झटपट साधी खिचडी

प्रस्तावना:::
साधी खिचडी ही पटकन लावण्यासाठी आणि कधीकाळी वेळ झालेला असला तर झटपट जेवण बनवण्यासाठी सोपा असा उपाय आहे…. तसेच घरी कोणी महिला व्यक्ती नसल्यास पुरुषांनाही खिचडी लावता येते आणि आपली भूक भागवता येते….. प्रवासावरून थकून आलेले असल्याचे झटपट लावता येणारी अशी साधी खिचडी…..
साहित्य::::

- एक मोठी वाटी तांदूळ
- अर्धी वाटी तुरीची डाळ
- अर्धी वाटी मुगाची डाळ
- पाव चमचा हळद
- चवीप्रमाणे मीठ
- आणि पाणी
कृती:::
सर्वप्रथम खिचडीचे साहित्य सर्व काढून घ्या. …. एक वाटी तांदूळ अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी तुरीची डाळ सर्व साहित्य मिक्स करून घ्या….
आता हे एका पातेल्यामध्ये घालून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या… कारण आपण धान्याला बोरिक पावडर लावलेली असते त्यामुळे सर्व स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे….

त्यानंतर कुकरमध्ये तांदूळ आणि दोन्ही डाळी घाला… ज्या वाटेने आपण तांदूळ घेतलेले आहे त्याच वाटेने आपण पाण्याचे प्रमाण मोजणार आहे…
एका वाटीसाठी दोन वाट्या पाणी असे प्रमाण आहे…. टोटल दोन वाट्यांची खिचडी आपल्याला इथे लावायची आहे…
म्हणून मी इथे ज्या वाटेने तांदूळ घेतले त्या चार वाट्या पाणी घातले आहे…. आणि त्यामध्ये पाव चमचा हळद घालून चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे …..

हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे…. चमच्याने व्यवस्थित खिचडीचे मिश्रण एकत्र करून घ्या कारण हळद सगळ्या बाजूला मिक्स होईल….
आता कुकर चे झाकण लावून घ्या… प्रथम दोन ते तीन मिनिटे कुकरमध्ये वाफ येईपर्यंत मोठ्या गॅसच्या आचेवर ठेवा…
कुकरला वाफ आली गॅसची आच मध्यम करा… आणि दोन शिट्या होऊ द्या… गॅस बंद करा… कुकरची वाफ निघाली की मग कुकरचे झाकण उघडून घ्या…

कुकरमध्ये वापस त्यांना कुकर उघडू नका कारण खिचडी कच्ची राहील… कुकरची वाफ पूर्णपणे निघून जाऊ द्या साधारण कुकर दहा मिनिटांनी उघडा म्हणजे कुकरची वाफ निघालेली राहील….
त्यानंतर या खिचडीवर तुम्ही फोडणीचे तेल घेऊन खाऊ शकतात किंवा साजूक तूप घेऊन सुद्धा ही खिचडी खाऊ शकतात….
तुम्हाला आवडत असल्यास तुम्हाला या खिचडीला फोडणी सुद्धा देता येईल….. आता आपण गरमागरम तूप खिचडी एन्जॉय करणार आहे….

खिचडी ही गरमागरम खाल्ल्यानंतर त्यावर साजूक तूप एकदमच चवदार लागते…..
टिप्स:::
खिचडी करताना ज्या वाटेने आपण प्रमाण घेतलेले आहे त्या वाटीनेच आपण पाण्याचा वापर करावा.. म्हणजे आपले पाण्याचे प्रमाण चुकणार नाही…
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ :१०मिनिटे
एकूण वेळ:३० मिनिटे
परिमाण: तीन व्यक्तींसाठी
