वराड स्पेशल डाय गंडोरी किंवा झणझणीत अशी मिरच्यांची भाजी. !!!varad Dal Gandori
प्रस्तावना Introduction:::
वराड स्पेशल डायगणोळी म्हटली की सगळ्यांच्या तोंडाला एकदम पाणी सुटते ज्यांनी पण ही भाजी खाल्लेली आहे त्यांना तर एकदमच आनंद होतो की चला आज ही भाजी खायला मिळणार आहे…..

एकदम स्पेशल अशी भाजी जी पार्ट्यांना सूप म्हणून सुद्धा पिली जाणारी अगदी जिभेला चटका मारणारी अशी ही भाजी असते….
जिभेचे चोचले पुरवणारी अशी झणझणीत मिरच्यांची डाळ गंडोरी आणि अगदी पौष्टिक!!!!
साहित्य/Ingredients:::


- पाव किलो आंबट चुका
- पाव किलो कच्चे टमाटे
- दोन वांगे
- दोन बटाटे
- दोन लाल टोमॅटो
- एक वाटी तुरीची डाळ
- पंचवीस हिरव्या मिरच्या बारीक
- 25 ते 30 लसूण पाकळ्या
- एक इंच अद्रकाचा तुकडा
- दहा ते बारा कडीपत्त्याची पाने
- कोथिंबीर
- एक वाटी शेंगदाणे
- 1/4 वाटी खोबऱ्याचे काप
- एक चमचा हळद
- एक चमचा धनापूड
- दीड चमचा गरम मसाला
- चवीप्रमाणे मीठ
ग्रेव्हीची कृती Greavy Preparation:::
सर्वप्रथम आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊ…
त्यासाठी आपल्याला कच्चे टमाटे चांगले धुऊन घ्यावे आणि ते छान असे बारीक चिरून घ्यावे त्यानंतर आंबट चुका ही दोन बारीक चिरून घ्यावा…

तसेच वांगेही दोन बारीक चिरून घ्यावे बटाटा सोलून तोही बारीक चिरून घ्यावा….
त्यानंतर बारीक 25 मिरच्या घेऊन त्याचे सुद्धा आपल्याला छान असे बारीक काप करून घ्यायचे आहे….
हे सर्व साहित्य चिरून झाल्यानंतर एका कुकरमध्ये आपल्याला धुतलेली तुरीची डाळ घालायची आहे आणि त्यानंतर आपण कच्चे टमाटे ची काप वांग्याचे काप त्यानंतर बटाट्याचे काप आणि मिरच्यांचे काप हे सर्व साहित्य घालून त्यामध्ये तीन ते चार ग्लास पाणी घालून आपल्याला चांगल्या पाच ते सहा शिट्ट्या घ्यायचे आहेत….

आता कुकरचा गॅस बंद करावा आणि कुकर मधली वाफ निघाल्यानंतर कुकर उघडून घ्यावे आणि रवीच्या साह्याने आपण तयार केलेले मिश्रण लोणून घ्यावे किंवा घोटून घ्यावे…..

मिश्रण छान असे घोटल्यानंतर आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे…
आता आपण भाजीची फोडणी तयार करणार आहे
भाजीची फोडणी Tadaka Preparation:::
सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट करून घ्यावी….
त्यानंतर शेंगदाणे चांगले भाजून घ्यावे खरपूस शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यावी आणि त्या शेंगदाण्याची जाडसर भरडा करावा…..
आता तडका देण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कढईमध्ये तेल घालायचे आहे त्यामध्ये जिरे मोहरी घाला जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पाने घाला त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट घाला ती चांगली तांबूस रंग आल्यानंतर त्यामध्ये एक चमचा हळद दीड चमचा गरम मसाला इथे तुम्ही कोणत्याही कंपनीचा गरम मसाला वापरू शकता किंवा घरी केलेला सुद्धा गरम मसाला वापरू शकता….

हा गरम मसाला एकदम स्ट्रॉंग हवा….
त्यानंतर एक चमचा धना पूड घालावी आणि व्यवस्थित परतून घ्यावे.….

हे सर्व मिश्रण परतल्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याचे काप घालावे तेही परतवून घ्यावे…

आता आपण कुकरमध्ये जी ग्रेव्ही तयार केलेली आहे त्यावर हे कडकडीत मिश्रण घालावे….

आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यावे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालावे…..
आता या मिश्रणाला शिजण्यासाठी गॅसवर मंद आचेवर ठेवावे….
यामध्ये साधारण उकळते एक ते दीड ग्लास इतके गरम पाणी घालावे…..
आपल्याला भाजी अजून घट्ट वाटत असल्यास अजून तुम्ही एक ग्लास गरम पाणी यामध्ये घालू शकतात….
आता याला चांगला उकड्या आल्यानंतर आपण शेंगदाण्याचे कूट घालूया….

