हॉटेल स्टाईल गोड आंबट असा सांबर
प्रस्तावना::

सांबर हा इडली सोबत तसेच डोशा सोबत तसेच उत्तप्पा सोबत किंवा भातासोबत सुद्धा खाल्ला जातो…. इडली ने सांबारामध्ये पोहोता आले पाहिजे… असा आपला सांबर हवा….
साहित्य:::

- अर्धी वाटी तुरीची डाळ
- एक बटाटा
- एक कांदा
- एक टमाटर
- दहा ते बारा लसूण पाकळ्या
- अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
- कोथिंबीर
- पाव वाटी चिंचेची चटणी
- पाव चमचा हिंग
- एक चमचा तिखट
- पाव चमचा हळद
- अर्धा चमचा धनापूड
- दीड चमचा सांबर मसाला
- चवीप्रमाणे मीठ
- फोडणीसाठी तेल
- जिरे मोहरी
- दहा ते बारा शेंगदाणे
कृती:::
तुरीची डाळ धुऊन घ्या.. त्यानंतर बटाटा सोलून घ्या… मी बटाटा कापून घ्या… टोमॅटो की कापून घ्या… कुकरमध्ये तुरीची डाळ बटाटा टोमॅटो दोन तीन शिट्ट्या घेऊन शिजवून घ्या….

यामध्ये सुद्धा घालू शकतात शेवग्याच्या शेंगा वाटाण्याची दाणे एक ते दोन गंगाफळाचे फोड घालू शकतात…. एक कांदा बारीक चिरून घ्या…
अद्रक आणि लसणाची पेस्ट करून घ्या… कढईमध्ये फोडणीसाठी तेल घाला त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी घालून त्यामध्ये शेंगदाणे आणि कढीपत्ता घाला ……
लगेचच कांदा घाला आणि परतवून घ्या…. कांदा तांबूस रंगावर आला की त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घाला…. तेच घातल्यानंतर हिंग घाला…

. पाव चमचा हळद एक चमचा तिखट दीड चमचा सांबर मसाला अर्धा चमचा धनापुड पाव चमचा हळद घालून मिश्रण चांगले परतवून घ्या…
आता यामध्ये चिंचेचा कोळ घाला.. म्हणजे चिंचेची गोड आंबट अशी चटणी घाला…. घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या…

आपल्या कुकर ची वाफ निघाली की वरण रवीच्या साह्याने लोणून घ्या… त्यानंतर हे मिश्रण केलेल्या फांद्याच्या चटणी मध्ये परतवा…
यामध्ये थोडे गरम पाणी घाला आणि सांबर पातळ करा… आणि मिश्रणाला दोन ते तीन उड्या येऊ द्या… त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला…

आणि चिरलेली कोथिंबीर घाला आणि त्याचा पुन्हा उकडा येऊ द्या.. आपला सांबर तयार झालेला आहे…
हा सांबार तुम्ही इडली सोबत डोश्यासोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकतात… गरमागरम सांबार तयार झालेला आहे….
टिप्स:::

सांभार तयार करताना त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकतात….. इथे तुमच्याजवळ चिंचेची चटणी नसल्यास दोन ते तीन चिंचा भिजत घालून ते पाणी घालावे आणि गुळाचा तुकडा घालावा…..
वेळ व परिमाण:
तयारीची वेळ:: १०मिनिटे
एकूण वेळ::३० मिनिटे
परिमाण::५ व्यक्तीसाठी
