उळदाचे वडे आषाढ महिन्यामध्ये खाल्ला जाणारा खान्देश स्पेशल आखाड

by Vaishali Chaudhari
16 views

उळदाचे वडे
आषाढ महिन्यामध्ये खाल्ला जाणारा खान्देश स्पेशल आखाड


प्रस्तावना::

खानदेशामध्ये आषाढ महिना लागला की आखाड तळला जातो…. हा आखाड आवर्जून केला जातो…. बाहेर पडणारा छान मुसळधार पाऊस आणि त्यामध्ये गरमागरम वडे गरमागरम भजी, आणि त्यातल्या त्यात कांदा भजी मिरची भजी मुगाची भजी बटाट्याची भजी पालकाची भजी अशी वेगवेगळे प्रकार आपण बनवत असतो….


साहित्य:::

  • अर्धा किलो उडदाची डाळ
  • दोन टेबलस्पून धणे
  • एक चमचा जिरे
  • दहा हिरव्या मिरच्या बारीक
  • पंधरा ते वीस लसूण पाकळ्या
  • एक इंच अद्रकाचा तुकडा
  • एक चमचा टीस्पून बडीशोप
  • आणि १वाटी कोथिंबीर
  • चवीप्रमाणे मीठ
  • तळण्यासाठी तेल


कृती:::

सर्वप्रथम रात्री डाळ भिजत घाला… आणि ती चांगली रगडून रगडून धुऊन घ्या डाळ साधारण दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्या आणि ती हातावर चांगली घासा जोपर्यंत त्याचा फेस निघतो तोपर्यंत ती घासा..

डाळ घासल्याने मऊ वडे येतात…. त्यानंतर डाळ पुन्हा पाण्यातून स्वच्छ धुऊन घ्या आणि चाळणीवर काढा…

ही डाळ मिक्सरवर बिना पाण्याची सिम वर वाटून घ्या… डाळ सतत एकदम मिक्सरला फिरवू नका हळूहळू सीमवर फिरवा म्हणजे ती चांगली बारीक होईल….

आणि मिक्सरच्या जाम होणार नाही…. त्यानंतर आपण वड्यांमध्ये घालण्याची चटणी तयार करून घेऊ…

वड्यांची चटणी तयार करताना मिक्सरमध्ये बारीक मिरच्या लसूण पाकळ्या अद्रक सोलून त्याचे तुकडे करून घ्यावे…

त्यामध्ये धने जिरे आणि बडीशेप घाला.. आणि मिक्सरमध्ये याचे वाटण करून घ्या… हे वाटण करताना आपल्याला पाणी घालायचे नाही…

हे मिश्रण वाटल्यानंतर आपण जी डाळ दळून ठेवलेली आहे त्यामध्ये घालायचे आणि वड्यांमध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे….

वड्यांमध्ये जर मीठ कमी झाले तर वडा फुगत नाही… त्यानंतर त्यामध्ये अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि वड्याचे रवण चांगले फेटून घ्यावे…

हिरवं चांगले पाच ते दहा मिनिटे फेटावे म्हणजे वडा मऊ आणि चांगला फुगेल… आता आपण एखादी टाटा मिठाची पुडी जर खाली झालेली असेल त्याच्या बॅगचा वापर करून आपण वडा थापून घेऊ शकतो….

किंवा आपली दुधाची थैली स्वच्छ धुऊन घ्या आणि त्या थैलीवर सुद्धा छान वडा पण थापून घेऊ शकतो… थैलीला पाणी लावून घ्यावे आणि वड्याचा हातावर गोळा करून घ्यावा आणि पाणी लावून हळू सर त्याला गोल करून घ्यावा….

वडा गोल झाल्यानंतर हाताला थोडे पाणी लावून घ्यावे… कढईमध्ये तेल गरम करावे… आणि गॅसची आच मंद करावी ..

आणि वडा थैली वरून काढून हातावर घेऊन तो हळूच तेलामध्ये सोडावा… त्यानंतर झाऱ्याच्या साह्याने वड्यावर हळूहळू तेल सोडावे त्यामुळे वडा पटकन फुगण्यास मदत होईल…

आणि आपला वडा चांगला टम्म फुगून येईल …. वडा थापत असताना एक सारखा थापावा नाही तर कुठे बारीक आणि कुठे जाड जर असल्यास त्या ठिकाणी वडा फुगत नाही….

वड्याचा गोळा केल्यानंतर एकसारख्या हाताने त्याला पसरवून घ्यावा…. आणि मग नंतर तेलात सोडावा… आपला उडदाचा वडा एकदम छान फुगेल…


टिप्स:::

उडदाचे वडे तयार करताना आपण जी उडदाची डाळ भिजत घालतो ती भिजत घातल्यानंतर तिला साधारण चार ते पाच वेळा स्वच्छ धुऊन घ्यावी आणि आपल्याला शक्य तितकी ती डाळ चोळून घ्यावी.. डाळ चोळल्यानंतर त्यावरील फेस निघून जातो आणि आपले वडे एकदम मऊ लुसलुशीत येतात…


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ:: ५०मिनिटे
परिमाण::३ व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

10792

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.