गिलक्याच्या भरताचे पराठे
प्रस्तावना
बऱ्याचदा आपल्याकडे काही ना काही भाजी शिल्लक असते… केले होते त्यामुळे माझ्याकडे दिलकाचे भरीत शिल्लक आहे… त्या उरलेल्या भाजी पासून वाया न जाऊ देता आपण पराठे बनवू शकतो ती भाजी कुठली असेल….
साहित्य:::
एक वाटी गिलक्याचे भरी त एक मोठा कांदा एक वाटी मक्याचे पीठ अर्धी वाटी गव्हाची कणीक अर्धी वाटी बेसन पीठ एक चमचा ओवा एक चमचा तीळ पाव चमचा हळद पाव चमचा धनापुर चवीप्रमाणे मीठ तेल
कृती सर्वप्रथम कांदा सोलून तो किसून घ्यावा.. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी… त्यानंतर एका परातामध्ये मक्याचे पीठ गव्हाची कणी क आणि अर्धी वाटी बेसन पीठ घालून त्यामध्ये एक चमचा ओवा एक चमचा तीळ घालावी चवीप्रमाणे मीठ घालावे पाव चमचा हळद पाव चमचा धनापुर आणि आपण जो कांदा किसलेला होता तो कांदा यामध्ये घालावा आणि चिरलेली कोथिंबीर आणि या सर्व मिश्रणामध्ये गिलक्याचे भरीत घालून पण गोळा मळून घ्यावा… तुम्हाला पाण्याची गरज लागत असल्यास तुम्ही पाण्याचा वापर करू शकता इथे मला पाण्याचा वापर करण्याची गरज पडली नाही कारण आपण जो कांदा घातलेला आहे त्यालाही पाणी सुटले आहे आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये माझे पीठ मळून झाले आहे… गोळा मळाल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या… आता आपल्या ला हव्या त्या आकारामध्ये आपण पराठा लाटून घेऊ शकतात इथे मी त्रिकोणी आकांना मध्ये पराठा लाटून घेतला आहे आता तवा गरम करून त्यावर आपल्याला दोन्ही बाजूंनी पराठाचांगला खरपूस भाजायचा आहे… बसताना आपल्याला दोन्ही बाजूने तेल लावायचे आहे… पराठा दोन्ही बाजूने चांगला खरपूस भाजल्यानंतर तो तुम्ही काढून घ्या नंतर याप्रमाणे सर्व पराठे लाटून तयार करा… आता हे सर्व पराठे झाल्यानंतर हे तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा सॉस सोबत खायला देऊ शकतात असे तुम्ही कुठल्याही भाजीचे पराठे तयार करू शकता इथे मी मिरचीचा वापर केलेला नाही कारण भरता मध्ये मिरच्या आधीच आहेत त्यामुळे यामध्ये मिरच्या घालायची गरज पडली नाही.. परंतु तिखट आवडत असल्यास अर्धा चमचा तुम्ही तिखट घालून पराठा तयार करू शकतात… आपल्या गरमागरम भारताचा पराठा तयार झालेला आहे हा तुम्ही तुमच्या लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकतात… एन्जॉय करूया गरमागरम गिलक्याचा पराठा!!!!
टिप्स:: मी इथे गिलक्याचे भरीत वापरले आहे तुमच्याकडे जी भाजी शिल्लक असेल त्या भाजीचा तुम्ही वापर करू शकता..…आणि याच पद्धतीने तुम्हाला गोळा मळून घ्यायचा आहे..
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ : १०मिनिटे
एकूण वेळ:: २०मिनिटे
परिणाम::२ व्यक्तींसाठी
