खमंग कुरकुरीत असे अनारसे!!! Anarse

0 views

खमंग कुरकुरीत असे अनारसे!!! Anarse


प्रस्तावना/Introduction::::

अनारसे म्हटले की सर्वांच्या तोंडाला पाणी सुट्टी पूर्वी आमची आजी खूप सारे डबा भर अनारसे तळून ठेवायची!!!! आणि आम्ही पूर्ण दिवाळीवर हे अनारसे खायचं!!!!

पण आता येणार जे तयार कसे करायचे ही पद्धतच लवकर सापडतही नाही आणि कसे करायचे हा मोठा प्रश्न पडतो????
आपण आज या प्रश्नाचे उत्तर शोधणार आहे आणि ही रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे…

खमंग कुरकुरीत असे अनारसे!!! Anarse


साहित्य/ Ingridident::::

एक किलो तांदूळ अर्धा किलो पिठीसाखर तळण्यासाठी तूप किंवा तेल आणि खसखस


कृती/Procedure:::

अनारसे पीठ कसे तयार करायचे हे मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहे त्याची रेसिपी आपल्या वेबसाईटला दिलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला यामध्ये पुढे शेअर केलेलीच आहे ती तुम्ही बघून अनारसे चे पीठ आधी तयार करून घ्यावे……

कारण पीठ तयार केल्याशिवाय आपल्याला अनारसे तयार करता येत नाही आपण या अनारसेच्या पिठाचे गोळे तयार केलेले असतात ते तुम्ही साधारण सहा महिने स्टोअर करून ठेवू शकतात….

आता एक गोळा काढून त्यामध्ये दोन ते तीन थेंब दुधाचे घालून त्याचा मऊसूद असा गोळा चांगला हाताने भरपूर वेळ मोडून चांगला त्याचा मऊ सूद असा गोळा तयार करा…. एका बाजूला कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा…

खमंग कुरकुरीत असे अनारसे!!! Anarse – फोटो 2

.हा गोळा तयार केल्यानंतर तुम्ही छोटंसी हातावर गोळी तयार करून घ्या ….त्यानंतर ती गोळी ज्याप्रमाणे आपण पुरी तयार करतो त्याप्रमाणे हाताने दाबून दाबून त्याची पुरी तयार करून घ्या एका बाजूने त्याला डिश मध्ये खसखस घेऊन त्याला खसखस लावा …..

खमंग कुरकुरीत असे अनारसे!!! Anarse – फोटो 3

आणि ती दाबून घ्या जेणेकरून ती खसखस तळताना निघणार नाही…. इथे आपल्याला एक एकच गोळा तयार करून आपल्याला एकेक अनारसा तयार करायचा आहे आता अनारसा ज्या बाजूने आपण खसखस लावलेली आहे त्या बाजूने गरम तेलामध्ये सोडावा…..

खमंग कुरकुरीत असे अनारसे!!! Anarse – फोटो 4

त्यानंतर तू एकाच बाजूने तळावा अनारसा हा एकच बाजूने तळला जातो दोघ बाजूने तळल्या जात नाही खालची बाजू छानशी तांबूस रंग वर झाली की आपला अनारसा तळला गेला….

हे अनारसे एकदम खायला अप्रतिम लागतात आणि एकदम जास्त लालही करायचे नाही नाहीतर ते एकदम कडक होऊन जातील आणि तोडण्यास कठीण जातील…. त्यामुळे तांबूस रंग हा मध्यम हवा अनारसा एकदम लाल करू नये…..

खमंग कुरकुरीत असे अनारसे!!! Anarse – फोटो 5


याच पद्धतीने पुन्हा हातावर गोळी करून पुरी प्रमाणे ते थोडी लांबून एका बाजूने त्याला खसखस लावून बाकी ही अनारसे आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहे….

हे अनारसे तुम्ही वेळोवेळी तयार करू शकतात म्हणजेच तुम्हाला ज्या वेळेस अनारसे खावेसे वाटली त्यावेळेस दोन-तीन थेंब दुधाचे घालून आपण जो गोळा तयार केलेला आहे तो फ्रीजमधून काढून मळून घ्यावा……

खमंग कुरकुरीत असे अनारसे!!! Anarse – फोटो 6

इथे दुधाचे प्रमाण दोन ते तीन थेंब जरी दिलेले असले तरी तुमचा गोळ्याचा आकार किती मोठा आहे त्यानुसार आपण थोडे थोडे दूध टाकत घ्यायचे कारण जास्त दूध झाल्यास गोळा पातळ होईल …..

आणि आपला अनारसा जमणार नाही म्हणून आपण इथे थोडे थोडे दूध टाकायचे आहे….आणि अनारसे तळून घ्यावे… अति छानसे कुरकुरीत गरमागरम अनारसे तयार आहेत….


टिप्स/Tips :::

अनारसेचे पीठ मळत असताना अगदी थेंब थेंब इतके दूध घालावे नाहीतर मिश्रण पातळ झाल्यास आपले अनारसे तेलामध्ये किंवा तुपामध्ये वितळू शकतात…. तसेच तुपामधील अनारसे सात ते आठ दिवसात संपवावे लागतात त्याला वेगळा वास येतो जर तुम्हाला तेलातले आवडत असतील तर तुम्ही अनारसे तेलात तळा म्हणजे ते साधारण पंधरा दिवस तरी चांगले राहतात….


वेळ व परिमाण/Time and Quantity::


तयारीची वेळ::२० मिनिटे
एकूण वेळ::३० मिनिटे
परिमाण::५० ते ६०अनारसे


टॅग्स आणि कीवर्ड Tags and Keywords

अनारसे पिठाची रेसिपी :::

You may also like

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
आईसक्रीमइतरउडीपीउपवासउपवास पापडउपवास विशेषऋतु नुसारकिलबिलकेककैरी लोणचेकोजागिरीखान्देश विशेषगणेश चतुर्थीगुजरातीगोडगोडवाचटणी-कोशिबीरचटर पटरचायनीजझटपट (फास्ट फूड)झणझणीत-मसालेदारतांबडा रस्सादिवाळी फराळनानकटाईन्याहरीपंजाबीपराठा / भाकरीपापडपेयप्रादेशिकबर्फीबेकरीमकरसंक्रातीमसालेदारमहाराष्ट्रीयनमुंबई स्पेशलरस्सा भाजीलस्सीलाडूलिंबू लोणचेलोणचेवर्षभर साठवणूक चटपटीतशिराशेकसण विशेषसरबतसुकी भाजीसूपहळद मिरची लोणचेहिरवा रस्साहोळी
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.