
गवाराची दाणे लावून भाजी
प्रस्तावना:
हिरवी भाजी म्हटली म्हणजे शेंगदाणे लावून चटणीची भाजी!!! आणि गरमागरम ज्वारीची भाकरी आय मस्त बॅक आहे नाही का!!!! चला तर मग बघू आपण गवाराची हिरवी रस्सा भाजी
साहित्य::

अर्धी वाटी शेंगदाणे नऊ हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसूण पाकळ्या पाव इंच अद्रकाचा तुकडा कोथिंबीर फोडणीसाठी तेल जिरे मोहरी पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा धनापूर
कृती::



सर्वप्रथम गवाराच्या शेंगा तोडून घ्याव्या… म्हणजेच त्याच्या शिरा काढून छोटे तुकडे करावे… दोन ते तीन पाण्याने शेंगा धुऊन घ्याव्या.. नंतर एका पातेल्यामध्ये शेंगा घालून दहा ते दहा मिनिटे उकळून घ्यावे… त्यानंतर त्यातील पाणी फेकून द्यावे… तवा गरम झाल्यानंतर मिरच्या चांगल्या खरपूस भाजून घ्याव्या. त्यानंतर शेंगदाणे हे खरपूस भाजून घ्यावे… शेंगदाण्याची साल काढून घ्यावी… एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या शेंगदाणे कोथिंबीर लसूण पाकळ्या अद्रकाचा तुकडा हे सर्व वाटण पाणी घालून बारीक अशी चटणी करून घ्यावी… चटणी चांगली एकदम बारीक वाटून घ्यावी ….. त्यानंतर एका कढईमध्ये कडकडीत तेल गरम करून घ्यावे.. त्यामध्ये जिरे मोहरी लसणाचे काप घालून तांबूस रंगावर आल्यानंतर चटणी घाला चटणी मध्ये पाव चमचा हळद पाव चमचा धनापुर पाव चमचा गरम मसाला घालून तेल सुटेपर्यंत आपल्याला चटणी परतायची आहे….


चटणी सतत ढवळत रहा… जेणेकरून ती कढईला लागणार नाही…. चटणीला चांगले तेल सुटले की मग मध्ये उकळलेल्या गवारीच्या शेंगा घाला… नंतर एक ते दीड ग्लास गरम पाणी करून घ्या… हे गरम पाणी आपल्या चरणीच्या मिश्रणामध्ये घाला… आणि मंद आचेवर आपल्या भाजीला दोन ते तीन उकळ्या येऊ द्या… त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला… अर्धवट झाकण ठेवून दोन ते तीन पोकळ्या भाजीला येऊ द्या भाजी चांगली शिजली की मग गॅस बंद करा… इथं गवाराची भाजी तुम्ही भाकरी सोबत किंवा पोळी सोबत खाऊ शकता छान असा काला मोडून त्यावर भाजी घेऊन तुम्ही खाऊ शकतात….. तर तयार आहे खानदेश स्पेशल गव्हाची हिरवी रस्सा भाजी…..

टिप्स:::
चटणी भाजताना शेंगदाणे आणि मिरच्या चांगल्या खरपूस भाजून घ्या नाहीतर भाजीमध्ये कचवटपणा लागेल… आणि चटणी परतवतानाही ते सुटेपर्यंत चटणी आपल्याला परतावायची आहे लगेचच त्यामध्ये पाणी घालायचं नाही….
वेळ व परिमाण:::
तयारीची वेळ: १० मिनिटे
एकूण वेळ::३० मिनिटे
परिमाण :दोन व्यक्तीसाठी
