रवा पायनापल साधा सोपा केक

प्रस्तावना:::
ज्यावेळेस आपल्याला फ्रेश फळ मिळतात त्यावेळेस नक्कीच त्या फळांची केक करून बघा..!!! आज मी इथे पायनॅपल म्हणजे अननसाचा केक तयार केलेला आहे!!!!
साहित्य:::

- दोन-तीन अननसाचे काप
- एक वाटी रवा
- अर्धी वाटी दही
- अर्धी वाटी पिठीसाखर
- पाव वाटी बटर वितळलेले
- एक चमचा बेकिंग पावडर
- पाव चमचा खाण्याचा सोडा
- दोन ते तीन थेंब इसेन्स
- अर्धी वाटी दूध
कृती::
दही दूध हे आपल्याला रूम टेंपरेचर वर घ्यायचे आहे… सर्वप्रथम पायनॅपलच्या फोडी करून घ्या… पायनॅपल मिक्सरमधून फिरवून त्याची एकदम बारीक पेस्ट करून घ्या…

एका पातेल्यामध्ये बटर पिठीसाखर घालून चांगले फेटून घ्या.. मिश्रण भेटल्यानंतर त्यामध्ये पायनॅपलची प्युरी घाला..
त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या… त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी दही घाला आणि चांगले व्यवस्थित फेटून घ्या….

आता यामध्ये रवा घालून मिश्रण फेटून घ्या… रवा घातल्यानंतर आपल्याला या मिश्रणाला दहा ते पंधरा मिनिटे रेस्ट द्यायचा आहे….

पंधरा ते वीस मिनिटं रेस द्यायच्या वेळेस बाकी तयारी करून घेऊ… एका केकटीनला बटर ब्रशच्या साह्याने लावून घेऊ आणि त्यामध्ये बटर पेपर ठेवू…
आता कुकरमध्ये रिंग ठेवून पाणी उकळण्यास ठेवून देऊ… हा केक आपण बॅक न करता वाफवून घ्यायचा आहे…
त्यानंतर आपले मिश्रण आता चांगले फुलून आलेले असतील रवा चांगला फुललेला आहे… त्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे इसेन्स घाला…
इथे मी व्हॅनिलाइस यांचा वापर केलेला आहे तुम्हाला पायनॅपल इसेन्स असल्यास तुम्ही तो घालू शकतात…. पायनापल मुळे आपल्या केकला पायनापल फ्लेवर येतोच…

आता आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडावर थोडे दूध घालून त्यामध्ये मिक्स करून घेऊ…. मिश्रण आपल्याला घट्ट वाटत असल्यास जी अर्धी वाटी दूध आपण ठेवले होते ते थोडे थोडे करून तुम्ही त्यात घालू शकता….
मिश्रण जोरजोरात भेटायचे नाही.. यामुळे तुमचा केक फुलणार नाही… हलक्या हाताने बेकिंग पावडर घातल्यानंतर मिश्रण फेटा…
आता हे मिश्रण केकच्या टिन मध्ये घाला.. केकच्या टिन मध्ये घातल्यानंतर केकटीन टॅप करून घ्या… त्यानंतर केकचे भांडे कुकरमध्ये ठेवा…
वर पक्क झाकण ठेवा..25 ते 30 मिनिटे केक चांगला वाफ होऊ द्या…. केकचे झाकण 30 मिनिटांमध्ये उघडायचे नाही…

तीस मिनिटे झाल्यानंतर केक मध्ये सूरी घालून बघा केक चिटकत नसल्यास केक तयार झालेला आहे… त्यानंतर आपल्याला केकचे भांडे बाहेर काढून घ्यायचे आहे…
एक थंड होऊ द्यायचा त्यानंतर केक टीन मधून केक काढून घ्यायचा… आता आपला पायनॅपल केक तयार आहे!!!! एन्जॉय करूया पायनॅपल केक!!!!!
टिप्स::
केक तयार करताना ज्यावेळेस आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालतो त्यावेळेस मिश्रण अगदी अलगद फिरवा.. कारण सोडा ऍक्टिव्हेट होतो त्यामुळे मिश्रण फ्लफी होते.. त्यामुळे आपल्याला केक जाळीदार तयार होण्यास मदत होते…
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ:२० मिनिटे
एकूण वेळ :५०मिनिटे
परिमाण:: अर्धा किलो
