उपासाची बटाट्याची भाजी
प्रस्तावना::

बटाट्याची भाजी ही लहानापासून मोठ्यापर्यंत आवडीची भाजी आहे आणि उपवासाला चालणारी देखील आहे.
साहित्य::

पाच ते सहा उकडलेले बटाटे
आठ ते दहा बारीक हिरव्या मिरच्या
एक चमचा जिरे
अर्धी वाटी शेंगदाणे
मीठ
तेल
पाणी
कृती::
बटाटे पाणी घालून कुकरमध्ये दोन ते तीन शिट्या घेऊन उकडून घ्या. बटाटे उकडल्यानंतर त्याची साल काढून घ्या .
आणि त्याचे काप करून घ्या. काप केल्यानंतर मिरचीचेही मधून चिरून बारीक काप करून घ्या. कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्या..
शेंगदाण्याचे साल काढून घ्या.. मिक्सर मधून त्याचे जाडसर कूट करून घ्या किंवा भरडा करून घ्या.. कढईमध्ये कडकडीत तेल गरम करा.
तेल आपल्या आवडीप्रमाणे घालावे इथे मी दोन ते तीन चमचे तेलाचा वापर केलेला आहे.
त्यामध्ये एक चमचा जिरे घाला. जिरे चांगले तडतडले की मग त्यामध्ये चिरलेल्या मिरच्या घाला.. चांगल्या तांबूस रंगावर परतून घ्या.

तुम्हाला कडीपत्ता आवडत असल्यास तुम्ही कढीपत्ता सुद्धा घालू शकतात..मिरच्या तांबूस झाल्या की मग त्यामध्ये बटाट्याचे काप घाला.
बटाट्याचे काप तुम्हाला हव्या त्या आकारांमध्ये तुम्ही कापू शकतात. बटाटे घातल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला.

चवीप्रमाणे मीठ घातले की मग त्यावर झाकण ठेवा आणि भाजी भाजी चांगली पलटून पलटून खरपूस रंगावर परतून घ्या.
त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट घाला. आणि पुन्हा दोन ते तीन मिनिटे भाजी चांगली खरपूस परतून घ्या.

खरपूस म्हणजे भाजीला सुद्धा थोडा तांबूस रंग येतो. त्यामुळे चव अत्यंत छान लागते.. भाजी चांगली खरपूस परतली की मग गॅस बंद करा.
इथे मी मिरचीचा वापर केलेला आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही थोडे तिखटही घालू शकतात… आपली झणझणीत अशी उपासाची बटाट्याची भाजी आता तयार झालेली आहे…
टिप्स::

भाजी करताना त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट अवश्य घाला त्यामुळे चव एकदम सुरूस लागते…
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ ::१०मिनिटे
एकूण वेळ::२० मिनिटे परिमाण ::दोन व्यक्तीसाठी
