गावरान चवीची झणझणीत खान्देशी उडदाची डाळ | Khandeshi udid Dal Recipe

by Vaishali Chaudhari
538 views

उडदाची डाळ

गावरान चवीची झणझणीत खान्देशी उडदाची डाळ | Khandeshi udid Dal Recipe
Oplus_16908288

Introduction | प्रस्तावना ::

हा खाद्य पदार्थ सर्व ऋतूत बनवतात,उडीदाची दाळी ची भाजी म्हटलं की झणझणीत असं बेत आपल्यासमोर येतो मसालेदार अशी उडदाची डाळ अत्यंत रुचकर अशी.

गावरान चवीची झणझणीत खान्देशी उडदाची डाळ | Khandeshi udid Dal Recipe – फोटो 2

  • अर्धा कप काळी उळदाची डाळ,
  • २ टेबलस्पून हरबरा डाळ,
  • १ कांदा बारीक चिरूम,
  • १५-२० खोब्रा काप,
  • १ टेबलस्पून धणे,
  • १ टेबलस्पून गरम मसाला,
  • २ टेबलस्पून तिखट ,
  • खट,
  • सात लसूण पाकळ्या,
  • अर्था उंच आल्याचा तुकडा,
  • पाणी,
  • मीठ चवीप्रमाण
  • तेल,
  • कोथींबीर,

सर्वप्रथम काठी उळीद डाळ , हरखरा डाळ धूवून घ्या. नंतर कुकरमध्ये दोन्ही डाळी एकत्र पाच शिट्टी होईपर्यंत उकळून घ्या.

तवा गरम झाला की त्यावर बारीक चिरलेला कांदा तांबूस रंगावर भाजून घ्या नंतर खोबऱ्याचे कापही तांबूस रंगावर भाजून घ्या गॅस बंद करा.

आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले कांदा भाजलेले खोबरे धणे, तिखट, लसूण अद्रक या सर्वांची पाणी घालून बारीक अशी चटणी करून घ्या. चटणी बारीक झाली की नाही याची खात्री करून घ्या.

उकडलेली उडदाची व हरभऱ्याच्या डाळीमध्ये रवीने थोडे घोटून घ्या. एका पातेल्यात गरम पाणी करून घ्या. एका कढईमध्ये फोडणीसाठी तेल घाला. तेल कडकडीत गरम झाले की त्यामध्ये वाटलेली चटणी घाला. चटणीला सांगली परतवून घ्या. चटणीला हळूहळू तेल सुटेल तिकडे पासून वेगळी होऊन लागेल.

त्यामध्ये उकडलेले उडदाचे डाळ व हरभऱ्याची डाळ चे मिश्रण घाला. आता आपल्या गरजेप्रमाणे त्यामध्ये गरम पाणी घाला. या भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ घाला भाजीला चांगल्या मंद आचेवर चार ते पाच उकळ्या येऊ द्या. भाजीमध्ये चिरलेली कोथिंबीर घाला

इथे आपण काळी उडदाची डाळ म्हणजे सालीची(पोतरांची) डाळ वापरलेली आहे सालीची दाळ वापरावी बिना सालीचे दाळचे फौजदारी डाळ चांगली लागत नाही.

फौजदारी उडदाची डाळ ही गरमागरम पोळी सोबत तसेच बाजरीच्या भाकरी सोबत आपण खाऊ शकतो. त्यासोबत कांदा टोमॅटो खाऊ शकतो. “फौजदारी डाळ ही खानदेशामध्ये याच्या पार्ट्या केल्या जातात खानदेशामध्ये भरपूर प्रमाणावर खाल्ली जाते.

भाकरी, चपाती किंवा भातासोबत उत्तम लागते.

• तयारीची वेळ: १५ मिनिटे
• शिजवण्याची वेळ: १५ मिनिटे
• एकूण वेळ: ३० मिनिटे
• परिमाण: २ जणांसाठी

निष्कर्ष / लेखकाची टिप्पणी

हा पदार्थ आरोग्यदायी, झटपट आणि पारंपरिक चवीचा आहे. आठवड्याच्या शेवटी नक्की करून बघा!

#FauzdariDalRecipe #KhandeshiSpecialDal #DhabaDal #SpicyTadkaDal #TraditionalDal

आणखी वाचा

You may also like

1 comment

Leave a Comment

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.