मटकीची उसळ

by Vaishali Chaudhari
134 views

मटकीची उसळ


प्रस्तावना::

मटकीची उसळ ही मोड आलेल्या धान्यांपैकी एक उसळ आहे ती अत्यंत आरोग्यास गुणकारी आहे. मोड आलेल्या धंद्यामध्ये जीवनसत्व क असते आणि कच्चे खाल्ल्यास त्यामधून आपल्याला प्रथिने फायबर मिळते.


साहित्य::

  • 250 ग्रॅम मोड आलेली मटकी
  • एक कांदा
  • एक टोमॅटो,
  • दहा लसूण पाकळ्या
  • अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
  • आठ हिरव्या मिरच्या ,
  • दोन कढीपत्त्याची पाने
  • कोथिंबीर,
  • पाव चमचा हळद
  • पाव चमचा गरम मसाला
  • जिरे मोहरी
  • फोडणीसाठी तेल
  • मीठ
  • पाणी



कृती::

प्रथम मटकी धुऊन घ्या.एका पातेल्यात मटकी घालून त्यात पाणी घालून चांगली मंद आचेवर वाफवून घ्या.

साधारण मटकी उकळण्यासाठी दहा मिनिटे लागतात.एक कांदा बारीक चिरून घ्या .

कोथिंबीर बारीक चिरून घ्या.तसेच एक टोमॅटो बारीक चिरून घ्या. अद्रक लसणाची बारीक पेस्ट करून घ्या.

मिरचीचे गोल असे तुकडे करून घ्या.एका कढईमध्ये तेल घाला. तेल गरम झाले की त्यात जिरे मोहरीची फोडणी घाला.

त्यामध्ये कढीपत्त्याची पाने घाला. त्यामध्ये कांदा तांबूस रंगावर परतवून घ्या.

कांदा परतून झाला की त्यामध्ये टोमॅटोही परतून घ्या. आता अद्रक लसणाची पेस्ट घाला.

( इथे अद्रक लसणाची पेस्ट कांदा टोमॅटो परतवल्यानंतर घातलेली आहे कारण आधीच कांदा अद्रकाची पेस्ट घातल्यास ती जळून चवीमध्ये बदल होतो.)

त्यामध्ये पाव चमचा हळद घाला. पाव चमचा गरम मसाला घाला.

आता उकडलेली मटकी त्यामधील जास्तीचे पाणी काढून घ्या आणि मटकी कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये घाला.

मटकी चांगली परतवून घ्या. त्यावर झाकण ठेवून एक ते दोन वाफ येऊ द्या. आता आपल्या चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घाला.

त्यावर चिरलेली कोथिंबीर घाला. आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे.

तुम्ही चपाती सोबत भाकरी सोबत खाऊ शकतात.

किंवा उसळ म्हणूनही त्यावर बारीक शेव घालून खाऊ शकतात लहान मुलांना उसळीचे पदार्थ खूप आवडतात.

या उसळीमध्ये तुम्ही कुरमुरे सुद्धा घालू शकतात आणि त्या पद्धतीने तुम्ही उसळीची भेळ बनवू शकतात.


टिप्स ::


उसळ उकडताना कुकरमध्ये उकडू नये कारण उसळीचा एकदम गारा होऊ शकतो. येथे मी उसळ उकडून घेतलेली आहे मात्र तुम्ही ही उसळ धुतल्यानंतर डायरेक्ट कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये परतवू शकतात या उसडीची चव अत्यंत उत्तम लागते. या उसळीला वाफवण्यास थोडा जास्त वेळ लागतो.


वेळ व परि माण::


तयारीची वेळ १० मिनिटे
एकूण वेळ ३० मिनिटे
परिमाण : दोन जणांसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

7507

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.