
चिंचेची आंबट गोड चटपटीत लोणचे
प्रस्तावना:: आपण कैरीचे लिंबाचे मिरचीचे हळदीचे लोणचे तर नेहमीच खातो आज आपण एक आगळीवेगळी रेसिपी पाहणार आहे ती म्हणजे चिंचेचे आंबट गोड लोणचे चला तर मग आपल्या तोंडाला पाणी सुटलेच असेल आपण रेसिपी बघून घेऊ……
साहित्य:: वीस ते पंचवीस चिंचा(१०० ग्रॅम )एक वाटी गूळ एक चमचा तिखट एक चमचा मीठ एक चमचा हळद एक चमचा धनापूड एक चमचा जिरेपूड एक चमचा चाट मसाला एक चमचा लोणच्याचा मसाला दोन ते तीन पळ्या फोडणीसाठी तेल

कृती::
चिंचांचे साल काढून सर्व चिंचा एकदम स्वच्छ करून घ्याव्या. चिंचांचे साधारण दोन दोन तुकडे करावे. दोन दोन चीनचा राहतील याप्रमाणे तुकडे करावे. त्यानंतर त्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्याव्या. चिंचा धुतल्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करावे त्यामध्ये गूळ घालून गुळ विरघळून घ्यावा. गुरु पूर्णपणे विरघळल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तिखट एक चमचा हळद एक चमचा मीठ एक चमचा धनापूर एक चमचा जिरेपूड एक चमचा लोणच्याचा मसाला. घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण ज्या चिंचा धुतलेल्या आहेत त्या चिंचा त्यामध्ये घालाव्या. आणि मंद आचेवर साधारण दोन ते तीन मिनिटं शिजू द्यावा. म्हणजे आपण जो मसाला केलेला आहे तो चिंचांमध्ये व्यवस्थित मुरेल. आता दोन ते तीन मिनिटे झाल्यानंतर आपण त्यामध्ये चाट मसाला घालणार आहे. चाट मसाला घातल्यानंतर पुन्हा दोन ते तीन मिनिटं लोणचे शिजू द्या. आता लोणच्याचा गॅस बंद करा आपले आंबट गोड असे चिंचेचे लोणचे तयार झालेले आहे. यामध्ये लोणच्याचा घरगुती मसाला वापरलेला आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही बाहेरचा कुठलाही तुमच्या आवडीचा लोणच्याचा मसाला वापरू शकतात.

टिप्स:: इथे मी गुळाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर गूळ आवडत नसल्यास तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकतात प्रमाण सारखेच घ्यायचे आहे…. तसेच मी लोणच्याचा मसाला वापरलेला आहे त्यामुळे त्यामध्ये हिंग असतो म्हणून मी इथे व्यतिरिक्त हिंग टाकलेला नाही तुम्हाला जास्त हिंगाची चव आवडत असल्यास तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे दोन चिमटी इतका हिंग तेलामध्ये घालू शकतात….

वेळ व परिमाण
तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ :२०मिनिटे
परिमाण: १ व्यक्तीसाठी
