
खान्देशी नांव :करहोळे
प्रस्तावना:::
सर्वांकडेच करोडे किंवा मुगाचे वडे तयार केले जातात.. कारण उन्हाळ्यात काय भाजी करायची हा प्रश्न प्रत्येकापुढे उभा राहतो…. अशा वेळेस या वड्यांचा वापर केला जातो यापासून तुम्ही पातळ रस्सा भाजी तयार करू शकतात… यापासून तुम्ही लाल रस्सा किंवा हिरवा रस्सा… तसेच कांदा चिरून सुकी भाजी सुद्धा तुम्ही बनवू शकतात…. वर्षभर टिकणारे अशा या वड्या असतात…
साहित्य::
- एक किलो मुगाची डाळ
- अर्धा किलो हरभऱ्याची डाळ
- अर्धा किलो उडदाची डाळ
- अर्धा किलो मटाची डाळ
- अर्धा किलो चवळीची डाळ
- 40 ते 50 लसूण पाकळ्या
- दोन ते तीन इंच अद्रकाचा तुकडा
- पाव किलो पिवळ्या मिरच्या
- पाव किलो कोथिंबीर
- चार ते पाच चमचे धना पूड
- चार ते पाच चमचे जिरेपूड
- चवीप्रमाणे मीठ
कृती:::


रात्री या सर्वदाळी धुवून घ्यायच्या आहेत… आणि त्या भिजत घालायच्या आहेत…
सकाळी या सर्व डाळी तुम्ही मिक्सरवर वाटून घ्या. किंवा चक्की वरून वाटून आणले तरी चालेल…
या मिश्रणामध्ये चटणी करताना सुकलेल्या पिवळ्या मिरच्या धने जिरे 40 ते 50 लसूण पाकळ्या दोन ते तीन अद्रकाचे तुकडे करून घ्या…
हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्या… आणि त्याची बारीक अशी पेस्ट करा यामध्ये पाणी घालायचे नाही….
आता ही वाटलेली पेस्ट वाटलेल्या डाळींच्या रवणामध्ये घाला… आता या मिश्रणामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाला…
आणि चवीप्रमाणे मीठ घाला… त्यानंतर रवण व्यवस्थित फेटून घ्या… मिश्रण सर्व बाजूने फेटले गेले पाहिजे…
मिश्रण फेटल्यानंतर एका प्लास्टिकच्या कागदावर आपल्याला वड्या पाडायच्या झाऱ्याने आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे…
किंवा करोडे तुम्ही हाताने सुद्धा तोडून घालू शकतात… पूर्वी करोडे हे हाताने तोडून केले जायचे… आता हे करोडे झाऱ्याच्या साह्याने गाळले जातात…..
झाऱ्याने करोडे घालताना जास्त उंचीवरून टाकू नये… जास्त उंचीवरून घातलेले करोडे चिपट होतात… हे करोडे साधारण दोन ते तीन दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्या…
करोडे चांगले कोरडे होऊ द्यावे त्यामुळे ते वर्षभर टिकतात… त्यामध्ये ओलसरपणा राहिल्यास त्याला भुंग लागेल…..
करोड्यांपासून तुम्ही उन्हाळ्यामध्ये हिरवी रस्सा भाजी करू शकतात खान्देश स्पेशल अशी….. किंवा मसाले भाजी ज्यामध्ये आपण कधी कधी शेव घालतो…..
त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करोड्याची लाल रस्सा भाजी करू शकतात… तसेच कांदा अद्रक लसणाची पेस्ट घालून सुद्धा तुम्ही पोळी भाजी करोड्यांची बनवू शकतात…..

टिप्स::: रवणामध्ये चिरलेली कोथिंबीर घालताना एकदम बारीक चिरलेली हवी नाहीतर ती झाऱ्यामध्ये अटकते आणि कोथिंबीर वड्यामधून वेगळी होते…
मदत गृह उद्योगासाठी
AVAILBLE HERE
AVAILBLE HERE
याला करोडे असे सुद्धा म्हणतात खानदेश स्पेशल यापासून तयार केली जाणारी भाजी एकदमच छान लागते आता या रवणासाठी मी इथे एक किलो मुगाची डाळ अर्धा किलो हरभऱ्याची डाळ अर्धा किलो उडदाची डाळ अर्धा किलो चवळीची मुगाची डाळ अर्धा किलो हरभऱ्याची डाळ
अर्धा किलो उडदाची डाळ अर्धा किलो चवळीची डाळ अर्धा किलो मठाची डाळ याप्रमाणे प्रमाण घेतलेले आहे या सर्व डाळी रात्री भिजू घातलेल्या आहे आणि सकाळी स्वच्छ धुऊन घेतल्या आहे आणि मिक्सरवर त्याचे वाटण करून घेतले आहे.
आता आपण यासाठी काय काय मसाला लागतो ते बघू यासाठी आपल्याला पाव किलो पिवळ्या मिरच्या चार ते पाच चम्मच धना पूड चार ते पाच चम्मच जिरे पूड मीठ मीठ हे आपल्या चवीप्रमाणे घालायचे आहे त्यानंतर
चार ते पाच चम्मच धणे आणि
लसूण पाकळ्या साधारण 40 ते 50 लसूण पाकळ्या इतक्या आपल्याला घालायच्या आहे
अद्रकाचा दोन ते तीन इंच तुकडा घालायचा आहे हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्या
वाटलेल्या मिश्रणामध्ये घालून चांगले फेटून घ्या आणि त्यामध्ये पाव किलो
चिरलेली कोथिंबीर घाला आणि चांगले रवण व्यवस्थित फेटून घ्या आता आपण याचे वडे
पाडून घेऊ याप्रमाणे मी इथे जाळीचा वापर केला आहे
आणि आपल्याला याप्रमाणे वडे पाडून घ्यायचे आहेत याप्रमाणे जाळीवर हात फिरवून
आपल्याला वडे पाडून घ्यायचे आहेत या
करोडे किंवा मिक्स डाळीचे वड्या किंवा सांडगे
