तुरीची उसळ

प्रस्तावना::
तुरीची उसळ ही मोड आलेल्या धान्यांपैकी एक उसळ आहे. तुरीच्या उसळ मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहेत. ही उसळ थंडीच्या दिवसात खावी. तुरी भिजत घालूनच मोड आणून व्यवसाय चा वापर करायला पाहिजे.
साहित्य::

- पाव किलो मोड आलेले तुरीची दाणे
- तीन मिडीयम आकाराची कांदे
- पंधरा ते वीस लसूण कळ्या
- अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
- कढीपत्त्याची पाने
- तीन हिरव्या मिरच्या
- कोथिंबीर
- पाव चमचा हळद
- एक चमचा तिखट
- पाव चमचा गरम मसाला
- पाव चमचा धण्याची कूट
- अर्धी वाटी शेंगदाणे
- जिरे मोहरी
- फोडणीसाठी
- तेल
- मीठ
- पाणी
कृती::
सर्वप्रथम रात्री कोरडे तुरीचे दाणे धुऊन घ्यावे. तुरीचे दाणे रात्री भिजत घालावे.
भिजल्यानंतर सकाळी पुन्हा धुवून घ्यावे. एका ओल्या रुमाला मध्ये हे भिजलेले तुरीचे दाणे बांधून ठेवावे.
एक दिवस पूर्ण मोड आणण्यासाठी लागतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मोड आले आहेत की नाही ते बघून घ्यावेत.
उन्हाळ्यात पटकन मोड येतात. हिवाळ्यात मोड येण्यास वेळ लागतो. कदाचित दीड दिवसाचा कालावधी सुद्धा लागतो.
अशा वेळेस छोटे छोटे मोड येतात तशाही दाण्यांची आपण उसळ बनवू शकतो. कारण दोन दिवस दाणे मोड आणण्यास ठेवल्यास ते चिकट होऊ शकतात आणि चवीतही फरक पडू शकतो.
त्यामुळे छोटे मोड आले त्यावेळेसही तुम्ही उसळ करू शकतात. आता मोड आलेली दाणे घ्या.
एका पाच लिटरच्या कुकरमध्ये हे दाणे स्वच्छ धुऊन निम्मे पाणी भरा. चांगल्या आठ ते नऊ शिट्ट्या होऊ द्या.
दाणे मऊसूद शिजले पाहिजेत. कारण दाणे शिजले नाही तर उसळ कडक होऊन जाईल आणि पचनास जड जाईल.
आठ ते नऊ शिट्ट्या झाल्यानंतर कुकर बंद करा. तीनही कांदे सोलून बारीक चिरून घ्या. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या अद्रकाचा तुकडा आणि तिने मिरच्या याची चटणी करून घ्या.
एका गरम तव्यावर अर्धी वाटी शेंगदाणे चांगले भाजून घ्या. या शेंगदाण्याची मिक्सरमध्ये कूट करून घ्या.
एका कढईमध्ये तेल कडकडीत गरम करा त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घाला. कढीपत्ता आणि चिरलेला कांदा तांबूस रंगावर परतून घ्या.
या मिश्रणामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा धने पूड एक चमचा तिखट पाव चमचा गरम मसाला घाला.
त्यानंतर त्यामध्ये आपण उकडलेली तुरीची उसळ घाला. त्यावर झाकण ठेवा. पाच ते दहा मिनिटे चांगले वाफवून घ्या.
चवीप्रमाणे मीठ घाला. त्यानंतर चिरलेली कोथिंबीर घाला. आता आपण जे शेंगदाण्याची कूट केलेले आहे ते घाला.

शेंगदाण्याची कूट आपण सर्वात शेवटी घातलेले आहे कारण शेंगदाण्याच्या कुटामुळे उसळ अत्यंत घट्ट होते.
ती पाणीदार राहण्यासाठी आपण शेंगदाण्याचा कुटाचा वापर सगळ्यात शेवटी केलेला आहे. चला तर मग आपली उसळ चांगली वाफलेली आहे ही उसळ खाण्यास तयार आहे.

टिप्स::
तुरीची उसळ ही तुम्ही अशी ही खाऊ शकतात. किंवा चपाती सोबत भाजी म्हणून खाऊ शकतात. फक्त तुरी वाफवताना आठ ते नऊ शिट्ट्या होऊ द्या. कारण त्याशिवाय तुरी या वाफवल्या जात नाही. नाहीतर त्या पोटदुखीच कारण ठरतात. तुरीची उसळ ही पचनास जड असल्यामुळे शक्यतो ती सकाळच्या जेवणात खावी.
वेळ व परि माण::
तयारीची वेळ::३० मिनिटे
एकूण वेळ::१ तास
परिमाण:: २ जणांसाठी
