पनीर चिल्ली

प्रस्तावना:::
पनीर चिली हा चायनीज पदार्थ असून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अत्यंत आवडीचा आहे. पनीर मध्ये खूप सारे प्रोटीन असते त्यामुळे पनीर हे लहान मुलांना पाठवण्यात एकदा तरी दिले पाहिजे.
साहित्य::

- पाव किलो पनीर
- एक कांदा
- 100 ग्रॅम पत्ता कोबी
- दोन सिमला मिरची
- दहा लसूण पाकळ्या
- अद्रकाचा तुकडा
- दोन चमचे शेजवान सॉस
- दोन चमचे टोमॅटो सॉस
- दोन चमचे सोयासॉस
- दोन चमचे चिली सॉस
- तेल
- तिखट पाव चमचा
- मिरी पूड चिमूटभर
- मीठ चवीप्रमाणे
- पाणी
- कृती::
- सर्वप्रथम कांदा सोलून लांब लांब कापून घ्या. चला आपण कोंबडा कांदा असे म्हणतो. मी फोटोमध्ये दाखवलेलेच आहे.
- तसेच पत्ताकोबी ही लांब आणि एकदम बारीक अशी चिरून घ्या. पत्ता कोबीचे एकदम बारीक काप करावे.
- सिमला मिरच्या दोन त्याही लांब लांब कापून घ्या. त्याही अगदी बारीक कापून घ्याव्यात.
लसणाचे बारीक बारीक काप करून घ्यावेत. अद्रकाचा तुकडा किसणीच्या साह्याने किसून घ्यावा. - पनीर फोटो दाखवल्याप्रमाणे त्याचेही लांबी काप करून घ्या. साधारण आयताकृती काम करावे.
आता एका कढईमध्ये आपण तेल घालून त्यामध्ये पनीरची जे आयताकृतीत काम केलेले आहे ते घालून त्यावर छान तिखट मीठ चवीप्रमाणे घालावे. पनीर चांगले खरपूस परतून घ्यावे.

- येथे तुम्ही अर्धी वाटी पाण्यामध्ये (एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालून त्यामध्ये मीठ तिखट घालून पेस्ट करून घ्या. या पेस्टमध्ये पनीरचे तुकडे बुडवून. ते तेलामध्ये चांगले डीप फ्राय करू शकतात. आणि मग ते पनीर तुम्ही वापरात आणू शकतात. पण मी येथे डीप फ्राय न करता थोडेसे तेल वापरून त्यामध्ये फक्त परतून घेतलेले आहे. कारण त्याची पौष्टिकता टिकून राहावी यासाठी मी डीप फ्राय केलेले नाही. तेलाचा वापरही कमी केलेला आहे).
- हे परतवलेले पनीरचे काप एका डिशमध्ये काढून घ्यावेत.
आता एका कढईमध्ये थोडे तेल गरम करा. तेल कडकडीत गरम झाले की लसणाचे काप अद्रकाचा कीस घालून परतून घ्या. - आता त्यामध्ये सिमला मिरची घालून परतून घ्यावे. पत्ताकोबी ही घालून परतून घ्यावे.
पत्ता कोबी आणि सिमला मिरची जास्त शिजू देऊ नये ते आत कच्चीच राहू द्यावे.
आता या मिश्रणामध्ये दोन चमचे सोया सॉस दोन चमचे चिली सॉस दोन चमचे टोमॅटो सॉस दोन चमचे शेजवान सॉस घालून तिखट चिमूटभर मिरीपूड आणि चवीप्रमाणे मीठ घालून परतून घ्यावे चार ते पाच चमचे पाणी घालावे.

- (पनीर चिली किंवा कुठलेही चायनीज पदार्थ बनवताना आपण लोखंडी कढईतच बनवावे. लोखंडी कढईत बनवल्यामुळे आपल्याला जेवणातून लोह मिळते. तसेच बाहेरच्या रेसिपीचा आस्वादही मिळतो.)

- आता या सर्व मिश्रणामध्ये परतवलेले पनीरचे काप घालावे. आता पनीर घातल्यानंतर हे मिश्रण चांगले खालीवर फुल आचेवर परतत राहावे.
- आपली पनीर चिली कडकडीत गरम होऊ द्यावी. आता आपली पनीर चिली खाण्यास तयार आहे. पनीर चिली गरम गरमच सर्व्ह करावे त्यावर पत्ताकोबीचा कीस घालावा……………

- टिप्स::
- वरती सांगितल्याप्रमाणे येथे पनीरचे काप मी तळलेले नाहीत. पण तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या घोळ मध्ये बुडवून ते तुम्ही तळून घेऊ शकतात. यामुळे चवीमध्ये चांगला फरक पडतो. चला तर मग ही झटपट रेसिपी करूनच बघूया.
- वेळ व परिमाण::
तयारीची वेळ: ३० मिनिटे
एकूण वेळ: ४०मिनिटे
परिमाण: २ जणांसाठी
