उडदाच्या पापडाचे चटकदार पॅटीस किंवा उडदाच्या पापडाचे पॉकेट्स

by Vaishali Chaudhari

उडदाच्या पापडाचे चटकदार पॅटीस किंवा उडदाच्या पापडाचे पॉकेट्स


प्रस्तावना::


उन्हाळ्याचे वाळवण म्हणजे उडदाचे पापड उडदाचे पापड करत असताना आपण ओल्या पापडापासून बऱ्याचशा रेसिपी तयार करू शकतो त्यातली ही एक उडदाच्या पापडाची पॅटीस किंवा पॉकेट…….


साहित्य::

  • उडदा चे ताजे लाटलेले पापड
  • एक वाटी शेंगदाणे
  • एक चमचा तीळ
  • एक वाटी बारीक शेव
  • आठ ते दहा लसूण पाकळ्या
  • पाव चमचा तिखट
  • मीठ
  • कोथिंबीर,
  • तळण्यासाठी तेल


कृती::


आपण ज्यावेळेस उडदाचे पापड लाटतो त्यावेळेस हे ओले उडदाचे पापड वापरूनच ही रेसिपी केली जाते. ओली उडदाचे पापड म्हणजे लगेच लाटलेले पापड.

आपण सर्वप्रथम त्यात भरायचा मसाला तयार करून घेऊ. शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्या….

मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घाला त्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या पाव चमचा तिखट चवीप्रमाणे मीठ घालून जाडसर भरडा करून घ्या.

एका बाऊलमध्ये शेंगदाण्याचा भरडा काढून घ्या. आता कोथिंबीर बारीक चिरून घ्या. ही कोथिंबीर शेंगदाण्याच्या भरड्यामध्ये घाला.

त्यामध्ये बारीक शेव एक चमचा तीळ घाला. आता हे सारण तयार झालेले आहे. लाटलेल्या पापडाचे चौकोनी(स्क्वेअर ) होतील. तुकडे करून घ्या.

एक तुकडा घेऊन त्याच्या आजूबाजूला ब्रशच्या साह्याने पाणी लावून घ्या. आणि मधोमध सारण भरून घ्या .

आणि तीनही बाजूंनी हे पॉकेट बंद करून घ्या. असे पॉकेट सर्व पापडांचे करून घ्या. उरलेल्या साईच्या तुकड्यांचा सुद्धा त्रिकोणी आकारांमध्ये पॉकेट करू शकतात.

म्हणजे तेही वाया जाणार नाही. याप्रमाणे आपण सर्व पॅटीस किंवा पॉकेट तयार करून घेतलेले आहे. आता कढईमध्ये तळण्यासाठी तेल घाला.

गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक दोन पॉकेट किंवा पॅटीस खालून चांगले तांबूस रंगावर खरपूस तळून घ्या. आता हे पॉकेट सर्व तळून घ्या.

हे पॉकेट चवीला अत्यंत चटपटीत लागते… मुलांना तर ही रेसिपी खूपच आवडते… आता पॉकेटचे दोन काप करून मुलांना टोमॅटो केचप सोबत सर्व्ह करू शकतात…

मुलांसाठी ज्यावेळेस आपण पापड करतो त्यावेळेस ही रेसिपी नक्की करून बघा मुलांना ही रेसिपी अत्यंत आवडते…

हे पॅटीस चांगली कुरकुरीत तयार होतात… पापडा मध्ये सर्व प्रकारचे मसाले असतात त्यामुळे पॅटीस अत्यंत चटपटीत बनते….


टिप्स::

तुम्हाला सारणा मध्ये तीळ ऐवजी तुम्ही खसखस चा वापर करू शकतात….


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ :१०मिनिटे
एकूण वेळ :२५मिनिटे
परिमाण दोन व्यक्ती साठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4787

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.