पावभाजी

प्रस्तावना :
पावभाजी ही भाजी सगळ्या शहरांमध्ये आवडीने खाल्ले जाणारा पदार्थ आहेत. लहानापासून मोठ्यापर्यंत पावभाजी ही सर्वांना आवडते.स्वयंपाक घरात अवघ्या 45 मिनिटात आणि सर्वांना आवडणारी अशी ही एकमेव रेसिपी जी सगळ्यांकडे बनवली जाते ती म्हणजे पावभाजी.
साहित्य:
- ५०० ग्रॅम फ्लॉवर
- ५०० ग्रॅम बटाटे,
- २५० ग्रॅम वाटाणे,
- २ सिमला मिरची
- ३ मोठे कांदे,
- २ टमाटर,
- २० लसूण पाकळ्या,
- एक इंच अद्रक,
- ३ चमचा पावभाजी मसाला,
- एक चमचा तिखट,
- ४ चमचे बटर,
- २ चमचे गावरानी तूप
- हळद
- मीठ ,
- पाणी,
- १ पावलादी

कृती:
फ्लावर कापून घ्या. बटाटे स्वच्छ धुऊन बटाटे सोलून घ्या व त्याचे चार चार असे काप करा.
सिमला मिरची स्वच्छ धुऊन घ्या आणि त्याचेही काप करून घ्या. बटाटे आणि फ्लावर स्वच्छ धुऊन घ्या.
सिमला मिरची मध्ये जर तुम्हाला पिवळी सिमला मिरची हिरवी शिमला मिरची आणि लाल सिमला मिरची ही एक एक टाकली तरी चवही छान लागेल आणि दिसायला एकदम रेसिपी टेम्पटिंग दिसेल.
एका कुकरमध्ये कापलेले बटाटे, फ्लावर , वाटाणे घाला. कुकरमध्ये योग्य तेवढे पाणी घाला आणि गॅसवर ठेवून चार ते पाच शिट्या होऊ द्या.
आता गॅस बंद करा बटाटे वाटाण्याची मिश्रण चांगले घोटून घ्या. त्यामध्ये अख्खे बटाटे राहू देऊ नका.
वाटाणे वेगळे काढले तरी चालतील कारण भाजीत थोडे अख्खे वाटाणे दिसले म्हणजे भाजी जरा खायलाही मजेशीर वाटते. आता कांदे सोलून बारीक चिरून घ्या. टोमॅटो चिरून घ्या.
एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या अद्रक चा तुकडा आणि चिरलेला टोमॅटो घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या. त्यामध्ये चिरलेला कांदा परतवून घ्या. त्यामध्ये टोमॅटोची केलेली पेस्ट घाला. मिश्रण चांगले परतवून घ्या.

त्यामध्ये हळद तिखट पावभाजी मसाला घाला हे सर्व घालून मिश्रण चांगले परतवून घ्या. या सर्व चटणीला छान तेल सुटले की मग त्यामध्ये आपण केलेले उकडलेल्या फ्लावर बटाट्याचा लगद्यायचेचे मिश्रण घाला.
त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला. चांगल्या चार ते पाच उकड्या येऊ द्या वरुन चिरलेली कोथिंबीर घाला. वरून छान दोन ते तीन चमचे बटर घाला.

गरमागरम पावभाजी तयार झालेली आहे.तयार पावभाजीलाच एक्स्ट्रा बटर पावभाजी करण्यासाठीएका कढईमध्ये तीन ते चार चमचे बटर आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे पावभाजी घालून मस्तपैकी गरम करा ही झाली स्पेशल बटर पावभाजी…….
आता एका गॅसवर तवा गरम करून घ्या. त्यावर बटर सोडा. पाव मधोमध कापून त्यावर खरपूस भाजून घ्या. आता पावभाजी सोबत पाव सर्व्ह करा.
पावभाजी त्यांना जे बटर टाकतो आपण त्यामध्ये तिखट मीठ घालून आपल्याला पाव भाजीची पाव ही चमचमीत बनवता येतात. चला तर मग पावभाजी एन्जॉय करूया……

पावभाजी चटणी:
साहित्य:
९ लसून पाकळ्या, एक टेबलस्पून उकडलेल्या बटाटा वाटाण्याची पेस्ट, एक चमचा पावभाजी मसाला, मीठ, १ चमचा बटर, पावचमचा तिखट. कोथिंबीर
कृती:
एका कढईमध्ये बटर गरम करा. आलं लसणाची पेस्ट घाला त्यानंतर बटाटा वाटाण्याची पेस्ट घाला. चांगले परतवा त्यामध्ये तिखट पावभाजी मसाला घाला. चवीप्रमाणे मीठ घाला. त्यामध्ये गरम पाणी घाला. चिरलेली कोथिंबीर घाला. दोन उकळ्या येऊ द्या. पावभाजी चटणी तयार आहे.
टिप्स:
पावभाजी मसाला मसाल्याची चटणी ही पातळ असते आणि झणझणीत असते ती आपण पावभाजी मध्ये मिक्स करून खाऊ शकतो.
वेळ व परिमाण:
तयारीची वेळ: २० मिनिटे
एकूण वेळ: ४० मिनिटे
परिमाण: ३ जणांसाठी
