रेसिपी नाव/ Racipe Name:: कारल्याची झटपट भाजी -Bitter Gourd Recipe-कमी कडूपणाची चवदार कारल्याची भाजी
प्रस्तावना /Introduction:::
कारल्याची भाजी तर आपण नेहमीच करतो परंतु ती अगदी झटपट कशी बनवली आणि कमी साहित्यामध्ये कशी बनेल आणि चवदार कशी बनवली जाते….
पूर्वीची स्त्रिया शेतात जाण्यासाठी झटपट असा भाज्या तयार करायच्या त्या कशा तयार होतील हे आपण बघूया आणि शिवाय त्या भाज्या कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये कशी तयार केली जातात ती त्या बघायच्या….
शिवाय डायबेटीस पेशंट साठी ही भाजी अगदी योग्यच आहे…
कारण त्यामध्ये कुठलेही शेंगदाण्याचे कूट याचा वापर केलेला नाही त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची भीती नाही…..
आणि डायबिटीस साठी कारले हे अत्यंत उपयोगी असतात…..
तशीच रेसिपी आज आपण बघणार आहे…

साहित्य/ Ingridident::
- पाव किलो कारले
- पाच ते सहा लसूण पाकळ्या
- पाव चमचा हळद
- पाव चमचा जाड कोरड्या झालेल्या मिरच्यांचा तिखट
- चवीप्रमाणे मीठ
- चिरलेली कोथिंबीर
- जिरे मोहरी फोडणीसाठी तेल
भाजीची कृती/Preparation of Sabji:::
सर्वप्रथम आपण कारले चिरून घेऊ…..
कारले आपल्याला गोल चकती प्रकारामध्ये कापायचे आहे…
. कारले आपल्याला बारीक आणि गोल काप करायचे….
पातेल्यात पाणी घेऊन अर्धा चमचा मीठ घाला….
त्यामध्ये कारल्याचे काप घाला…
पंधरा ते वीस मिनिटं भिजू द्या….
आणि ती कारले स्वच्छ धुऊन घ्या दोन ते तीन पाण्याने आपल्याला कारले स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे….
कारले पाण्यात ठेवल्याने त्यातील कडूपणा कमी होतो….
आपण कडूपणा कमी करण्यासाठी नेहमी गुळाचा आणि चिंचेचा वापर करतो परंतु इथे आपण दुधाचा किंवा चिंचेचा वापर करणार नाही….. कढई मध्ये तेल घाला….
त्यानंतर त्यामध्ये लसणाचे काप घाला…
त्यामध्ये थोडे कारल्याचे काप घाला….
आता त्यामध्ये पाव चमचा हळद आणि पाव चमचा जाड भरड कोरड्या मिरचीची तिखट घाला….
आपण इथे तिखटाचा वापर केला आहे हिरव्या मिरचीचा वापर केलेला नाही हे जे तिखट आपण वापरलेले आहे ते अत्यंत तिखट असते त्यामुळे आपण इथे पाव चमचा तिखट घातलेले आहेत तुम्हाला अगदी झणझणीत आवडत असल्यास तुम्ही अर्धा चमचा वापर करू शकतात…..
किंवा तुम्ही हिरव्या मिरच्या चे काप करून लसण प्रमाणे परतवून घेऊ शकतात….
आता यामध्ये संपूर्ण कारले घाला…
आणि व्यवस्थित भाजी एकत्र करून घ्या…
साधारण पंधरा मिनिटे भाजी शिजू द्या…
साधारण दोन ते तीन मिनिटांनी भाजी ढवळून घ्यायची आहे नाहीतर ते जळकट लागेल….
कढाईला चिकटून जाईल….
आता पंधरा मिनिटे झाल्यानंतर आपले कारले चांगले शिजलेले असतील….
त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला आणि पुन्हा एक मिनिटे वाफ येऊ द्या आणि भाजीचा गॅस बंद करा वरून चिरलेली कोथिंबीर घाला आपली गरमागरम डायबेटीस विशेष कारल्याची भाजी तयार झालेली आहे…..
ही तुम्ही ज्वारीच्या भाकरी सोबत किंवा फुलके सोबत किंवा चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता…..
टिप्स /Tips::: भाजी तयार करत असताना कारले कापल्यानंतर तुम्ही मिठाच्या पाण्यात सुद्धा भिजवले जातात….
पूर्वीच्या स्त्रिया कारल्याचे काप रात्रीच करून ठेवायचे आणि रात्री मिठाच्या पाण्यामध्ये भिजू घालून द्यायचे आहे आणि सकाळी ती भाजी तयार करायची आहे त्यामुळे मीठ त्यामध्ये मुरून भाजीचा कडू पणा कमी व्हायचा….
या पद्धतीने सुद्धा तुम्ही भाजी तयार करू शकता…. सकाळी मात्र मिठाच्या पाण्यातनं काढल्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने ती भाजी धुवून घ्यावी…..
वेळ आणि परिमाण/ Time and Quantity:::
तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ::३० मिनिटे
परिमाण::२ व्यक्तीसाठी
टॅग्स आणि कीवर्ड/Tags Keyword::

#EasyKarelaSabji #KarelaRecipe #BitterGourdRecipe #KarelaKiSabji #KarelaFry #MarathiRecipes #MaharashtrianFood #IndianVegRecipes #EasyCooking #HealthyVegetarian #GharghutiRecipe #SwaadGharचा


![झटपट कोरडी शेव भाजी [लहान मुलांचे डब्यावाली]](https://swaadgharcha.com/wp-content/uploads/2025/10/WhatsApp-Image-2025-11-04-at-11.53.33-2-768x1324.jpg)