आणि त्यावरून चिरलेली कोथिंबीर घालूया यावर झाकण ठेवून चांगली पाच ते सात मिनिटे आपल्याला ही भाजी छान अशी शिजू द्यायची आहे…. त्यानंतर यामध्ये तुम्ही थोडी पुदिन्याची पाने वरतून घालू शकतात भाजीला एकदम अप्रतिम वास येतो किंवा तुमच्याकडे पुदिन्याची पूड असल्यास ती तुम्ही पाव चमचा घालू शकतात….

हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घाला नाही घातलं तरी चालेल…..
आपली गरमागरम वराडी डाळ गंडोळी तयार झालेली आहे ती आपण ज्वारीच्या भाकरी सोबत चपाती सोबत पोळी सोबत खाऊ शकतो किंवा अशी गरमागरम पिण्यास तर एकदमच अप्रतिम लागते…..

या भाजीच्या शेतांमध्ये पार्ट्या करण्यास तर एकदमच मजा येते …..
तुम्ही अशी भाजी कधी खाल्ली आहे का????
गरमागरम अशी भाजी जी अगदी डोळ्यातून पाणी काढेल अशी झणझणीत भाजी आणि तोंडाला एकदम चव आणणारी!!!!!
तर आपण एन्जॉय करूया गरमागरम वराडी डाळ गंडोरी!!!!
टिप्स/Tips:::
ही भाजी करत असताना आपण इथे तुरीच्या डाळीचाच वापर केला आहे यामध्येच भाजी एकदम चांगली लागते तसेच ही भाजी करत असताना तुम्ही इतर भाजीचा सुद्धा वापर करू शकता जसे की थोडीशी फ्लावर तुम्ही किसून घालू शकतात पालकाची दोन-तीन पाने घालू शकतात…. तसे चूक म्हणून सुद्धा तुम्ही ही भाजी तयार करू शकतात….
वेळ आणि परिमाण Time and Quantity:::
तयारी ची वेळ::२० मिनिटे
एकूण वेळ::५५ मिनिटे
परिमाण ::१० व्यक्ती साठी
टॅग्स आणि कीवर्ड Tags and Keywords

#VaradSpecial #VaradDalGandori #DalGandori #GandoriBhaji #MirchichiBhaji #ZanzanitBhaji #TikhatBhaji #MaharashtrianFood #KhandeshiFood #KhandeshiRecipe #DesiFood #TraditionalFood #SpicyFood #MaharashtraSpecial #VillageFood #HomemadeFood #FoodLovers #Foodie #IndianCuisine #मिरचीचीभाजी #झणझणीतभाजी #खान्देशीखाद्यसंस्कृती #खान्देशीफूड #मराठमोळं #घरगुतीचव #वराडस्पेशल #डाळगंडोरी #चटकदारभाजी
Anarsa Preparation DalBatiRecipe DesiKhandeshi DesiKhandeshiZaiqa Diwali Faral Diwali Sweets easy homemade recipe Festive Recipes GavrooranFood Homemade Flour homemade recipe Homemade Sweets Indian Snacks Indian Sweets JalgaonFood KalnyachiBhakri khandesh-special KhandeshiFlavors KhandeshiFood KhandeshiRecipes KhandeshiShevBhaji KhandeshiVangyacheBharit KhandeshiVaranBatti KhandeshiZanazanit KhandeshiZatpat KhandeshSpecial Maharashtrian food Maharashtrian Recipe Maharashtrian Recipes MaharashtrianRecipes MaharashtrianThali Marathi recipe Marathi Recipes MarathiSwayampak ShevBhaji Swaad GharCha sweet Traditional Diwali Recipes Traditional Indian Sweets TraditionalMarathiFood VaranBatti Vrat Special Recipe {mar} recipe घरगुती रेसिपी मराठी रेसिपी
-
वऱ्हाड स्पेशल डाय गंडोरी किंवा झणझणीत अशी मिरच्यांची भाजी. !!!varhad Dal Gandori

📅 27 Nov 2026👁 4 वेळा पाहिले 💬 WhatsApp वर शेअर करा 🔗 लिंक कॉपी ♡ सेव्ह वराड स्पेशल डाय गंडोरी किंवा झणझणीत अशी मिरच्यांची भाजी. !!!varad Dal Gandori प्रस्तावना Introduction::: वराड स्पेशल डायगणोळी म्हटली की सगळ्यांच्या तोंडाला एकदम पाणी सुटते ज्यांनी पण ही भाजी खाल्लेली आहे त्यांना तर एकदमच आनंद होतो की चला आज…







