#झटपट लोणचे | कैरीचे गावरान झटपट लोणचे |Pikcle |

by Vaishali Chaudhari
2 views

गावरान कैरीचे झटपट लोणचे

प्रस्तावना:::

कधीच लोणचे तर आपण नेहमीच करतो.. पण कधीकधी आपल्याला झटपट लोणचं काय हवे असते…. अशा वेळेस त्याची रेसिपी काय हवी… आणि उन्हाळ्यामध्ये तर कैऱ्या खूपच मिळतात त्यामुळे क्रिस्पी सुसत आपल्याला नवीन नवीन लोणचं घालता येतील…

साहित्य:::

अर्धा किलो गावरान कैरी अर्धा किलो गूळ दहा लवंग पाव इंच सुंठ्याचा तुकडा… पाव चमचा सुंठ दीड चमचा शोप दीड चमचा मोहरी किंवा मोरी दाळ एक चमचा धणा पावडर एक चमचा तिखट एक चमचा मीठ एक वाटी तेल

कृती:::

सर्वप्रथम कैऱ्या स्वच्छ धुऊन घ्या… करेंची नाकी काढून घ्या… नक्की काढल्यानंतर कैऱ्या लांब लांब चिरून घ्या…. त्यातील बिया (कोई)काढून घ्या…. त्यामध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ घालून घ्या….. आणि कैऱ्या व्यवस्थित मिक्स करून घ्या…. करे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये टाकायचा मसाला आपण तयार करून घेऊ…. आणि त्यामध्ये गूळ घालून घ्या… गुळ हा किसून घ्या.. किंवा बारीक कुटून घ्या…. सर्वप्रथम मसाला तयार करताना खलबत्त्यामध्ये पाच मिरे पाच लवंग आणि सुंठ्याच्या तुकडा बारीक असा कुठून घ्या…. मिक्सरच्या भांड्यामध्ये शॉप आणि मोहरी ची जाडसर पूड करून घ्यायची आहे…. इथे मी धण्याची पावडर वापरलेली आहे तुमच्याकडे धने असतील तर तुम्ही शॉप मध्येच एक चमचा धने घालून जाडसर पूड करून घेऊ शकतात…. आता कढईमध्ये तेल गरम करून घ्या… तीन कडकडीत गरम करा… आणि नंतर ती थोडे थंड होऊ द्या… एकदमही थंड करायचे नाही त्यामध्ये लवंग घाला लवंग पूर्ण फुलल्यानंतर त्यामध्ये सुंठ मिरे आणि लवंगाचा मसाला घाला आणि पाव चमचा हिंग घाला… हिंग घातल्यानंतर आपल्याला शो आणि मोहरीचा मसाला घाला आणि व्यवस्थित एकत्र करून घ्या…. सर्व मसाला एकत्र करून घ्या… त्यानंतर यामध्ये तिखट घाला आणि धनापूर घाला… एकत्र करून घ्या… हा मसाला आपल्याला एकदम थंडगार करून घ्यायचा आहे…. गरम गरम मध्ये घालायचं नाही… नाहीतर कैऱ्या नरम पडतील… एक ते दोन तास थंड झाल्यानंतर आपल्याला कैऱ्यांच्या मिश्रणामध्ये हा मसाला घालायचा आहे… आता एक ते दोन तास झाल्यानंतर आपल्याला हा मसाला कैऱ्यांच्या मिश्रणामध्ये घाला…. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या… एक ते दोन दिवसांमध्ये लोणचे छान मुरते…. आता आपले गावरान कैरीचे इन्स्टंट लोणचे तयार झाले आहे…..

टिप्स:::

लोण्याचे करताना तेल कडकडीत गरम करून त्याला थोडे थंड करायचे असते… आणि मध्यम असे वाफ हाताला लागेल अशा वेळेस त्यामध्ये मसाला घालायचा… म्हणजे मसाला जळणारही नाही आणि व्यवस्थित तळला जाईल… कच्चाही राहणार नाही

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

7671

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.