झटपट बनणारा आईस्क्रीम ज्याची चव बाहेरच्या आईस्क्रीम सारखी
प्रस्तावना::
आईस्क्रीम बाहेरचा नेहमीच खातो पण हा आईस्क्रीम जर घरी बनवता आला तर किती सोपे होईल… आणि लहान मुलांना बाहेरचा आईस्क्रीम मोठ्या आवडीने खातात…. आज आपण घरी आईस्क्रीम बनवणार आहे…
साहित्य:::
- अर्धा लिटर दूध
- अर्धी वाटी साखर
- दोन चमचे मोठे कस्टर्ड पावडर
- पाच ते सहा काजू
कृती:::
सर्वप्रथम थैलीचे दूध असल्यास ते एका पातेल्यामध्ये काढून घ्या… पातेल्यामध्ये अगदी थोडे दोन चमचे इतके पाणी घ्या त्यानंतर त्यामध्ये दूध घाला म्हणजे दूध तळाला लागणार नाही…
आता दूध चांगले तापवून घ्या नंतर दोन चमचे कस्टर्ड पावडर एका वाटीमध्ये घ्या त्यामध्ये अर्धी वाटी दूध घालून त्याची पेस्ट तयार करा…..
कस्टर्ड पावडर ची पेस्ट केल्यानंतर आपण तापवलेल्या दुधामध्ये ती घाला… साधारण दोन ते तीन मिनिटे दूध तापवून द्या…
उकळी आल्यानंतर आपले दूध लगेच घट्ट होईल आता गॅस बंद करा….. दुधाचे मिश्रण थंड होऊ द्या मिश्रण थंड झाल्यानंतर हे मिश्रण तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता किंवा रवीच्या सहाय्याने घोटून घेऊ शकता…
आता हे पातेले पाच ते सहा तास आइस्क्रीम सेट होण्यासाठी पक्के झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवा किंवा एखाद्या टीन मध्ये हा आईस्क्रीम काढू शकता……
आणि त्यांचे पक्के झाकण लावून आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवू शकता….
पाच ते सहा तास झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही साय घालून फेटून घेऊ शकता किंवा साईचा वापर नाही केला तरी चालेल ……
पुन्हा आपल्याला हे आईस्क्रीम मिक्सरमध्ये फिरवून पुन्हा चार ते पाच तास सेट होण्यासाठी ठेवायचे आहे म्हणजे हा आईस्क्रीम बर्फाळ लागणार नाही….
ज्याला आपण कचकच लागतो असं म्हणतो तसा लागणार नाही… आता चार ते पाच तासानंतर आईस्क्रीम फ्रीजमधून काढून घ्या….
आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे…. घरगुती आईस्क्रीम आणि जसा आईस्क्रीम हा लागतो त्याच पद्धतीचा हा आईस्क्रीम चवीला लागतो…
यावर तुम्ही आईस्क्रीम तयार झाल्यानंतर काजू मिक्स करू शकता किंवा ज्यावेळेस आपण मिक्सरमधून फिरवतो त्याच्यानंतर काजू घाला….
आता आपलं झटपट आईस्क्रीम तयार झालेला आहे… एन्जॉय करूया थंडगार आईस्क्रीम….
टिप्स::::
आईस्क्रीम चे मिश्रण ज्याप्रमाणे घट्ट होते ते थंड झाल्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवा.. हा जो घट्टपणा असतो त्यामुळे आईस्क्रीम मध्ये बर्फाचा कचकच पडणार आहात नाही आणि ज्यावेळेस आपण मिक्सरमधून आईस्क्रीम खेळतो त्यावेळेस तुम्ही अर्धी वाटी साईचा वापर करू शकता म्हणजे तुमचा मलईदार आईस्क्रीम तयार होईल…
वेळ व परिमान :::
तयारीची वेळ :२०मिनिटे
एकूण वेळ :४०मिनिटे
परिमाण:: दोन ते तीन व्यक्तींसाठी
