कांदा करोड्याची (सांडग्यांची) हिरवा रस्सा भाजी

by Vaishali Chaudhari
0 views

कांदा करोड्याची (सांडग्यांची) हिरवा रस्सा भाजी


प्रस्तावना:::

हिरवा रस्सा म्हटले की तोंडाला पाणी सुटणारच!!! सोबत छान पडलेला कांदा आणि लिंबाचे लोणचे!!! कोणा कोणाच्या तोंडाला पाणी सुटले तर मग!! नक्की बनवून बघा!!!


साहित्य:::

  • दोन कांदे
  • एक तुकडा खोबरं
  • आठ ते दहा लसूण पाकळ्या
  • अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
  • आठ ते दहा हिरव्या मिरच्या
  • कोथिंबीर
  • जिरे मोहरी
  • पाव चमचा हळद
  • अर्धा चमचा धनापुर
  • पाव चमचा गरम मसाला
  • फोडण्यासाठी तेल
  • चवीप्रमाणे मीठ
  • एक वाटी करोडे


कृती:::

दोन कांद्यांमधील थोडा कांदा वेगळा काढून नंबर चिरून घ्या…

बाकी उरलेल्या दीड कांद्याचे तुकडे करून घ्या आणि खोबऱ्याचे सुद्धा काप करून घ्या… आता कांद्याचे आणि खोबऱ्याचे का चांगले काळ काळे सर रंगावर भाजून घ्या….….

त्यानंतर गरम तव्यावर थोडे तेल घालून करोड भाजून घ्या…. आणि हे करोडे थोडे तांबूस रंगावर भाजून घ्या…

आता हे करोडे भांड्यामध्ये काढून घ्या आणि थोडे बारीक करून घ्या…. आणि आपण भाजलेले कांदा खोबरं आणि मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला

त्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकाचा तुकडा आणि पाव चमचा जिरे आणि कोथिंबीर घालून थोडे पाणी घालून चांगले बारीक वाटण करून घ्या…

म्हणजेच हिरवे चटणी तयार होईल… हिरवी चटणी तयार झाल्यानंतर थोडे पाणी घालून एकदम व्यवस्थित बारीक करा…

आता कढईमध्ये तेल गरम करा… तेल गरम केल्यानंतर जिरे मोहरी घाला लसणाचे काप घाला. आणि लांबा चिरलेला कांदा घाला आणि परतवा…

त्यानंतर त्यामध्ये केलेली हिरवी चटणी घाला… आणि तेल सुटेपर्यंत परतवून घ्या… आता या चटणी मध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पूड पाव चमचा गरम मसाला घालून चटणी चांगली तेल सुटेपर्यंत परतवा….

आता चटणीला चांगले तेल सुटलेले आहे… साधारण दीड ते दोन ग्लास पाणी गरम करून घ्या… चटणी मध्ये आपण परतवलेले करोडे घाला…

त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घाला.. भाजीला सांगा दोन ते तीन उकळ्या येऊ द्या… त्यावर झाकण ठेवा.. आता चवीप्रमाणे मीठ घाला…

पुन्हा दोन ते तीन उकळ्या येऊ द्या… त्यावर चिरलेली कोथिंबीर घाला.. आता भाजीचा गॅस बंद करा… आपली करोड्यांची हिरवी पातळ भाजी तयार झालेली आहे..

ही पातळ भाजी आपण ज्वारीच्या भाकरी सोबत पोळी सोबत खाऊ शकतो.. लिंबाचे लोणचे उडदाचे पापड चिरलेला कांदा सोबत घेऊन जेवण करूया…. करोड्यांची हिरवी रस्सा भाजी!!!!


वेळ व परिमाण:::
तयारीची वेळ::२० मिनिट
एकूण वेळ:: ४०मिनिटे
परिमाण:: ४व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

8435

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.