कैरीची भाजी| कैरीचे लोणचे | गतका | Pickle | कच्चा आम आचार |लुंजी

by Vaishali Chaudhari
1 views

गोड आंबट कैरीचा गतका किंवा कैरीची भाजी

प्रस्तावना::

कैरीची भाजी ही पूर्वीपासून केली जाणारी भाजी आहे भाजी नसली की उन्हाळ्यामध्ये गरमागरम या भाजी सोबत चपाती सुद्धा खाऊ शकतो….

साहित्य:::

  • अर्धा किलो कैरी गावरानी किंवा तोतापुरी
  • एक मोठी वाटी गूळ किसलेला
  • एक चमचा तिखट
  • पाव चमचा हळद
  • पाव चमचा मेथ्या
  • पाव चमचा जिरे
  • मीठ
  • फोडणीसाठी तेल

कृती:::

सर्वप्रथम कैऱ्या स्वच्छ धुऊन घ्या …. कैऱ्यांवरील साल काढून घ्या… वरील साल काढून त्याचे नाकेसुद्धा काढून घ्या… आता कैरी चौकोनी पिसेस मध्ये कापून घ्या… कैरी कापल्यानंतर मधील बी काढून घ्या…. तुम्ही सालीसकट सुद्धा फोडी करू शकतात….. तुम्हाला सांगायला आवडत असेल तर तुम्ही सालीसकट फोडी करून घ्या… सालीसकट फोडी केल्यास भाजी शिजण्यास जरा जास्त वेळ लागतो……. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करा… तेल गरम झाले की मग त्यामध्ये जिरे घाला… त्यानंतर त्यामध्ये मेथ्या परतवून घ्या… त्यानंतर त्यामध्ये कैरीच्या फोडी घाला… कैरीच्या फोडी घातल्यानंतर पाव चमचा हळद एक चमचा तिखट घालून परतवून घ्या… आता यावर झाकण ठेवून चांगली चार ते पाच मिनिटे वाफ येऊ द्या… वाफ आल्यानंतर यामध्ये अर्धा ते एक ग्लास पाणी घाला.. आणि गुळ घाला…. पुन्हा दोन ते तीन मिनिटे मिश्रण शिजवून घ्या… आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला… पुन्हा एक उकळी आली की गॅस बंद करा…. आपली कैरीची भाजी तयार झालेली आहे…. मी कैरीची भाजी तुम्ही चपाती सोबत हलक्या सोबत सुद्धा खाऊ शकतात… आणि पाणी कमी घातल्यास त्याची कट्टर सर ग्रेव्ही तयार होईल… ही ग्रेवी लहान मुलांना चपाती सोबत लावून सुद्धा देऊ शकतात….. आता आपली कैरीची आंबट गोड भाजी तयार झालेली आहे….

टिप्स:::

कैरीच्या भाजीमध्ये मी गूळ घातलेला आहे तुम्ही गोळ्या ऐवजी साखर सुद्धा घालू शकतात….
वेळ व परिमाण
तयारीची वेळ :१०मिनिटे
एकूण वेळ :३०मिनिटे
परिमाण: चार व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

7535

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.