पोकळ्याची कोरडी भाजी

by Vaishali Chaudhari

पोकळ्याची कोरडी भाजी


प्रस्तावना::

पोकळ्याची कोरडी भाजी ही हिरव्या पालेभाज्यांमध्ये येते. तसेच त्यामध्ये पौष्टिकता खूप असते .

साहित्य::

  • एक पोकळ्याची जोडी
  • सहा हिरव्या मिरच्या
  • आठ ते दहा लसूण पाकळ्या
  • जिरे मोहरी
  • फोडणीसाठी तेल
  • हळद पाव चमचा
  • धने पूड पाव चमचा
  • तिखट पाव चमचा
  • मीठ
  • शेंगदाण्याचे कूट एक चमचा



कृती ::

सर्वप्रथम पोकळ्याची भाजी तोडून घ्या त्याची पाने तोडून घ्या आणि दांड्यांच्या शिरा काढून घ्या आता ही भाजी स्वच्छ धुऊन घ्या.

दोन ते तीन पाण्यामधून स्वच्छ धुऊन घ्या भाजी बारीक चिरून घ्या. तसेच मिरचीचे काप करून घ्या आणि लसणाचेही काप करून घ्या.

एका कढईमध्ये कडकडीत तेल गरम करा त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घाला. त्यामध्ये लसूण चे काप मिरच्यांचे काप घालून परतून घ्या.

मिरच्या तांबूस रंगावर झाल्या की त्यामध्ये पोकळ्याची भाजी घाला. पोकळ्याची भाजी घालून चांगले परतून घ्या मंद आचेवर झाकण ठेवून भाजीला वाफ येऊ द्या.

नंतर झाकण काढून घ्या भाजीला पाणी सुटलेले असेल. आता ही भाजी चे पाणी आटेपर्यंत आपण भाजी शिजू देऊ.

भाजीचे पाणी आटल्यानंतर पाव चमचा हळद पाव चमचा धने पूड पाव चमचा तिखट घालून चांगले परतून घेणार आहोत त्यामध्ये आपल्या चवीप्रमाणे मीठ घाला.

आता भाजीचे पाणी पूर्णपणे आटू द्या भाजी व्यवस्थित परतून घ्या. भाजी परतल्यानंतर शेंगदाणे भाजून घेऊन त्याचे मिक्सरमध्ये कूट करून घ्या.

एक चमचा कूट भाजीमध्ये घाला भाजी पुन्हा परतवून घ्या आता आपली भाजी चा गॅस बंद करा. पोकळ्याच्या भाजीमध्ये आपण कुठलेही मसाले घालत नाही.

कारण ही भाजी अत्यंत साधी सरळ सोपी आहे. ही पालेभाजी असल्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचे मसाले घालायचे नाही त्यामुळे त्याची पौष्टिकता टिकून राहते.

आपली पोकळ्याची भाजी तयार झालेली आहे… ही पोकळ्याची भाजी तुम्ही पोळी सोबत किंवा भाकरी सोबत खाऊ शकतात…..

टिप्स ::

पोकळ्याची भाजी करताना भाजीच्या दांड्या व्यवस्थित तोडून घ्याव्या त्यातील शिरा व्यवस्थित काढून घ्याव्या. जाड दांड्या घेऊ नये बारीक दांड्यांच्या शिरा काढाव्या त त्याच फक्त भाजी वापरावे.

वेळ व परिमाण::
तयारीची वेळ :१०मिनिटे
एकूण वेळ:२० मिनिटे
परिमाण :२व्यक्तीसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4319

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.