चवळीची हिरवी रस्सा भाजी

by Vaishali Chaudhari
0 views

चवळीची हिरवी रस्सा भाजी


प्रस्तावना:::

रोज काय भाजी बनवायची त्यासाठी घेऊन आली आहे खान्देश स्पेशल चवळीच्या दाण्यांची हिरवी रस्सा भाजी!!!! हिरवी रस्सा भाजी मध्ये आपण चपाती मोडून खाऊ शकतो किंवा भाकरी मोडून खाऊ शकतो!!!!!


साहित्य:

  • पाव किलो चवळीचे दाणे
  • सात हिरव्या मिरच्या
  • अर्धी वाटी शेंगदाणे
  • 10 लसूण पाकळ्या
  • पाव इंच अद्रकाचा तुकडा
  • कोथिंबीर
  • जिरे मोहरी
  • पाव चमचा हळद
  • पाव चमचा गरम मसाला
  • चवीप्रमाणे मीठ
  • फोडणीसाठी तेल


कृती:::

सर्वप्रथम चवळीच्या शेंगा सोलून घ्या त्यातील दाणे वेगळे करून घ्या.. गाणे स्वच्छ धुऊन घ्या…. दाणे स्वच्छ धुतल्यानंतर कुकरमध्ये पाणी घालून एक ते दोन शिट्या होऊ द्या….

किंवा तुम्ही पातेल्यामध्ये वाफवून घेतले तरी चालेल…


हिरव्या चटणी ची तयारी:::

सर्वप्रथम तव्यावर हिरव्या मिरच्या चांगल्या खरपूस भाजून घ्या…. त्यानंतर शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्या….

शेंगदाणे चांगले खरपूस भाजल्यानंतर त्याचे शेंगदाण्याचे साल काढून घ्या… मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या शेंगदाणे आठ एक लसूण पाकळ्या अद्रकाचा तुकडा पाव चमचा जिरे कोथिंबीर घालून पाणी घालून बारीक चटणी वाटून घ्या….

आपली हिरवी चटणी वाटून घ्या…


कढईमध्ये तेल गरम करा… त्यामध्ये मोहरी जिरे आणि लसणाचे काप घालून ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये चटणी घाला…

या चटणी मध्ये पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला घालून चटणी तेल सुटेपर्यंत चटणी परतवून घ्या….

चटणीला सांगलीतील सुटल्यानंतर त्यामध्ये चवळीचे दाणे घाला व्यवस्थित मिक्स करून घ्या…. त्यानंतर त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घाला आणि चांगल्या उकळ्या येऊ द्या….

उकळ्या आल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला….. वरून थोडी चिरलेली कोथिंबीर घाला…आता आपली गरमागरम चवळीची हिरवी रस्ता भाजी तयार झालेली आहे…

आपण ही भाजी ज्वारीच्या भाकरी सोबत किंवा पोळी सोबत चपाती सोबत खाऊ शकतो…


टिप्स:::

हिरवी चटणी करताना शेंगदाणे चांगले खरपूस भाजायचे आहे.. नाहीतर चटणी मध्ये कचवटपणा लागेल..


वेळ व परिमाण:::


तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ:३० मिनिटे
परिमाण:२ जणांसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

8603

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.