डीऱ्याची भाजी
प्रस्तावना खानदेश भागाकडे चवळीच्या झाडाला नवीन कोवळे कोवळे येणारे शेंडे तोडून घेतले जातात या कोवळ्या शेंड्यांनाच डीऱ्या असे म्हणतात……

आणि त्याची भाजी केली जाते त्या शेंड्यांना डीऱ्या असे म्हटले जाते.. डीऱ्या या कोवळ्या असून त्याची कोरडी आणि रस्सा भाजी अत्यंत चवदार लागते आणि पौष्टिकही असते… यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात…..
साहित्य:::

- साधारण दोन दोन जुड्या डीऱ्या
- अर्धी वाटी तुरीची डाळ
- आठ ते दहा हिरव्या मिरच्या
- अर्धी वाटी शेंगदाणे
- कोथिंबीर
- दहा ते बारा लसूण पाकळ्या
- अर्धा इंच अदरकाचा तुकडा
- पाव चमचा हळद
- पाव चमचा गरम मसाला
- चवीप्रमाणे मीठ
- फोडणीसाठी जिरे मोहरी
- आणि तेल
कृती:::
सर्वप्रथम दिऱ्या या दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या त्यानंतर त्या बारीक चिरून घ्या…. बारीक चिरल्यानंतर कुकरमध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून दोन शिट्या घेऊन शिजवून घ्या….

शिजवल्यानंतर पुन्हा त्यातील पाणी काढून घ्या आणि दुसऱ्या पाण्यामध्ये घाला आणि त्यातील पाणी दाबून काढून घ्या म्हणजे या धुतल्या जातील…
भाजीला कुठलाही वास येणार नाही…. शिवाय एका पातेल्यामध्ये तुरीची डाळ शिजवून घ्या तुम्ही ही डाळ कुकरमध्ये एक शिट्टी घेऊन सुद्धा शिजवून घेऊ शकता….

आता नेहमीप्रमाणे आपण हिरव्या रस्सा भाजीला ज्याप्रमाणे शेंगदाणे आणि मिरच्या खरपूस भाजून घेतो त्याप्रमाणे शेंगदाणे आणि मिरच्या खरपूस भाजून घ्या…..

शेंगदाण्यांचे साल तुम्ही काढून घेऊ शकता आणि नाही काढले तरी चालेल…
. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेल्या हिरव्या मिरच्या शेंगदाणे, अद्रक लसूण आणि कोथिंबीर घालून बारीक अशी चटणी वाटून घ्या…..
या चटणी मध्ये तुम्ही पाणी घालून वाटून घेऊ शकतात म्हणजे चटणी एकदम बारीक होईल…. त्यानंतर चटणीमध्ये पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला घालून घ्या….

तसेच चवीप्रमाणे मीठ सुद्धा चटणी मध्येच घालायचे आहे… आता कढईमध्ये तेल गरम करून घ्या…
तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये फोडणीसाठी जिरे मोहरी आपली चटणी घाला चटणी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत चांगली परतवून घ्या….

चटणीला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण उकळलेली डीऱ्या ची भाजी मोकळी करून घाला….. त्यानंतर त्यामध्ये उकळलेली तुरीची डाळ घाला आणि व्यवस्थित एकत्र करून घ्या…

आता एक ते दीड ग्लास गरम पाणी करा… आणि एक ते दीड ग्लास पाणी भाजीच्या मिश्रणामध्ये घाला तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी….

त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकतात मी इथे दीड ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे… आता भाजीवर अर्धे झाकण ठेवून भाजीला चांगल्या चार ते पाच उकळ्या मंद आचेवर येऊ द्या…
भाजीला चांगल्या उकड्या आल्यानंतर भाजी शिजल्यानंतर त्याचा गॅस बंद करा….

ही गरमागरम भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरी सोबत बाजरीच्या भाकरी सोबत तसेच गरमागरम पोळी सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकतात….
या भाजीची चव अत्यंत उत्कृष्ट लागते… तसेच अत्यंत पौष्टिक सुद्धा आहे…. त्यामुळे आपल्याला फायबरची गरज असल्यास ही ही भाजी नक्की खावी…. तर आपण एन्जॉय करूया डीऱ्याची भाजी!!!!
टिप्स:::
इथे भाजी उकडल्यानंतर सुद्धा एका पाण्यातन आपण तिला काढून घेतली आहे याचे कारण असे की भाजीला थोडा उग्र वास येतो तो वास निघून जातो त्यामुळे भाजीला थोडाही उग्र वास येणार नाही…. आणि भाजी खाण्यास चविष्ट लागेल….
वेळ व परिमाण ::
तयारीची वेळ::१० मिनिट
एकूण वेळ::४० मिनिट
परिमाण :: ४व्यक्तींसाठी
