाळवणाचा पदार्थ. हा वाळवण्याचा पदार्थ उन्हाळ्यामध्ये केला जातो या कुरडया तळून खाल्ल्या जातात किंवा त्याची भाजी सुद्धा केली जाते.
- उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या रसासोबत कुरडई पापड तळतात.
- या कोरडे झालेल्या कुरडया यांची आज आपण भाजी बघणार आहोत.
- एक कांदा सोलून बारीक असा चिरून घ्या. मिरचीचे तुकडे करून घ्या.
- कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घ्या. सहा कुर ड्यांचे हाताने तुकडे करून घ्या.
- आता एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या. त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घाला जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये मिरच्या परतून घ्या.
- आता या मिश्रणामध्ये कांदा तांबूस रंग होईपर्यंत परतून घ्या. कांदा चांगला तांबूस रंगापर्यंत परतला की मग त्यामध्ये हळद तिखट आणि कुरडई चे तुकडे घालणार आहोत.

- एका पातेल्यामध्ये दुसऱ्या गॅसवर गरम पाणी करून घ्या. आताही गरम झालेले पाणी कुरडईच्या मिश्रणामध्ये घाला.
- कुरडई पाण्यामध्ये भिजेल इतपत ते पाणी घाला. आता या भाजीवर पाच मिनिटे झाकण ठेवा.
- अधून मधून भाजी चमच्याने हलवत राहा. कुरडई हाताने चेपून बघा. कच्ची वाटत असल्यास त्यामध्ये अजून थोडे गरम पाणी घाला.

- आता या मिश्रणामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला आणि दोन मिनिटे झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्या.
- वरून चिरलेली कोथिंबीर घाला आणि झाकण तसेच राहू द्या. पाणी हे इतपतच घाला की जेणेकरून कुरड्यांचा गचका होणार नाही.
- आपण जे झाकण ठेवतो त्यानंतर सर्वात शेवटी सुरीच्या टोकाने कुरडया मोकळ्या मोकळ्या करून घ्या.
- कुरडईची भाजी आपण चपाती सोबत किंवा फुलक्या सोबत नाहीतर चमच्याने अशीच खाऊ शकतो….
- चला तर मग आपली कुरडयांची भाजी तयार झालेली आहे चला एन्जॉय करूया गुड्यांची भाजी…… लहान मुलांचे शब्दांमध्ये आपण याला घरगुती मॅगी पण म्हणू शकतो…..
टिप्स::::
कुडीची भाजी करताना आपण जे गरम पाणी घालतो ते गरजेप्रमाणेच घाला. कारण जास्त घातल्यामुळे कुरडईच्या भाजीचा गचका होऊ शकतो आणि गोळा तयार होऊ शकतो.
गोळा तयार झाल्यास त्यामध्ये थोडे तेलाचे सोडा.

*वेळ व परिमाण::
तयारीची वेळ: ५ मिनिट
एकूण वेळ: २० मिनिटे
परिमाण: १व्यक्ती
