हॉटेल स्टाईल मलाई चवदार कोफ्ता

प्रस्तावना:::
हॉटेल स्टाईल म्हटलं की प्रत्येकालाच तोंडाला पाणी सुटते… आणि मलाई कोफ्ता म्हणजे ड्रायफूट मला छान असे जिन्नस घालून तयार केलेला पदार्थ आहे… जो आपण पराठ्यासोबत नान सोबत खाऊ शकतो….
साहित्य:::

- सात ते आठ बटाटे
- २५० ग्राम पनीर किंवा १०० ग्रॅम पनीर
- अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर
- दोन मोठे कांदे
- एक टोमॅटो मोठा
- एक जाड मिरची
- 20 ते 25 लसूण पाकळ्या
- एक इंच अद्रकाचा तुकडा
- पाच हिरवी इलायची
- पाच मिरे
- एक तेज पान
- दोन चमचे फ्रेश क्रीम किंवा ताज्या दुधावरची साय
- आठ ते दहा काजू
- तळण्यासाठी तेल
- दीड चमचा तिखट
- अर्धा चमचा हळद
- एक चमचा गरम मसाला
- चवीप्रमाणे मीठ
कृती::::
बटाटे उकडून घ्या… बटाटे सोलून घ्या बटाटे सोडल्यानंतर मेसेजच्या साह्याने चांगली स्मॅश करून घ्या…
पनीर किसून घ्या किंवा मी इथे घरी पनीर तयार केलेले आहे तुम्ही सुद्धा घरी पनीर तयार करून घेऊ शकतात पनीर बनवण्याची पद्धत मी तुम्हाला मागे दाखवलेलीच आहे…….
अगदी सोपी आहे त्या पद्धतीने तुम्ही घरी करून घेऊ शकतात….. पनीर किसल्यानंतर बटाट्यामध्ये पनीरचा किस घालून घ्या…..
त्यामध्ये दहा लसूण पाकळ्या अर्धा इंच अद्रकाचे तुकडा याची पेस्ट करून घाला त्यामध्ये थोडे तिखट चवीप्रमाणे मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घाला आता हे मिश्रण एकत्र करून घ्या….

त्यानंतर त्यामध्ये एक ते दोन चमचे इतके कॉर्नफ्लॉवर घाला आणि त्याचा गोळा मळून घ्या… त्यानंतर थोडे पनीर किसलेले राहू देऊन त्यामध्ये काजूचे तुकडे घालून थोडे तिखट आणि मीठ घालून एकत्र करून घ्या. …
एक गोळा तयार करून त्या मध्यभागी थोड्या पनीर आणि काजूच्या गोळी घाला आणि गोल करून घ्या….
या पद्धतीने गोळा केल्यानंतर त्याचे छोटे छोटे कोफ्ते गोल किंवा लांबोळक्या आकारात वळवून घ्या… त्यानंतर कोरडे कॉर्नफ्लॉवर लावून घ्या..

त्यानंतर कडकडीत तेल गरम करून त्यामध्ये कोफ्ते तळून घ्या… हे कोफ्ते उसळणार नाही किंवा तेलामध्ये विरघळणार नाही….
किंवा तेलकट होणार नाही…
कोफ्ताची ग्रेव्ही:::
कांदा सोलून चिरून घ्या.. टोमॅटो चिरून घ्या.. त्यानंतर हिरवी मिरची चिरून घ्या…कढई मध्ये थोडे तेल गरम करा आणि त्यामध्ये वेलची मिरे तेजपान घालून परतून घ्या…..
त्यानंतर चिरलेली हिरवी मिरची चिरलेला कांदा चिरलेला टोमॅटो दहा लसूण पाकळ्या अर्धा इंच अद्रकाचा तुकडा आठ काजू घालून परतून घ्या….

त्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी घाला आणि झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे वाफवून घ्या… थंड होऊ द्या. मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक चटणी करून घ्या…

सर्व बारीक चटणी वाटून घ्या… एक वाटी घेऊन दीड चमचा तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला घालून त्यामध्ये सात-आठ चमचे इतके पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्या…त्यानंतर कढईमध्ये तेल घाला…

त्यानंतर ही मसाल्याची पेस्ट परतवून घ्या… त्यानंतर आपण जी कांदा, टोमॅटो, लसूण अद्रक याची चटणी परतवून घ्या….
चटणी चांगली तेल सुटेपर्यंत परतवून घ्या.. त्यामध्ये अर्धा ते एक ग्लास पाणी घाला आणि चटणी पुन्हा परतवून घ्या..

आता यामध्ये दोन चमचे इतकी मलई घाला किंवा फ्रेश साय घालून घ्या… चटणीला चांगल्या उकळ्या आले की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला. ….
त्यानंतर हातावर कसुरी मेथी चूरून वरून कसुरी मेथी घाला व मसाला चांगला मिक्स करून घ्या आणि वरतून चिरलेली कोथिंबीर घाला आपली कोफ्त्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे ….

आता उकळी आल्यानंतर गॅस बंद करा… कोफ्ते तुम्ही डायरेक्ट यामध्ये सुद्धा घालू शकतात…. किंवा ज्या वेळेस आपण जेवण करतो त्यावेळेस कोफ्त्यांवर ग्रेव्ही घालून सर्व्ह करू शकतो…

आधी कोफ्ते घाला त्यानंतर त्यावर ग्रेव्ही घाला आता ही पराठ्यासोबत किंवा नान सोबत किंवा फुलक्या सोबत किंवा तंदुरी रोटी सोबत तुम्ही खाऊ शकता तर आपण एन्जॉय करूया मलई कोफ्ता!!!!
टिप्स:::
यामध्ये तुम्ही दही चा सुद्धा वापर करू शकतात… परंतु दही घालताना ज्यावेळेस आपण कांदा टोमॅटोची चटणी घालतो त्यानंतर दही घालून मिश्रण सतत ढवळत रहा त्यामुळे मिश्रण वाटणार नाही…. मी इथे दयाचा वापर केलेला नाही… फ्रेश साई चा वापर केलेला आहे…
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ::३० मिनिटे
एकूण वेळ:: ५५मिनिटे
परिमाण :::सहा व्यक्तींसाठी
