मेथीची कोरडी भाजी

by Vaishali Chaudhari

मेथीची कोरडी भाजी


प्रस्तावना::

मेथी ही जरी कडू असली आरोग्यासाठी तितकेच चांगली आहे. आणि ज्यांना साखर आहे त्यांच्यासाठी तर एकदमच चांगली आहे. यामुळे शुगर लेवल कमी होऊ शकते.

साहित्य::

  • १ जुडी मेथीची
  • एक कांदा
  • ४ हिरव्या मिरच्या
  • ६ ते ७ लसूण पाकळ्या
  • शेंगदाण्याचे कूट
  • फोडणीसाठी तेल
  • जिरे मोहरी
  • मीठ
  • कोथिंबीर

कृती:::


सर्वप्रथम मेथीची जुडी निवडून घ्या. म्हणजेच मेथीच्या जुडी मधील मेथीची पाने पाने तोडून घ्या. त्यातील छोट्या छोट्या दांड्या तुम्ही घेऊ शकतात.

पण साधारण वरची वरची पाने त्याची आपण भाजी बनवतो. भाजी तोडल्यानंतर ती दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन घ्या.

कारण त्यामध्ये माती असते. त्यामुळे भाजी कचकच लागू शकते. म्हणून भाजी दोन ते तीन वेळा धुवून घ्यावी.

आता मेथीची भाजी चिरून घ्या. तसेच कांदाही बारीक असा चिरून घ्या. मिरचीच्या गंडोऱ्या करून घ्या. लसणाचे तुकडे करून घ्या.

आता एका कढईमध्ये कडकडीत तेल गरम करा. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घाला.

आता लसुन तुकडे घालून परतून घ्या त्यानंतर मिरचीचे तुकडे घालून परतून घ्या. कांदा तांबूस रंग होईपर्यंत परतत राहा.

आता यामध्ये पाव चमचा हळद घाला. पाव चमचे धने पूड घाला. आता यामध्ये आपण चिरलेली मेथीची भाजी घाला.

भाजीवर झाकण ठेवून पाच मिनिटे भाजी शिजवून घ्या. भाजी अधून मधून हलवत रहा. आता झाकण काढून घ्या जर भाजीला पाणी सुटले असेल ते पाणी आटेपर्यंत भाजी चांगली परतून घ्या.

भाजीचे पाणी सुकून जाऊ द्या. या भाजीमध्ये तेलाचे प्रमाण जास्त हवे. आता भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ घाला.

भाजीमध्ये शेंगदाण्याचे बारीक केलेले कुट घाला.. भाजी चांगली परतून घ्या. त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला.

भाजी मध्ये कोथिंबीर घातल्यानंतर भाजीचा गॅस बंद करा आता आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे… ही भाजी तुम्ही पोळी चपाती, भाकरी सोबत खाऊ शकतात…

शेंगदाण्याचे कूट घातल्यामुळे भाजीचा कडसरपणा कमी होऊन लहान मुलंही ही भाजी खातात… शेंगदाण्याचे कुटाचे प्रमाण थोडे जास्त ठेवावे..


टिप्स:


मेथीची भाजी करताना तेलाचे प्रमाण थोडे जास्त ठेवलेले आहे कारण आधीच मेथीची भाजी कडू असते त्यात या भाजीत जर प्रमाणशीर सगळे असले तर भाजी खाण्यास मुलेही तयार होतात. ही भाजी एकाच व्यक्तीसाठी पुरेशी आहे कारण मेथीची भाजी ही शिजवल्यानंतर कमी होते..

वेळ व परिमाण::


तयारीची वेळ: १० मिनिटे
एकूण वेळ:३० मिनिटे
परिमाण:१ व्यक्तीसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4330

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.