उपवासाची खमंग अशी भरलेली मिरची

प्रस्तावना::
आपण भरलेल्या वी च्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये नेहमीच खातो पण उपवासाच्या मिरच्या या कधीतरी बनतात त्यामुळे ही रेसिपी उपवासाला किंवा उपवास नसतानाही तुम्ही खाऊ शकतात…
साहित्य::

* सात ते आठ जाड हिरव्या मिरच्या
*शेंगदाण्याचे कूट
*एक चमचा तिखट
*अर्धा लिंबू
*तेल
*चवीप्रमाणे मीठ
कृती::
सात ते आठ हिरव्या मिरच्या चांगल्या स्वच्छ धुऊन घ्या. रुमालाच्या साह्याने कोरड्या करून घ्या. त्यानंतर मधोमध त्याला चीर देऊन त्यामधील संपूर्ण बिया काढून घ्या .
जेणेकरून त्यामुळे मिरच्या तिखट लागणार नाही… आता याला मधल्या बाजूने मिठ लावा. अर्धी वाटी शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्या.
शेंगदाण्याचे साल काढून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे एक चमचा तिखट चवीप्रमाणे मीठ घालून त्याचे कूट तयार करून घ्या..
आता हे कुट एका डिशमध्ये काढून घ्या.. कुट काढल्यानंतर त्यावर अर्धा लिंबू पिळा. आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.
आता आपण मिरच्या चिरून त्याला मीठ लावलेलेच आहे त्यामध्ये आपण तयार केलेले कूट एक एक मिरचीमध्ये भरून घेऊ.

याप्रमाणे सर्व मिरच्यामध्ये आपण शेंगदाण्याचे कुटाचे मिश्रण भरून घेतले आहे. आता कढईमध्ये तेल घाला त्यामध्ये मिरच्या फ्राय करण्यास ठेवा.

त्यावर साधारण पाच मिनिटे झाकण ठेवा मिरच्या वाफवून जातील. मिरच्या चांगल्या खरपूस फ्राय झाल्या की मग त्या दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्या .
आणि दुसऱ्या बाजूने खरपूस भाजून घ्या.. त्यानंतर आपल्या उपवासाच्या मिरच्या तयार झाल्या आहे.. या मिरच्या तुम्ही साबुदाण्याच्या खिचडी सोबत किंवा बटाट्याच्या उपवासाच्या भाजी सोबत किंवा भगर सोबत खाऊ शकतात…

तुम्हाला तसं चमचमीत आवडत असल्यास तुम्ही तिखटाचा वापर जास्त करू शकतात मी इथे एका चमचाचा वापर केलेला आहे इथे तुम्ही दोन चमचे सुद्धा तिखट वापरू शकतात म्हणजे मिरच्या अजून झणझणीत होतील.. आपल्या उपवासाच्या भरलेल्या मिरच्या तयार आहेत..

टिप्स::
यामध्ये तुम्हाला लिंबू आवडत नसल्यास तुम्ही नाही घातले तरी चालेल लिंबामुळे थोडीशी आंबट अशी चव मिरची मध्ये येते..
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ :२०मिनिटे परिमाण ::दोन व्यक्तीसाठी
